"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*08/01/24 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *08. जानेवारी:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.12, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~गण्ड, करण ~कौलव,
सूर्योदय-07:13, सूर्यास्त-18:16,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

08. *कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08 . *काळ्या दगडावरची रेष*
           *★ अर्थ ::~*
    -कधीही न बदलणारी गोष्ट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

08. *श्व:कार्यमद्य कुर्वीत ।*
         ⭐अर्थ ::~
     उद्याचे काम आज करावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★08. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ८ वा दिवस आहे.
     
  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
●१९४७ : राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
●१८८९ : संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा  उपयोग करण्यात आला.

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३६ : ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
◆१९३५ : एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’
◆१९२४ : गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी
●१९७३ : नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,  भारतीय पत्रकारितेचे पितामह,
●१९४१ : लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते 
●१८२५ : एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
●१६४२ : *गॅलेलिओ गॅलिली*  – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08.  *✸ भारत देश महान ✸*
  ●●●●००००००●●●●
भारत देश महान अमुचा
भारत देश महान
स्फूर्ती देतील हेच आमुचे
राम कृष्ण हनुमान ll धृ ll

व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुख समृद्धी निधान ll १ ll

चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान ll २ ll

धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सिमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान ll ३ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

08. *❂ संपू दे अंधार सारा ❂*
    ━═●✶✹★✹✶●═━
          *संपू दे अंधार सारा*
              उजळू दे आकाश तारे
       *गंधाळल्या पहाटेस येथे*
                 वाहू दे आनंद वारे....

       *जाग यावी सृष्टीला की*
             होऊ दे माणूस जागा
     *भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
              घट्ट व्हावा प्रेम धागा...

       *स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
             अन् मने ही साफ व्हावी
        *मोकळ्या श्वासात येथे*
             जीवसृष्टी जन्म घ्यावी...

       *स्पंदनांचा अर्थ येथे*
               एकमेकांना कळावा
      *ही सकाळ रोज यावी*
            माणसाचा देव व्हावा....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

08.     *❃❝ किंमत ❞❃*
     ━═•●◆●★●◆●•═━
      एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? "
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची
खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू
नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .
तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी
तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू
शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक
भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली
- " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. "
पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल
त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत
जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या
भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी
मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण
नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी
मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी
विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो
रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली
कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "
अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ  अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे
अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही
शकणार ."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत  तो
आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "  मला वाटते
फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला
आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा
असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,
हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे.  .. असते.
स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू
नका. 

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
    मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.
तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08. *आनंदी मन, सुदृढ शरीर*
  आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे
       *अमृत मिळणं...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  USB चे पूर्ण रूप काय आहे ?
➜ Universal Serial Bus.

✪ 'देवधर ट्राफी' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ क्रिकेट.

✪  टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?
➜ जाॅन लाॅगी बेअर्ड.

✪  कामगार दिवस कधी साजरा करतात ?
➜ १ मे.

✪  हाती न घेता तलवार,बुद्ध राज्य करी जगावर हे उद्गार  कोणाचे आहे ?
➜ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

08. *❒ ♦गॅलेलियो गॅलिली♦ ❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ १५ फेब्रुवारी १५६४
          पिसा, टस्कनी, इटली
*●मृत्यू :~ ८ जानेवारी १६४२*
          आर्केट्री, टस्कनी, इटली
◆कार्यक्षेत्र :~ खगोलशास्त्र,
           भौतिकशास्त्र, गणित

          ◆ गॅलिलिओ गॅलिली ◆
   🔷हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले.

            *☀लंबकाचे घड्याळ*
  🔶एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती! याच लंबकाचा वापर गॅलेलिओन त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो.

          *☀गॅलिलिओचे शोध*
◆गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला.
◆त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
◆पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
◆गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे लागले.

            *☀ नवा शोध ☀*
  🔶१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणा विषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हिरो बनला.
  *विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~ 08/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment