*09/11/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/xCSUZ5
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *09. नोव्हेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक शु.८, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~श्रवण,
योग ~वृद्धि, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:42, सूर्यास्त-18:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
09. *गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *दृष्टी आड सृ्ष्टि*
*★अर्थ ::~* जे प्रत्यक्षात नाही त्याविषयी उदासीन होणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
09. *समानशीलव्यसनेषु सख्यम् ।*
⭐अर्थ ::~
सारखा स्वभाव आणि (सारखी) संकटे असलेल्यांची मैत्री होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 09. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३१३ वा (लीप वर्षातील ३१४ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना
●२००० : न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
●१९९७ : साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान
●१९४७ : भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९३४ : कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्नामुळे लागला.
●१९३१ : एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी
●१९०४ : पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०११ : हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
◆२००५ : के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती
◆१९६७ : नटवर्य बाबूराव पेंढारकर
◆१९६२ : *महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे* – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्न
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
09. *✹दुदुंभी यशाच्या...✹*
●●●●००००००●●●●
दुदुंभी यशाच्या वाजवू संक्रांत जनमनी जागवू॥धृ॥
शिस्तशील ही हिंदू जनता
एक स्वभावे समर्थ होता
पूर्विच्या वैभवा लाजवू॥१॥
संघटनेचा हा अभिमान
संघटनेची कृती सुजाण
ब्रीद हे अंतरी वागवू॥२॥
भीती नीती एक व्यक्तिची
राष्ट्रकारणी कधी न जाची
निर्भयी वृत्ति हि दाखवू॥३॥
व्यक्ति संशयी मरणाधीन
राष्ट्रवाद सर्वांचा प्राण
अंतरी वन्ही हा चेतवू॥४॥
तत्वे उसनीयेति न कामी
जे उसने ते पूर्ण निकामी
घन तमी राष्ट्र हे हासवू॥५॥
एक ध्येय हे एक मार्ग हा
एक शासनी राष्ट्रधर्म हा
जागत्या ज्योति ह्या वाढवू॥६॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
09. *✹ ऊठ पंढरीनाथा ✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा
उठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा
अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या
फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा
पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा
दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा
भक्तराज चोखामेळा दुरून देई सादा
देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा
निघून धूर गेला अवघ्या आस-वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
09. *❃❝ अतृप्त मन ❞❃*
━━•●◆●★●◆●•━━
हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला.
लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
कुठलेही कसलेही दिवस आले तरी,अतृप्त मनाच्या मानसाचे समाधान कधीच होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
09. जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून
वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात....
लोकांच्या दृष्टिने ती "धड" नसतात, कारण ती "पड़त" असतात. पण, खर म्हणजे ती " पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता "घडत" असतात..
*- स्वामी विवेकानंद*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
09. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
➜ पहिला.
✪ भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?
➜ हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.
✪ भारताची राजधानी कोणती आहे ?
➜ नवी दिल्ली.
✪ भारताचे प्रवेशद्वार कोणते ?
➜ गेट वे ऑफ इंडिया.
✪ भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?
➜ शेती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❒ धोंडो केशव कर्वे ❒*
━━•●◆●★★●◆●•═━
समाजसुधारक,पद्मभूषण,भारतरत्न
_यांचा स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना_
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🌷🌹🌺🌹🌷🙏
◆टोपणनाव :~ अण्णा
◆जन्म : ~ १८ एप्रिल१८५८, मुरूड
*◆मृत्यू :~ ९ नोव्हेंबर १९६२*
◆चळवळ :~ स्त्री शिक्षण आणि
सामाजिक सुधारणा
◆पुरस्कार : ~ भारतरत्न
🔰 धोंडो केशव कर्वे 🔰
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांनी इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
♦स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
🔷इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली.
🔶अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबली करणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
♦अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी. लिट. देऊन सन्मानित केले. 'पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना *भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" ने सन्मानित करण्यात आले.* एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजही 'कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शनिवार ~09/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment