"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*08/08/19 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*❁ दिनांक :~ 08/08/2019 ❁*
      *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *08. ऑगस्ट:: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             श्रावण शु. ८
     तिथी : शुक्ल पक्ष अष्टमी,
            नक्षत्र : विशाखा,
      योग : शुक्ल,  करण : बव,
सूर्योदय : 06:17,  सूर्यास्त : 19:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

08. *स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08. *अडला हरी गाढवाचे पाय धरी*
  ★ अर्थ ::~ अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08.   *मातृदेवो भव ।*
⭐अर्थ ::~ मातेला देवाप्रमाणे पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

 🛡 ★ 08. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ भारत छोडो दिन
★ हा या वर्षातील २२० वा (लीप वर्षातील २२१ वा) दिवस आहे.
 
         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९४ : पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले.
●१९८५ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
●१९४२ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू
◆१९३२ : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक
◆१९२६ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांच्या अनेक कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●१९९८ : डॉ. सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी चौदा कादंबर्‍या दोन नाटके व काही कथा लिहिल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08.  *✸ बहु असोत सुंदर ✸*
     ●●●●●००००००●●●●●
बहु असोत सुंदर संपन्‍न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *❂ दिवा पाहुनि लक्ष्मी येते ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनि लक्ष्मी येते
करु तिची प्रार्थना, करु तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो,
शुभंकरोति म्हणा ॥
 शुंभकरोति कल्याणम्‌,
शुभंकरोति कल्याणम्‌ ॥१॥

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या
दिसती पाऊलखुणा – शुभंकरोति म्हणा, मुलांनो, … ॥२॥

या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता
सौख्य मिळे जीवना – शुभंकरोति म्हणा, मुलांनो,….॥३॥

दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानीं कुंडल मोतिहार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08.  *❃ फसवेगिरीl ❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
       एक शेळी चरण्यासाठी रानात निघाली तेव्हा तिने आपल्या करडास सांगितले. 'बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे आणि मी, 'सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' असं म्हटलं की दार उघड. इतर कोणाला दार उघडू नको !'

हे सर्व बोलणे एक लांडगा ऐकत होता. शेळी निघून गेल्यावर तो खोपटाच्या दाराशी येऊन म्हणाला, 'सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो !'

त्याला वाटले आता करडू दार उघडेल. परंतु त्याचा आवाज करडाने ओळखला व ते खिडकीतूनच लांडग्याला म्हणाले, 'तू जर बोकड आहेस तर तुला दाढी कशी नाही ?'

हा प्रश्न ऐकून लांडगा निमूटपणे निघून गेला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    फसवेगिरी करणार्‍या माणसा संबंधी, तसेच  दिशाभूल करून सभादाची फसणूक करणार्‍या नेते मंडळी पासून सर्व सामान्य सभासदांनी नेहमी सावध असावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08.    जी माणसं "दुसऱ्याच्या"
     चेहऱ्यावर आनंद निर्माण
 करण्याची क्षमता ठेवतात,

   ईश्वर "त्यांच्या" चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही.
आणि म्हणूनच ती समाधानी असतात.   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *✿ राष्ट्रीय प्रतिके~प्रश्नावली ✿*
        ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑
■  राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
➡ २४

■  भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
➡ तिरंगा

■  भारताचे ध्वजगीत कोणते?
➡ विजयी विश्व तिरंगा प्यारा.

■  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
➡ पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)

■  २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
➡ राष्ट्रपती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ महत्वपूर्ण दिवस ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08.  *भारत छोड़ो आन्दोलन*
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
    भारत स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान, 9 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण भारतभर सोडून भारत विख्यात काकूरी कंडच्या सतरा वर्षांनंतर, गांधीजींच्या आवाजात, एकत्रितपणे सुरुवात झाली. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात ही एक सविनय कायदेभंग विरोधी चळवळ होती ज्यामुळे भारत मुक्त झाला. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर, महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध तिसरे मोठे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या संध्याकाळी बॉम्बे मधील ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या बॉम्बे सत्रामध्ये 'भारत छोडो' हे नाव देण्यात आले. जरी गांधीजींना ताबडतोब अटक झाली असली तरी देशभरातील तरुण कार्यकर्त्यांनी स्ट्राइक आणि ब्रेकडाउनच्या कृतींमुळे आंदोलन केले. कॉंग्रेसमध्ये, जयप्रकाश नारायणसारख्या समाजवादी सदस्यांना भूमिगत प्रतिकारशक्तीत सर्वात जास्त सक्रियता होती. स्वतंत्र सरकार, काउंटर सरकारची स्थापना पश्चिम भागातील सातारा व पूर्वेस मेदिनीपुर या जिल्ह्यांमध्ये झाली. इंग्रजांनी या चळवळीकडे एक कडक वृत्ती अंगीकारली, परंतु शासनाने या विद्रोह रोखण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक वेळ घेतला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ गुरुवार ~ 08/08/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment