*10/04/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🟢🔵🟣
🍥 *10.एप्रिल:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.2, पक्ष : शुक्ल पक्ष, 
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~भरणी, 
योग ~विष्कम्भ, करण ~बालव, 
सूर्योदय-06:25, सूर्यास्त-18:54,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
10. *शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10. *एकना धड भाराभर चिंध्या* 
      *★ अर्थ ::~* 
- एकाच वेळी अनेक गोष्टी केल्यास एकही गोष्ट चांगली होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
10. *सत्यं वद । धर्मं चर ।*
            ⭐अर्थ ::~
 खरे बोल. धर्माचरण कर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
     🛡 *★10. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०० वा (लीप वर्षातील १०१ वा) दिवस आहे.
★डॉ. पंजाबराव देशमुख पुण्यतिथी.
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५५	:	योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.
●१९१२	:	इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.
●१८७५	:	महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०७	:	मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार 
◆१९०१	:	डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते
◆१८४७	:	जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्यांना देण्यात येणार्या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक 
◆१७५५	:	डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक
    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५	:	मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्न’ 
●१९६५	:	 *डॉ. पंजाबराव देशमुख*
 – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,  
●१९३७	:	डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. 
●१३१७	:	संत गोरा कुंभार समाधिस्थ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
10. *✹तिरंगा सबसे ऊँचा रहे✹*
        ●●●●●००००००●●●●●
इस झंडे के नीचे आ हर भारतवासी कहे-
तिरंगा सबसे ऊँचा रहे।
इस झंडे को पाने के हित
हमने अगणित प्राण दिए।
आह न की बलि-वेदी पर
जब शोणित से स्नान किए।
फाँसी के तख़्ते पर झूले
ज़ुल्म अनेकों सहे। तिरंगा सबसे ऊँचा रहे।।
श्वेत, हरित, केसरिया बाना
पहन तिरंगा लहराया।
शांति, क्रांति, उन्नति का देखो,
संदेशा देने आया।
जन-जन करे प्रणाम इसे
कसकर हाथों में गहे, तिरंगा सबसे ऊँचा रहे।।
तन-मन-धन का पूर्ण समर्पण
आओ, सब करते जाएँ।
इसी राष्ट्र-ध्वज के नीचे हम
आज शपथ मिलकर खाएँ
आँच न आने देंगे इस पर,
चाहे दुनिया दहे, तिरंगा सबसे ऊँचा रहे।।
हिंदू, मुस्लिम, सिक्ख, ईसाई
एक बाग़ के फूल सभी।
भारत के उपवन की शोभा
घटने पाए नहीं कभी।
दया, अहिंसा, प्रेम-भाव की
सदा त्रिवेणी बहे, तिरंगा सबसे ऊँचा रहे।।
                  ~राममूर्ति सिंह अधीर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
10.   *❂ तुम्ही हो माता ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे...
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे...
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं...
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं...
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10.  *❃ साखर आणि माती ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••      
     एक दिवस बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला.
बादशहाने विचारले या बरणीत काय आहे'? दरबारी बोलला 'यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे'
'ते कशासाठी?' अकबर बादशहाने पुन्हा विचारले.
'माफी असावी, महाराज' दरबारी बोला. 'आम्ही बिरबलच्या बुध्दिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो, आमची अशी इच्छा आहे की, त्यांनी मातीतून साखरेचा दाणानदाणा वेगळा करावा.'
बादशहाने बिरबलकडे बघितले आणि स्मितहास्य करीत बोलले ' हे बघ, बिरबल तुझ्या समोर रोज नवीन आव्हान असतात, आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी.'
'हे तर खुपच सोपे आहे, महाराज. ' बिरबल बोलला 'हे तर लहान मुलांच्या खेळण्यासारखे आहे.'
असे म्हणत बिरबलने बरणी उचलली आणि तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले.
बिरबल बागेत गेला आणि त्याने एका आंब्याच्या झाडाखाली बरणीतील साखर व मातीचे मिश्रण पसरवले.
'हे तुम्ही काय केले?' एका दरबाऱ्याने विचारले. 'याचे उत्तर तुम्हाला उदया मिळेल' बिरबल बोलला.
दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोचले, तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपआपल्या वारूळात गेल्या होत्या, काही मुंग्या अजुनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या. 'परंतु सगळी साखर कुठे बरे गेली?' दरबाऱ्याने विचारले.
       'मातीपासुन वेगळी झाली' बिरबल बोलला.  सर्वजण हसायला लागले.
     
    बादशहाने सर्व दरबाऱ्यांना सांगीतले, 'जर तुम्हाला साखर पाहीजे असेल, तर मुंग्याच्या वारूळात जाऊन बघा'. सर्वजण जोरात हसायला लागले.
        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
      *बुध्दिमत्तेची कशीही परीक्षा घ्या, ते यशस्वी होईलच..!*    
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
10.  *दिवा मातीचा आहे की सोन्याचा*
            *हे महत्त्वाचं नसून*
    *तो अंधारात प्रकाश किती देतो*
           *हे महत्त्वाचं आहे*
   *त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की* 
      *श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
       *तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो* 
          *हे महत्त्वाचं आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
10. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
➜ अमेरिका.
✪ दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
➜ जीव - रासायनिक.
✪  सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
➜ फेदम.
✪ सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
➜ कोपर्निकस.
✪ रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
➜ टेंपिंग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10.  *💠पंजाबराव देशमुख💠*
        ┄─┅━━●✹●━━┅─┄
  स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, कृषीरत्न, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख..
डॉ. पंजाबराव देशमुख 
                 ( भाऊसाहेब देशमुख)
🔹जन्म	:~ २७ डिसेंबर १८९८
पापळ, अमरावती
🔸मृत्यू	 :~ १० एप्रिल १९६५, दिल्ली
🔹प्रशिक्षणसंस्था	:~
          श्री शिवाजी शिक्षण संस्था
         *💎पंजाबराव देशमुख*
   यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.
        *◆संक्षिप्त जीवन◆*
🔻डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम
🔸१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
🔹वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
🔻१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
🔸१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
🔹१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
🔻१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
🔸ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
🔹१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
🔻१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
🔸१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
🔹'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.
🔻१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
🔸१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
🔹लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
🔻१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
🔸देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
🔹प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
🔻१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁बुधवार ~10/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment