"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*07/08/24 बुधवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07. ऑगस्ट:: बुधवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.३, पक्ष :शुक्ल पक्ष,
        तिथि ~तृतीया,
     नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~परिघ, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

07. *जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

07.  *दुधाने तोंड पोळले म्हणजे ताक फुंकुन पितात*  
          *★अर्थ ::~* 
    एकदा वाईट अनुभव आला म्हणजे पुन्हा विचार करून वागतात
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07.     *शीलं परं भूषणम् ।*
  ⭐अर्थ ::~ शील (चारित्र्य) हेच
         श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

    🛡 ★ 07. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २१९ वा (लीप वर्षातील २२० वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
●१९९७ : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा ’व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर
●१९९१ : जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी
●१९४७ : थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२५ : डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन – भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री, हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
◆१९१२ : केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ
◆१८७६ : माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर

  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७४ : अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका
●१९४१ : *रविंद्रनाथ टागोर* – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

07. *✸ जय जवान जय किसान ✸*
     ●●●००००००●●●●
एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !

अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !

शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *❂ देह मंदिर, चित्तमंदिर ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनादु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामनावेदना जाणावयाला जागवू संवेदनादुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनाजीवनी नवतेज राहो अंतरंगी भावनासुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवनाशौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनाभेद सारे मावळू द्या वैर सार्या वासनामानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पनामुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

07. *❃❝ फुलांची शिकवण ❞❃*
━━•●◆●★★●◆●•═━
      फुलांचे एक गाव होते. त्या गावाशेजारीच दगडांचे गाव होते. दगडांना फुलांचा खूप राग येई. कारण कोणीही फुलांनाच महत्त्व देत असे. प्रत्येक जण फुलांचीच स्तुती करत असे.

   कोणीही दगडांना चांगले म्हणत नसत. दगडांना याचे खूप दु:ख होई. अनेक वर्षे त्यांच्या मनात हे दु:ख  साठलेले होते.

        एकदा काहीतरी  कारण घडले. दोन्ही गावांत भांडण झाले. दगडांचा राग  उसळून आला. त्यांनी फुलांवर जोरदार हल्ला चढवला. सर्व फुलांना नष्ट करायचे असे त्यांनी ठरवले. प्रत्येक दगड एकेका  फुलाला ठेचू लागला. फुले मात्र अजिबात  प्रतिकार करत नव्हती. जरासाही  दु:खाचा उद्गार काढत नव्हती. उलट प्रसन्नपणे हसत होती.

      दगडांना फुलांचे आश्चर्य वाटते. त्यांनी फुलांना विचारले," आम्ही तुम्हाला इतके ठेचतो तरी तुम्ही हसता कसे?" फुलांनी उत्तर दिले," तुम्ही आम्हाला जितके अधिक चिरडता, तितका अधिक सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचा आम्हाला आनंद होतो."

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  स्वत: दु: ख सोसून इतरांना आनंद देण्यातच सुख असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

07.  *"ज्याचे पाय शाळा सुटल्या नंतरही शाळेत रेंगाळत राहतात आणि या पायांभोवती आठ दहा छोटी पावलं घुटमळत असतात तोच खरा शिक्षक."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

07. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  संगणक ( काॅम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ?
➜ चार्ल्स बॅबेज.

✪  प्रसिद्ध दिक्षाभूमी कोणत्या शहरात आहे ?
➜ नागपूर.

✪  सुप्रसिद्ध सालारजंग म्युझिअम कोठे आहे ?
➜ हैद्राबाद.

✪  मानवाच्या जठरात कोणते आम्ल असते ?
➜ हायड्रोक्लोरिक.

✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे असे कोणत्या ठिकाणी म्हणाले ?
➜ रहिमतपूर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

07. *❒ ♦रवींद्रनाथ टागोर♦ ❒* 
  ━═•●◆●★★●◆●•━━
लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
●पूर्णनाव :~
          रवींद्रनाथ देवींद्रनाथ टागोर                       
*●जन्म :~ 7 मे 1861*
       कोलकाता, पश्चिम बंगाल,भारत.
●मृत्यू :~ 7 ऑगस्ट 1941
           कोलकाता,भारत.
●कार्यक्षेत्र :~ साहित्य, संगीत,
                 तत्वज्ञान,नाटक। 
●प्रसिद्ध साहित्यकृती :~
        जन गण मन, गीतांजली.
◆पुरस्कार :~ साहित्यातील नोबेल
                पारितोषिक (1913)

       *★ रवींद्रनाथ टागोर ★*
   🔹 ज्यांना *गुरुदेव* असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यमूळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. *रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे  पहिले नोबेलविजेते* होते. 
    🔸 रवींद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली.
     ◆ वयाच्या 16 व्या वर्षी भानुसिह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या.
     🔹शांतिनिकेतांची उभारणी व  उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती हे त्यांचे जीवनकार्य होय.
     🔸*जन गण मन* व *आमर शोनार बंगला* ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची *राष्ट्गीते* म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीतलावरील एकमेव कवी आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार~07/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment