*07/07/25 सोमवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
*💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
🇮🇳 *राष्ट्रगीत* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07. जुलै:: सोमवार* 🍥
⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
आषाढ शु.१२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~शुभ, करण ~बव,
सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
07. *तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
07. तेल गेले, तूप गेले,
हाती धुपाटणे आले –
*★अर्थ ::~*
दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *भावे हि विद्यते देव: ।*
⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
*🛡 ★ 07. जुलै ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १८८ वा (लीप वर्षातील १८९ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६: पाकिस्तानमध्ये भूकंप-
पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला, ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक इमारती पाडल्या गेल्या.
●१९८५ : विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
●१९१० : इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.
●१८९८ : हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१ : महेंद्रसिंग धोणी – क्रिकेटपटू
◆१९४८ : पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब' असे छापले जात असे.
◆१९४७ : राजे ग्यानेंद्र – नेपाळ नरेश
◆१९२३ : प्रा. लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक
◆१९१४ : अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३० : सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक
●१३०७ : एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: १७ जून १२३९)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *✹उषःकाल होता होता..✹*
●●●●●००००००●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !अरे,पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतोआमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशालाजिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *❂ हे आदिमा हे अंतिमा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे आदिमा, हे अंतिमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा
या मातिचे आकाश तू
शिशिरांत या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरुषोत्तमा
देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरीं
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
07. *❝बाहय देखावा आणि सौंदर्य❞*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं....
*प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं,...*
*कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,...*
*पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते...!*
*नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ परभणी ( महाराष्ट्र ) जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे ?
➜मराठवाडा कृषी विद्यापीठ.
✪ जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?
➜जिनिव्हा.
✪ स्वतंत्र भारताचे पहिले प्रथानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?
➜जवाहरलाल नेहरू.
✪ नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
➜गोदावरी.
✪ हवामहल कोणत्या शहरात आहे ?
➜जयपूर. ( राजस्थान )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂व्यक्ती परिचय ❂*
━═🇲=◆🇸◆=🇵═━
07. ♦कॅप्टन कूल धोनी♦
━━•●◆★◆★◆●•═━
*💥यांचा आज जन्म दिवस💥*
त्यानिमित्त त्यांना
*हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!*
🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
●जन्म :~ ७ जुलै १९८१
रांची, बिहार (आताचा झारखंड)
★ "कॅप्टन कूल धोनी" ★
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी! भारतीय क्रिकेटचं एक अफाट उदाहरण आणि एक अत्यंत शांत आणि समर्पित लिडर. त्याची खेळी, नेतृत्वशक्ती आणि शांतता अनेक क्रिकेट प्रेमींच्या मनात ठरलेली आहे.
महेंद्र सिंग धोनी, ज्याला सर्वसाधारणपणे "कॅप्टन कूल" म्हणून ओळखले जाते, भारतीय क्रिकेट इतिहासातील एक अतिशय प्रभावशाली आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने क्रिकेटच्या विविध प्रकारांमध्ये सर्वोच्च शिखर गाठले, आणि त्याच्या शांत व स्थिर व्यक्तिमत्त्वामुळे तो आपल्या सहकाऱ्यांच्या आणि फॅन्सच्या हृदयावर कायमचा ठसा उमठवतो.
धोनीने शालेय क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या आवडीचे खेळ फुटबॉल आणि बॅडमिंटन होते. पण त्याने क्रिकेटमध्ये आपला मार्ग निवडला.
★क्रिकेट करियर:-
धोनी अंडर-१९ क्रिकेट संघातही खेळले. आणि २००४ मध्ये भारतीय संघासाठी डेब्यू केला.
◆धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचे महत्त्वाचे टायटल्स:-
•२००७ आयसीसी टी-२० वर्ल्ड कप - भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले.
•२०११ आयसीसी वनडे वर्ल्ड कप - धोनीने २०११ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शानदार ९१ धावा केल्या आणि भारताला २८ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकवला. हे धोनीचं करियरतील सर्वात ऐतिहासिक क्षण मानला जातो.
•२०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी - धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, जी त्याच्या करियरतील तिसऱ्या प्रमुख आयसीसी ट्रॉफी होती.
◆आयसीसी नंबर १ रँकिंग:-
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर १ स्थान मिळवले.
★धोनीचे नेतृत्व आणि खेळण्याची शैली:-
त्याची "फिनिशिंग" क्षमताही उल्लेखनीय आहे. अंतिम ओव्हरमध्ये आक्रमकता आणि सुसंयम ठेवून त्याने अनेक वेळा भारताला विजय मिळवला.
विकेटकीपर म्हणून त्याचे चांगले कार्य होते, आणि त्याचे "स्टंपिंग" आणि "कैचिंग" नेहमीच कौतुकाचे ठरले आहेत.
धोनीचा "कैप्टन कूल" नायक म्हणून जगभरात एक प्रसिद्ध ब्रँड बनला.
◆धोनीचा प्रभाव:-
धोनीने भारतीय क्रिकेटला एक नवीन दिशा दिली. त्याच्या कूल व शांत व्यक्तिमत्त्वामुळे भारतीय क्रिकेट संघाला मानसिक दबाव कमी करण्यास मदत झाली. तसेच, त्याच्या नेतृत्वामुळे भारतीय क्रिकेट संघाने एक नविन दृष्टिकोन स्वीकारला.
◆इंडियन प्रीमियर लीग (IPL):
धोनीने २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व स्वीकारले.
•धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८, आणि २०२३ मध्ये आयपीएल चषक जिंकले.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज सुसंस्कृत संघ म्हणून ओळखले जातात. त्याच्या संयमामुळे टीमला टॉप पोजिशन्स मिळाल्या आहेत.
•धोनीने महेंद्र सिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात देखील आपला जीवनप्रवास मांडला, जो २०१६ मध्ये प्रदर्शित झाला.
धोनीला दुचाकींचे, विशेषत: बाइक्सचे विशेष आकर्षण आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या बाइक्स आहेत.
◆निवृत्ती:-
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी एक मोठा निर्णय घेतला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने एक सोशल मिडिया पोस्टद्वारे निवृत्ती जाहीर केली, ज्यामध्ये "आपला खेळ संपला" असं म्हणत त्याने फॅन्सना शुभेच्छा दिल्या.
धोनीचा क्रिकेटमधील योगदान, त्याच्या नेतृत्वातील कलेला सुद्धा कधीही विसरता येणार नाही. तो एक प्रेरणा आहे आणि भारतीय क्रिकेटचा "कॅप्टन कूल" म्हणून कायमचा ठरलेला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁सोमवार~07/07/2025❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment