"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

8/12/24 रविवारचा परिपाठ

Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *08. डिसेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.७, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~शतभिषज,
योग ~वज्र, करण ~वणिज,
सूर्योदय-07:00, सूर्यास्त-18:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

08. *आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08. *कोल्हा काकडीला राजी –*
  ★ अर्थ ::~ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*
   ⭐अर्थ ::~ सर्व सत्यावर
         आधारलेले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 08. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन
★ हा या वर्षातील ३४२ वा दिवस आहे. (लीप वर्षातील ३४३ वा)
★ जपानमध्ये हा दिवस "बोधी दिवस"  म्हणून साजरा केला जातो.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७१ : भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
●१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री
◆१९३५ : धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
◆१९०० : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)
◆१८९७ : पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
◆१७६५ : एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
१७२१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’
(मृत्यू: २३ जून १७६१)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७८ : गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान
(जन्म: ३ मे १८९८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *✸ उंच उंच गगनात तिरंगा ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो ||धृ||
  उंच उंच गगनात तिरंगाssss

भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची
राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची
तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो ||१||
     उंच उंच गगनात तिरंगाssss

नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे
वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे
आम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो||२||
     उंच उंच गगनात तिरंगाssss

मनमंदिरी स्थान आईला,नित्य आम्ही दिधले
उत्थानासाव भारतभूच्या जीवन वेचू आपले
तिची कस्तुरी गंधित माती ,भाळावर लावतो ||३||
     उंच उंच गगनात तिरंगाssss

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो
      उंच उंच गगनात तिरंगाssss
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *❂ असे मी अनादी ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
असे मी अनादी मला अंत नाही
मला मृत्युची या मुळी खंत नाही
पडू दे इथे ही तनू मृण्मयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥१॥

आम्ही प्राशिले मत्त त्या सागराला
आम्ही प्राशिले कालकूटा गराला
असे वीर्य ते माझिया संचयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥२॥

जिथे न्याय -निती सवे सत्य आहे
जयाची पताका तिथे नित्य आहे
उभा देव तेथे सदा निश्चयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥३॥

पुन्हा यज्ञि या द्यावया आहुती मी
पुन्हा जन्म घेइन रे भारती मी
असे येथली वीरता अक्षयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥४॥

इथे वाहता धार ही शोणिताची
पहा जागली अस्मिता भारताची
उभी सिध्द सेना पहा ती जयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युजयी रे॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08.  *❃❝ संगत ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
      एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले.

     पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     यासाठी संगत फार विचाराने करावी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *जिवनात कठीण परीस्थिती सुद्धा एका वाँशिंग मशीन सारखी आहे....*
*जी आपल्याला खूप  टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा पण…*
*जेव्हा आपण त्यातुन बाहेर येतो,*
*तेव्हा आपल व्यक्तिमत्व पहिल्या पेक्षा,*
*"अधिक स्वच्छ,  चांगल आणि चमकदार असतं"....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ दादोबा पांडूरंगांनी मानवधर्म सभेची स्थापना कोठे केली ?
  ➜ सुरत.

✪ बाॅम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते ?
  ➜ डाॅ.भाऊ दाजी लाड.

✪ छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या व्यक्तिला कोल्हापूरात चहाचे दुकान काढून दिले होते ?
  ➜ गंगाधर कांबळे.

✪ 'श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण' हे घोषवाक्य कोणाचे आहे ?
  ➜ कर्मवीर भाऊराव पाटील.

✪ 'समाजस्वास्थ्य' हे मासिक कोण चालवित होते ?
  ➜ र. धो. कर्वे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08. *❒ क्रांतिसिंह नाना पाटील ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

●जन्म : ~ ३ ऑगस्ट  १९००
बहेबोरगाव, पुणे सांगली, महाराष्ट्र,
●मृत्यू : ~ ६ डिसेंबर १९७६
             वाळवा येथे
●चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा,
    संयुक्त महाराष्ट्र चळवळ
  
        "क्रांतिसिंह नाना पाटील"
    महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव.

    नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.

    १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला.
स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

     ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

    यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
    स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार ~08/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment