*10/01/24 बुधवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10.जानेवारी:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.14, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~मूळ,
योग ~ध्रुव, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:17,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
10. *कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
10. आंधळा मागतो एक डोळा,
देव देतो दोन डोळे~
*★ अर्थ ::~*
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
10. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
★अर्थ :~ सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 *★10. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील १० वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६६ : भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.
●१९२६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
●१९२० : पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
●१६६६ : सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : हृतिक रोशन – सिनेकलाकार
◆१९४० : के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
◆१९०१ : इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म
◆१९०० : मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
◆१८९६ : नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
●१९९९ : आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत
●१७७८ : कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली.
●१७६० : दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
10. *✸ हम धरती के लाल ✸*
●●●●००००००●●●●
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे
सौ-सौ स्वर्ग उतर आएँगे,
सूरज सोना बरसाएँगे,
दूध-पूत के लिए पहिनकर
जीवन की जयमाल,
रोज़ त्यौहार मनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
सुख सपनों के सुर गूँजेंगे,
मानव की मेहनत पूजेंगे
नई चेतना, नए विचारों की
हम लिए मशाल,
समय को राह दिखाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
एक करेंगे मनुष्यता को,
सींचेंगे ममता-समता को,
नई पौध के लिए, बदल
देंगे तारों की चाल,
नया भूगोल बनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
10. *❂ गोकुळिचा राजा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
गोकुळिचा राजा,माझा गोकुळिचा राजा
देवकिनंदन श्याम सुलोचन
गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
मोहन कुंजविहारी माझा
यमुनातीरी उभ्या गौळणी
रूप घेति ते नयनी भरुनी
सोडुनि जलभरणाच्या काजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
10. *❃❝ विज्ञान वादी संत ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एकदा एका ठीकाणी दशक्रिया विधी चालु असतो .लोक अजुबाजुला बसलेली असतात .घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात . शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो . एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात. आणी तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो आणी भटजी कडे विनवणी करतो की मला खुप भुक लागली आहे .दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातिल एक गोळा मला द्या .हे ऐकुन भटजी संतापतो.भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात.
तरी पण तो माणुस परत विनवणी करतो. आहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला. त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही .कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे. म्हातारा तरी ऐकेना म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात. मग म्हातारा म्हणतो स्वर्ग कुठ आहे. भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात.
(दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो. सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का काय तुला ? हे काय करतोय? त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो "बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय....
लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी
म्हातारा म्हणतो अमरावतीला लोक म्हणतात कुठ आहे अमरावती? म्हातारा म्हणतो खुप लांब आहे अमरावती लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात "आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल . यावर म्हातारा म्हणतो इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा भटजी पोचवत असेल तर मी टाकलेल पाणी माझ्या शेताला का मिळणार नाही? हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या म्हातार्याच्या पायावर डोकं ठेवतात. हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर एकही दिवस शाळेत न गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा हा होता.
वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो. म्हणुनच म्हणतो दैववादी होण्या पेक्षा विज्ञान वादी व्हा नाहीतर पुढच्या पिढ्या या कायमच गुलाम आणी दरिद्री राहतील.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
10. *जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,*
*हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे*
*अंतःकरणात जिद्द आहे*
*भावनांना फुलांचे गंध आहेत*
*डोळ्यासमोर खुले आकाश आहे*
*तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
➜ प्राणवायू. ( ऑक्सीजन )
✪ रात्रीच्यावेळी वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
➜ कार्बनडाय ऑक्साईड.
✪ एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
➜ बुंध्यावरील वलये मोजून.
✪ तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?
➜ गहू.
✪ 'कात' कोणत्या झाडापासून मिळतो ?
➜ खैर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
10. *❒ काका गाडगीळ ❒*
━═•●◆●★●◆●•═━
◆नरहर विष्णु ऊर्फ
काकासाहेब गाडगीळ◆
*●जन्म :~ १० जानेवारी १८९६,*
●मृत्यू :~ १२ जानेवारी १९६६
🔷हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.
*💥जन्म आणि शिक्षण💥*
🔶काकासाहेब गाडगिळांचा जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथे झाला. त्यांचे शिक्षण मल्हारगढ, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे झाले. बी ए. एल्एल्. बी. झाल्यावर त्यांनी पुण्यात वकिली केली. १९२०मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. ते भारताच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्यांचे मंत्री होते.
*💥राजकीय आणि सामाजिक कारकीर्द💥*
🔷काकासाहेब गाडगीळांनी व मामा देवगिरीकरांनी मिळून पुणे शहरात हिंदीचा प्रचार करणार्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.
🔹पंजाबचे राज्यपाल (१९५८ - १९६२)
🔸पुणे जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणी्सपद (१९२१ – १९२५)
🔹पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद (१९६४पासून)
🔸भारत सरकारमध्ये मंत्रिपद (१९३४ ते १९३७; १९४७ ते १९५२)
🔹भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद (१९५२ – ५४)
🔸महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, प्रवक्ते (१९३७ ते १९४५)
🔹राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व (१९५४ व १९६५)
🔸वेतन-आयोगाचे सदस्यत्व (१९४६ व १९५२)
🔹संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समितीचे सदस्यत्व (१९५३)
🔸न.वि. गाडगीळ खासदार
कार्यकाळ १९५२ – १९५७
◆ लेखन ◆
🔶 राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे.
◆ गौरव ◆
🔸पुण्यात न.वि. गाडगीळ यांच्या नावाचा नदी-पूल आहे.
🔹पुण्यातील शनिवारवाड्याजवळ काकासाहेब गाडगिळांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार~10/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment