"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*09/01/20 गुरुवारचा परीपाठ*
   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
 *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━

 *🍥09.जानेवारी:: गुरुवार🍥*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━
             पौष शु. १४,
     तिथी : शुक्ल पक्ष चतुर्दशी,
         नक्षत्र : मृगशीर्ष,
       योग : ब्रह्म,  करण : गर,
सूर्योदय : 07:14, सूर्यास्त : 18:17,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

09. *एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09.  तेरड्याचा रंग तीन दिवस –
   ★ अर्थ ::~  एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *परोपकाराय सतां विभूतय: ।*
       ⭐अर्थ ::~ सज्जनांचे ऐश्वर्य परोपकारासाठी असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 *★09. जानेवारी★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक घरबांधणी कामगार दिन
★हा या वर्षातील नववा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
●२००१ : नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
●१९१५ : महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
●१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : फराह खान – नृत्यदिग्दर्शक
◆१९५१ : पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य
◆१९३८ : चक्रवर्ती रामानुजम– गणिती
◆१९२६ : कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते
◆१९२२ : हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ
●२००४ : शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक
●१९२३ : सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
●१८४८ : कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ , ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *✸ देश हीच माता ✸*
      ●●●●●००००००●●●●●
देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हां जात-गोत नाही
मुले माणसाची अम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञान-विज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न अम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *❂ विजयी वरदान ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान।
संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥

परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे।
पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे।
मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे।
संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे।
इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥

पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा
ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा।
विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा।
नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा।
नील अंबरी फडकत असता। चढे नवे अवसान॥२॥

काल्पनीक प्रांतांच्या सीमा।भेद इथे ते सरले।
जाति-पंथ-भाषेचे अंकुर।कधी न इथे रुजले।
भिन्नत्वातुन अभिन्नतेचे।विशाल मंदिर उठले।
अंजिक्य-अविचल मंदिरात या।केशवदर्शन घडले।
कोटि कोटि हृदयांत चिरंतन। कार्याचा अभिमान॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09.  *❃❝ चिमणीची गोष्ट ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       एक होती चिमणी आणि एक होता कावळा.*चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल.   
      हू...हू...हू...हू...! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !'   

    चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते' थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !
   "चिमणी आतून म्हणाली" थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली 'तू बैस चुलीपाशी'. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    केलेले उपकार कधिही विसरू नये. आळशी व घाणेरडी माणसे  अपमानास्पद वागतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09.   *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते*
        *आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते."*
     *म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *✿ सामान्य माहिती ✿*
    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ.
   ➜ कोची

■  देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ --------- या शहरात सुरु करण्यात आले.
    ➜  बदलापूर

■  राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर.
    ➜  पिंपरी चिंचवड

■  राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ-------- येथे सुरु झाले.
    ➜ पुणे

■  देशातील पहिले वाय-फाय गाव
    ➜ पाचगाव (महाराष्ट्र)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09.  *❒  हरगोविंद खुराना ❒* 
     ━━═•●◆●★●◆●•═━━
🔹जन्म :~ 9 जनवरी 1922
    रायपुर जिल्हा मुल्तान, पंजाब
🔸मृत्यू :~ 9 नवम्बर  2011
    कॉनकॉर्ड, मैसाचूसिट्स अमरीका
🔹निवास :~ भारत/पाकिस्तान, संयुक्त राज्य अमेरिका
🔸नागरिक :~ अमेरीका
🔹क्षेत्र :~ आण्विक जीव विज्ञान

🔸पुरस्कार :~ नोबेल पुरस्कार (1968), गैर्डनर फाउंडेशन इंटरनेशनल अवार्ड, लुईसा फाउंडेशन इंटरनेशनल अवार्ड, बेसिक मेडिकल रिसर्च के लिए एल्बर्ट लॉस्कर पुरस्कार, पद्म विभूषण

          ◆ हरगोविंद खुराना ◆
    भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना १९६८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

 *❁गुरुवार ~ 09/01/2020❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment