"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*08/07/24 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *08. जुलै:: सोमवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आषाढ शु. 3, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~पुष्य,
योग ~वज्र, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
08. *आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

08.  आंधळा मागतो एक डोळा,
  देव देतो दोन डोळे~
      *★ अर्थ ::~*
   अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~ सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

     *🛡 ★ 08. जुलै ★ 🛡*
🔻===●●●★●●●===🔻
★जागतिक अ‍ॅलर्जी प्रतिबंधक दिन
★हा या वर्षातील १८९ वा (लीप वर्षातील १९० वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : रुपयाचे नवीन चिन्ह ( Rs. ) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.
●२००६ : मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
●१९९७ : बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
●१९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
●१४९७ : वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : सौरव गांगुली – भारताचा क्रिकेट कर्णधार
◆१९४९ : वाय. एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री
◆१९१६ : गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व ’गडसम्राट’,
◆१९१४ : ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)
◆१७८९ : ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४),
●२००१ : तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे कोल्हापूर येथे निधन
●१९९४ : डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ’गोवा पुराभिलेख’चे संचालक
●१९८४ : *कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ –* कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✫★✫✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08. *✸ जहाँ डाल डाल पर.. ✸*
     ●●●●००००००●●●●
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियाँ करती है बसेरा
वो भारत देश है मेरा।

जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा।

ये धरती वो जहाँ ॠषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा।

अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा।

जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

08. *❂ मन विजय करें ❂*
   ━━●✶✹★●★✹✶●═━
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना..

भेदभाव, भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके,
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सकें,
झूठ से बचे रहें, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करें

हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना …

मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें

हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

08. *❝ शांती आणी आपूलकी ❞*
    ━━•●◆●★◆★●◆●•═━
     एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणी जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे , परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे.तुझी इच्छाअसेल ते माग.

     माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणी जिव्हाळा राहू दे.

लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणी निघून गेली. काही दिवसानंतर  धाकटीसून स्वयंपाक बनवत होती ,तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणी दूसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणी कामाला निघून गेली.
त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या .

      जेव्हा माणूस आला आणी जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ?तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.
त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.

     संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणी म्हणालं , मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं  ,तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.
      ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     भांडण आणी इर्षा मूळं दरिद्री आणी आपलं नुकसानचं होतं.
ज्या घरात प्रेम शांती आणी आपूलकी असते . तिथं लक्ष्मी राहत असते...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

08.  *अनुभव* घ्यायला लाखो *पुस्तके* लागत नाही पण लाखो *पुस्तके लिहायला* मात्र *अनुभवच* लागतो...

    *विचार* करण्यासाठी *बोलावे* लागतेच असे नाही पण *बोलण्यासाठी* मात्र *विचार* करावाच लागतो...

   *काम* करण्यासाठी *नाव* लागतेच असे नाही पण *नाव* करण्यासाठी मात्र *कामच* करावे लागते...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

08. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
➜दिल्‍ली.

✪ डब्ल्यू डब्ल्यू  डब्ल्यू यांचे पूर्ण रूप काय आहे ?
➜वर्ल्ड वाइड वेब.

✪  शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
➜कागल.( कोल्हापूर )

✪ इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण होता ?
➜मुसोलिनी.

✪  संगणकावर आपण कुठल्या प्रणालीच्या आधारे काम करतो ?
➜ विंडोज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

08. *❒♦कवी बा भ. बोरकर ❒* 
  ━━•●◆●★◆★●◆●•═━
●जन्म :~ ३० नोव्हेंबर १९१०,
●मृत्यु :~ ८ जुलै १९८४

   देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे, शुभ पाऱ्यासारखे.
      असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी! *बाळकृष्ण भगंवत बोरकर उर्फ मा.बा भ. बोरकर*

    १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच मा.बा भ. बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. मा.बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

    निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात.

     कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.

     १९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी मा.भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

    कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. मा.बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता .भारत सरकारने ‘पद्मकश्री ’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║❃❂❃║▌║█║▌

*❁ सोमवार~08/07/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment