"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*07/09/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07. सप्टेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद शु.४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~चित्रा,
योग ~ब्रह्म, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:24 सूर्यास्त-18:47,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

07. *कृतज्ञता हे उत्तम संस्काराचे फळ आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

07. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर –
          ★ अर्थ ::~ 
   दोनपैकी एक पर्याय निवडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।*
   ⭐अर्थ ::~ शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

   🛡 *★ 07. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ ब्राझिलचा स्वातंत्र्यदिन
★ हा या वर्षातील २५० वा (लीप वर्षातील २५१ वा) दिवस आहे.
★ वेद दिन

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९७८ : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
●१९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
●१९०६ : ’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔸
◆१९४० : चंद्रकांत खोत – लेखक व संपदक
◆१९३३ : इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील व ’सेवा’
◆१८४९ : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला
◆१८२२ : रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक
◆१७९१ : *ऊमाजी नाईक – पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक*

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●१९९१ : रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक
●१९७९ : जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
●१९५३ : भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’फुलारी’ ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

   https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *✸ हम धरती के लाल ✸*
   ●●●●००००००●●●●
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे
सौ-सौ स्वर्ग उतर आएँगे,
सूरज सोना बरसाएँगे,
दूध-पूत के लिए पहिनकर
जीवन की जयमाल,
रोज़ त्यौहार मनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥

सुख सपनों के सुर गूँजेंगे,
मानव की मेहनत पूजेंगे
नई चेतना, नए विचारों की
हम लिए मशाल,
समय को राह दिखाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥

एक करेंगे मनुष्यता को,
सींचेंगे ममता-समता को,
नई पौध के लिए, बदल
देंगे तारों की चाल,
नया भूगोल बनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *❂ मार्ग लाभो पावलांना ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
लाभु दे ऐसा वसा की जन्‍म होवो प्रार्थना

जन्मती जन्मासवें काही रूढींची बंधने
दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे
संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना

जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
सार सार्‍या धर्मपंथांचे असे सहवेदना

काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले ?
का तयांना वर्ज्‍य हे आनंद या वार्‍यातले
लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्‍वना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

07.  *❃ राजाचे डोळे उघडले ❃*
   ━═•●◆●★★●◆●•═━
    रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि," आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले. राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू." ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते. त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले. राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय? श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.

          🌀❝ तात्पर्य ❞ ::~
  मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

07.      *माणसाने*                
    "शिक्षणा"आधी "संस्कार"   
   "व्यापारा" आधी "व्यवहार"  
             *आणि*                 
"देवा"आधी "आईवडीलांना" 
      समजुन घेतले तर,        
   *"जीवनात"* कोणतीच       
      अडचण येणार नाही..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता ?
➜ भारत.

✪  संगणकाचा मेंदू कोणत्या भागास म्हणतात?
➜ सिपियू.(CPU - Central Processing Unit)

✪ "नागालँड" या राज्याची राजधानी कोणती ?
➜ कोहिमा.

✪  इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?
➜ कुराण.

✪  "झाकीर हुसेन" कोणते वाद्य वाजवतात ?
➜ तबला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

07. *❒ ♦उमाजी नाईक♦ ❒* 
  ━═•●◆●★★●◆●•═━
*●जन्म :~ ७ सप्टेंबर १७९१*
      पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे
●मृत्यू :~ ३ फेब्रुवारी १८३२

*एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक...*
         *★ उमाजी नाईक ★*
     हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.

    🔹हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद  झाली, काही तशाच राहून गेल्या. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व  सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा  महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

   ♦आद्याक्रांतीकाराबद्दल....
*"मरावे परि क्रांतीरूपे उरावे"*
अशी उक्ती आहे. ती आद्याक्रांतीकारक उमाजी  नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले  आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले  नाहीत. इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना  म्हंटले आहे, उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो  कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी  सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही ?
तर टोस म्हणतो, उमाजीपुढे  छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. *त्याला फाशी दिली  नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.*

   🔸हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे...!! जर इंग्रजांनी कुटनीती  आखली नसती  तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
   🔹नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई  व दादोजी  खोमणे यांच्या पोटी  ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे  झाला. उमाजीचे  सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी  पार  पाडत  होते. त्यामुळेच त्यांना नाईक हि पदवी मिळाली. उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट, उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुर्हाडी, तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता  स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात  घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले. आणि  त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व  किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू  घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची  वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी  बेभान  झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत  माझ्या देशावर  परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी  नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत  जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात  पहिल्या बंडाची गर्जना केली.
      🔸इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना  लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत  करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो  भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक  वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने  त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या  कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी   लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ  लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
     🔹उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या  मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या  पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्रज  सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच  धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते.
   🔸१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या  देखभालीसाठी जनतेला वाटला होता.

    🔹१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या  सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि  इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना  शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार  आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार  त्यांना शासन  करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला  होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.

   🔹१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना  उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.
    🔸या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत  वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत  फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या  बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर  इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
    🔹अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल  १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव  बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८७९ साली इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले.. त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.
अशा या आद्याक्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक यांचा आपण विसर न पाडता त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस त्रिवार अभिवादन करूयात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार~07/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment