*10/02/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10.फेब्रुवारी:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.1, पक्ष : शुक्ल पक्ष, 
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~धनिष्ठा, 
योग ~वरीयान्, करण ~किंस्तुघ्न
सूर्योदय-07:09, सूर्यास्त-18:36,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
10. *मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10. *दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ*
      *★ अर्थ ::~* दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
10. *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*
   ⭐अर्थ ::~ सर्व सत्यावर
         आधारलेले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
       🛡 *10. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ४१ वा दिवस आहे.
   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५	:	उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
●१९९६	:	आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
●१९४८	:	पुणे विद्यापीठाची स्थापना
●१९३३	:	न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
●१९२९	:	जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५	:	राजेश पायलट – केंद्रीय मंत्री 
◆१९१०	:	दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ 
◆१८९४	:	हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान 
◆१८०३	:	जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१	:	गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका 
●१९८२	:	नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक 
●१९२३	:	विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते  जर्मन भौतिकशास्त्रज्ञ 
●१९१२	:	सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद 
●१८६५	:	हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
10. *✸ भारत अमुचा देश ✸*
    ●●●●००००००●●●●
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक
आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ
धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्नी त्याचा साकारू आलेख
प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला
मित्र जगाचे सार्या होऊ, मित्र करू या त्याला
सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====
10. *❂ शुभंकरोति कल्याणम् ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम्
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10.  *❃ ▪क्षणांचे सोने.▪ ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो. 
असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.
असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीतग होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.
भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.
त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची अॅडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.
त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.
त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...
तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.
त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.
   परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण  येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!
                         ~ पु. ल. देशपांडे 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
10. "देवाकडे काही मागायचे 
   असेल तर नेहमी...
 *आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा*
         आर्शिवाद मागा...; 
     तुम्हाला कधी स्वतासाठी 
काही मागयची गरज 
पडणार नाही...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
10. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ अभयघाट.( दिल्ली )
✪  नवीन ५०० रू. चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
➜ लाल किल्ला.( दिल्ली )
✪  युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?
➜ स्वित्झर्लंड.
✪  भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
➜ ओरिसा.
✪  बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
➜ २२ जानेवारी २०१५ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
10.  *❒ जगन्नाथ शंकरशेठ ❒*
    ─┅•●●★◆★●●•┅─
    हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
      🌷🔹🌼🔹🌷
*◆जन्म :~ १० फेब्रुवारी १८०३*
◆मृत्यू :~ ३१ जुलै १८६५
🔷ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
🔶नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.
♦ एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घघाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
     🔷पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत. मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्या *जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍* 
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁शनिवार~10/02/2024❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment