*09/10/24 बुधवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *09.ऑक्टोबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.६, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~मूळ,
योग ~सौभाग्य, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:31, सूर्यास्त-18:19
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
09. *चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *डोंगर पोखरून उंदीर कढणे –*
★ अर्थ ::~ जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
09. *यथा राजा तथा प्रजा ।*
⭐अर्थ ::~ जसा राजा तशी प्रजा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 *★ 09. ऑक्टोबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★जागतिक टपाल दिन
★हा या वर्षातील २८२ वा (लीप वर्षातील २८३ वा) दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निवारण दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८१ : फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
●१९६२ : युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९६० : विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९६६ : डेव्हिड कॅमरुन– इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८७७ : पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
◆१८७६ : पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक
◆१८५२ : एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी ◆१९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्र
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.
●१९९८ : जयवंत पाठारे – ‘अनाडी‘, ‘आनंद‘, ‘अभिमान‘, ’गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक
●१९५५ : गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार,
●१८९२ : रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
09. *✸ राष्ट्रीय एकात्मता ✸*
●●●●००००००●●●●
धगधगता एकात्मते चा वारा वाहतो आहॆ.
या आपुल्या भारत भूमीच्या मातीवरती,
विविधतेने नटलेला ,हा भारतदेश असे आपुला.
हिंदू , शीख , बुद्ध, इसाई,
अन राहतात कोणी बेगडे,
भाषा असती अनेक बहुती,
असती अनेक त्यांची चाली- रीती.
कोणी लढती भारत भू च्या रक्षणासाठी आणि कोणी पर भूमीच्या बुजऱ्या लोकांसाठी,
कुठे सांडते रक्त देश सेवेसाठी अन कोणी काढी तो रक्त कोणी पर भूमीच्या स्वार्थी लोकांसाठी ,
कुठे गुलाब, पुष्प बरसते अन कुठे दगडांचे घाव लागती,
कोणी ठोकिती गोळी कुणा देश रक्षणा साठी अन कोणी ठोकिती गोळी आपुल्याच लोकांवरती,
राष्ट्रासाठी कोणी झेलतो दगडांची हि मार,
अन स्वार्थासाठी कोणी घालतो पैशाची हि माळ,
हवा आता बदल असा , राष्ट्रीय एकात्मते मध्ये ,
आपुल्या पुन्हा सूर वाहवा आपुल्या राष्ट्रीय गीतेचा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *❂ तू अनश्वरातील अमरे po"07
तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी
तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे
हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे
बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी
का तुला न यावी करुणा माझी देवा
तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा
दे मला आसरा तुझिया चरणापाशी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❃❝ दुष्टांचा स्वभाव ❞❃*
━━═•●◆●★★●◆●•═━━
एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.
पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..*
*कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..*
*ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..*
*आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.*
*कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ केजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?
➜रशिया.
✪ राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
➜२५ जानेवारी.
✪ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
➜सोनेगांव. ( नागपूर )
✪ मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?
➜बृहद्रथ.
✪ संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?
➜न्यूयॉर्क
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ विशेष माहिती ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❒ गोपाळ हरी देशमुख ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~१८ फेब्रुवारी १८२३
*●मृत्यू :~ ९ ऑक्टोबर १८९२*
☀ रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी
हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणा विषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.
🔷 अन्य सामाजिक कार्य
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्री ब्राउन यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.
🔷त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. सातार्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपाती पणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
🔷 गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.
🔶इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.
*💥समाजकार्य 💥*
🔹अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
🔸हितेच्छू ह्या गुजराती
नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
🔹गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
🔸पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
*💥इतर 💥*
🔹अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
🔸अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बाँबे
🔹अध्यक्ष, गुजराती बुद्धिवर्धक सभा
🔸१९७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
🔹सन १८८०मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे कौन्सिलचे सदस्य झाले.
◆ पुरस्कार ◆
💧ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि
💧१८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
💧१८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~09/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment