"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*08/02/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *08. फेब्रुवारी:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.13,  पक्ष : कृष्ण पक्ष,
      तिथि ~त्रयोदशी,
    नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~सिद्धि, करण ~वणिज
सूर्योदय-07:10, सूर्यास्त-18:34,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

08. *मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेम रुपी पाण्याचे सिंचन लागते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

08.  *असेल तेंव्हा दिवाळी नसेल
   तेंव्हा शिमगा*
       *★अर्थ ::~*
जवळ पैसा असतांना मागचा पुढचा विचार न करता तो पैसा चैनीत उधळायचा आणि मग पैसा संपला कि हाल अपेष्टा सहन करत बसावयाचे अशा वर्तनास हि म्हण वापरतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

08. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
          ⭐अर्थ :: ~
  उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *08. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३९ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
●१९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
●१९६० : पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू
◆१९४१ : जगजीतसिंग – गझलगायक
*◆१८९७ : डॉ. झाकिर हुसेन* – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते.
◆१८४४ : गोविंद  शंकरशास्त्री  बापट – भाषांतरकार
◆१८३४ : दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका
●१९९५ : कल्पना दत्ता – भारतीय क्रांतिकारक यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.
●१९९५ : भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते.
●१९९४ : गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम  चित्रकार  
●१९७१ : डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08. *✸ ते अमर हुतात्मे झाले ✸*
   ●●●●००००००●●●●
*ते देशासाठी लढले*
*ते अमर हुतात्मे झाले ! Ilधृll*
सोडिले सर्व घरदार
त्यागीला सुखी संसार
ज्योतिसम जीवन जगले
ते देशासाठी लढले ! ||१||
जे देशासाठी••••••

तो तुरुंग तो उपवास
सोसला किती वनवास
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले ! ||२||
जे देशासाठी लढले••••••

झगडली,झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली 'माता'
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले ! ||३||
जे देशासाठी लढले••••••

🇮🇳हा राष्ट्रध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला🙏
जयगीत गाउया अपुले
ते देशासाठी लढले ! ||४||
जे देशासाठी लढले••••
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

08.  *❂ हे करुणाकरा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

08. *❃ स्वकष्टाची कमाई ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   "धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.
दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'
मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.
दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपयाu मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.
तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.
स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'.
ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?'
शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.
दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

08. झाडांची गळून पडलेली पाने 🍃जशी परत जूळवता येत नाहीत ,
    तसेच  मनात  घर करून गेलेल्या व्य़क्तीला कधीच विसरता येत नाही...!!
         घर छोटं असले तरी चालेल
पण  मन माञ मोठ असल पाहिजे.......!!!
   
   जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि....
    जिथे माणुसकीची शिकवण असते ,
तिथे माणसांची कमी नसते..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

08. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ जगातील सर्वांत मोठी कोळसा उत्पादक कंपनी कोणती ?
➜ कोल इंडिया.

✪  भारतात सध्या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळला जात आहे ?
➜ १० टक्के.

✪  मराठा नौदलाचे प्रमुख कोण होते ?
➜ कान्‍होजी आंग्रे.

✪  सुवर्ण क्रांतीचा संबंध कशासोबत आहे ?
➜ मधुमक्षिका पालन.

✪  पाणी शुद्धतेत भारतात कोणते शहर प्रथम स्थानी आहे ?
➜ मुंबई.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
08. *❒ ♦कल्पना दत्ता♦❒ ━━•●◆●★★●◆●•═━
       (भारतीय क्रांतिकारक)
◆जन्म : 27 जुलै, 1913
(सिरपूर, चितगांव, बांग्लादेश, बंगाल)
◆मृत्यु : 8 फेब्रुवारी 1995
    (कलकत्ता, पश्चिम बंगाल)

इतर नाव : कल्पना जोशी
पति : पूरन चंद जोशी
चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा
जेल यात्रा : फेब्रुवारी 1934 मध्ये 21 वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.

◆ सप्टेंबर 1979 मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.

  कल्पना दत्ता  (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केल. ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली.

★ सुरुवातीचे जीवन :~
कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.

🔫 सशस्त्र चळवळ :~
चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्‍या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली.
    कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.

नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा म्रुत्यू झाला.

💁‍♀️ वैयक्तिक जीवन :~

कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.

🎞️ चित्रपट :~
    चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁गुरूवार~08/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
    

No comments:

Post a Comment