*09/02/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *09.फेब्रुवारी:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.14,  पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~श्रवण, 
योग ~व्यतीपात, करण ~शकुनि, 
सूर्योदय-07:10, सूर्यास्त-18:35,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
09. *मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
09. *कुंपणानेच शेत खाणे –*
             ★ अर्थ ::~  
रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
09. *श्व:कार्यमद्य कुर्वीत ।*
         ⭐अर्थ ::~
     उद्याचे काम आज करावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
      🛡 *09. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४० वा दिवस आहे.
   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७३	:	बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
१९५१	:	स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
●१९३३	:	साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
●१९००	:	लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७०	:	ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
●१९१७	:	होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार 
●१८७४	:	स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८	:	डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक 
●२०००	:	शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती 
●१९८४	:	तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका 
●१९८१	:	एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री 
●१९७९	:	राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते 
●१९६६	:	दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *✸ देशारक्षणा चला ✸*
     ●●●●●००००००●●●●●
चला चला चला,पुढे पुढे चला
देशारक्षणा चला,न मागुती वळा||धृ||
बालवीर हे ,सिंह छातीचे
ताठ मान ही,हात बाजीचे ||१||
हिमालयावरी चढून जाऊ या
ध्वज तिरंगी हा,सदैव रक्षू या ||२||
हाक मारीता कोणी,त्या क्षणी
रणात ठाकू या,शस्त्र घेऊनी ||३||
भीती ही मनी,आमुच्या नसे
विजय शेवटी,आपुला असे ||४||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
09.  *❂ मुखी तुझे नाम राहो❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
09.    *❃ कष्टाचे फळ ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण,त्याची पाच मुले ही खूप आळशी होती .कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल,म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे .ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा .शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण ,शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले .त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन 
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
09.  विश्वास ठेवा....
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत....
इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसत.....
तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे,
तर अपेक्षा न करणें हें परमार्थाचें बीज आहे....
आणि अनंतकाळ प्रतिक्षा करण्याची तयारी ठेवली की तात्काळ फळ मिळतें हा परमार्थातील चमत्कार आहे...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
09. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  लालबहादुर शास्त्री यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ विजयघाट.( दिल्ली )
✪ नवीन २०० रू. चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
➜ सांची स्तूप.( मध्यप्रदेश )
✪  जगाचे छप्पर कोणत्या देशास म्हणतात ?
➜ तिबेट.
✪  भारतातील सर्वांत मोठी मशीद कोणती ?
➜ जामा मशीद.( दिल्ली )
✪  स्टैंड अप इंडिया योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
➜ ५ एप्रिल २०१६ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *मुरलीधर देवीदास आमटे*
     ✶✹✹✹✹✶✶✶✹✹✹✹✶
    *💐🙏 बाबा आमटे  🙏💐*
 _*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
 🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏   
🔹जन्म :~	२६ डिसेंबर १९१४
    हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र
*🔸मृत्यू :~	९ फेब्रुवारी २००८*
निवासस्थान	आनंदवन, गडचिरोली 
🔹टोपणनावे--	 बाबा आमटे
🔸ख्याती--	कुष्ठरुग्णांची सेवा
🔹पुरस्कार--	 रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण
     *मुरलीधर देवीदास आमटे*
             *ऊर्फ बाबा आमटे*
🔷हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
          🎪  कार्य 
        ~~~~~~~~
🔶इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय बाबा आमट्यांनी 
   💠कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापल्या :~
•आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
•सोमनाथ प्रकल्प - मूल (चंद्रपूर)
•अशोकवन - नागपूर
•लोकबिरादरी प्रकल्प - नागेपल्ली
•लोकबिरादरी प्रकल्प - हेमलकसा
     🔷बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत जोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे, त्यांच्या सुना व नातू आमट्यांनी आरंभलेले कार्य पुढे नेत आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁शुक्रवार ~ 09/02/2024❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment