"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*09/04/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *09. एप्रिल:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.1, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~रेवती,
योग ~वैधृति, करण ~किंस्तुघ्न,
सूर्योदय-06:25, सूर्यास्त-18:54,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

09. *मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09. *बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर*
            ★ अर्थ ::~ 
   दोनपैकी एक पर्याय निवडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09.  *न मातु: परं दैवतम् ।*
           ⭐अर्थ :: ~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★09. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जलसंधारण दिन
★ हा या वर्षातील ९९ वा (लीप वर्षातील १०० वा) दिवस आहे.
★ गोव्यामध्ये हा दिवस ’जागतिक कोंकणी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्‍न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
●१९९४ : सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८८७ : विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
◆१८२८ : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक
◆१३३६ : तैमूरलंग – मंगोल सरदार

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ’आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक
●२००१ : शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
●१९९८ : डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
●१९९४ : चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *✸ पाऊल पुढेच टाका ✸*
       ●●●●●००००००●●●●●
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका

तोंड लागले आज लढ्याला
चहूबाजूंनी येईल घाला
छातीवरती शस्‍त्रे झेला
फिरू नका रे डरू नका, डरू नका

शपथ तुम्हाला शिवरायाची
मराठमोळ्या मर्दुमकीची
समर्थ गुरु केसरी टिळकांची
विजयाच्या या ऐका हाका, ऐका हाका

निशाण अपुले उंच धरा
शूरपणाची शर्थ करा
कराच किंवा रणी मरा
बहाद्दरांनो मरणा जिंका, मरणा जिंका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *❂ मार्ग लाभो पावलांना ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना
लाभु दे ऐसा वसा की जन्‍म होवो प्रार्थना

जन्मती जन्मासवें काही रूढींची बंधने
दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे
संपु दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना

जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे
आपल्या आतील दु:खे स्वेतरांतून वाचणे
सार सार्‍या धर्मपंथांचे असे सहवेदना

काय जे जमिनीवरी आहेत ते मातीतले ?
का तयांना वर्ज्‍य हे आनंद या वार्‍यातले
लाभु दे अवकाश त्यांसी ही मनाला सांत्‍वना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09.    *❃❝ अहंकार ❞❃*
      ━━═•●◆●★●◆●•═━━
    उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्‍वराने देवांवर कृपा केली आणि त्‍यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्‍यावर प्रत्‍येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्‍यातील प्रत्‍येक जण विजयाचे श्रेय स्‍वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्‍छ मानत असे. यामुळे देवतांमध्‍ये विनाकारण वाद चालु झाले. त्‍यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्‍वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्‍यातील वैमनस्‍य यांना पराजित करेल. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी ईश्‍वर एक विशाल यक्षाच्‍या रूपात देवतांच्‍या समोर हजर झाले. देवतांनी आश्‍चर्याने त्‍यांना पाहिले आणि त्‍यांचा परिचय करून घेण्‍यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्‍यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्‍वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्‍वी अग्नि आहे. मी ठरवल्‍यास सारी पृथ्‍वी जाळून भस्‍म करून टाकीन.'' यक्षाने त्‍यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्‍यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्‍यासाठी गेले. तेव्‍हाने यक्षाने त्‍यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्‍हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्‍यांना उडवण्‍यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्‍यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्‍वराचा परिचय दिला. आता देवतांना त्‍यांच्‍या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्‍यांचा अहंकार नष्‍ट झाला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  अहंकार आणि अहंकार्‍याचे पतन निश्चितच होत असते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास जीवनाचे सार्थक होत असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..

    “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...,
    “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
➜ अमेरिका.

✪ दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
➜ जीव - रासायनिक.

✪  सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
➜ फेदम.

✪ सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
➜ कोपर्निकस.

✪ रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
➜ टेंपिंग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

09. *❒♦ "मिसाईल वुमन" ♦❒*
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
★टेसी थोमसना "मिसाईल वुमन"

    दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.

    डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थोमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !

      केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तीचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाउन पोहोचल्या.तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख " अग्निपुत्री " म्हणूनही झाली.

      ४९ वर्षे वय असलेल्या ट्रेसी थोमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यानाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार राहावे लागत असूनही आपल्या हाताने बनविलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. कदाचित त्यासाठी सैफ आली खान नावाचा तद्दन भिकार अभिनेता अधिक लायक ठरत असावा.

     मित्रानो, टेसी थोमस यांची कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आणि आजही महिलांना " पानी कम " समजणाऱ्या फेसबुकवरील असंख्य महाभागांना एक सणसणीत चपराक ठरावी ज्यांनी मला अनेक वेळा नाउमेद करून माझे पाय खाली खेचायचा प्रयत्न केला. आज इस्रोमद्धे तब्बल बाराशे महिला शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी माझ्या मनात शंकाच नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार~09/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment