"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*10/08/24 शनिवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10. ऑगस्ट:: शनिवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.६, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~चित्रा,
योग ~साध्य, करण ~कौलव,
सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

10. *परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

10. *खायला काळ भुईला भार*
  *★ अर्थ ::~* निरुपयोगी मनुष्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

10.  *जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।*
   ⭐अर्थ ::~ आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

     🛡 ★ 10. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २२२ वा (लीप वर्षातील २२३ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
●१९९९ : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर
●१९९० : मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६० : देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व
◆१८९४ : व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य
◆१८५५ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक
◆१७५५ : नारायणराव पेशवा – ५ वापेशवा

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक
●१९८६ : जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते.
●१९८२ : मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली.
●१९४२ : हुतात्मा शिरीषकुमार
  (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

10. *✹उषःकाल होता होता..✹*
     ●●●●००००००●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !अरे,पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतोआमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशालाजिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

10. *❂ स्वातंत्र्याची घुमे तुतारी ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणार्‍या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

10. *❃मोलकरीण आणि कोंबडी❃*
  ━━•●◆●★★●◆●•═━
     एका मोलकरणीकडे एक कोंबडी होती. ती दररोज एक अंडे देत असे आणि त्याच्यावर मोलकरणीचा उदरनिर्वाह चांगला चालत असे. एक दिवस तिला वाटले की, या कोंबडीला जर आपण दुप्पट खाऊ घातले तर ती दोन अंडी देईल व आपल्याला दुप्पट पैसे मिळतील. म्हणून ती कोंबडीला दुप्पट खाऊ घालू लागली. हळूहळू कोंबडी लठ्ठ होऊ लागली व ती मुळीच अंडी घालेनाशी झाली.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
      होत असणारा लाभही अति हावरटपणाने होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

10. *क्षेत्र कोणतेही असो...*
*"आयुष्यात कष्टाला* पर्याय नाही, आणि *कष्ट प्रामाणिक* असले की *यशालाही पर्याय* नाही".
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

10. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

  ✪ उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
➜ लक्ष्मण गायकवाड.

✪  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
➜ रविंद्रनाथ टागोर.

✪ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
➜ ७ एप्रिल.

✪  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ कुस्ती.

✪  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
➜ आरती शहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

10. *❒ ♦ व्ही. व्ही. गिरी.♦ ❒* 
━━•●◆●★★●◆●•═━
*●जन्म :~ १०ऑगस्ट १८९४*
●मृत्यू :~ २४ जून १९८०

    ★वराहगिरी व्यंकट गिरी★
  यांचा जन्म  ओडिशात बऱ्हमपूर जिल्ह्यात झाला. स्थानिक कॉलेजात शिकल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी डब्लिनला तिथल्या विद्यापीठात गेले. पण १९१६ मध्ये काँग्रेसच्या चळवळीत व कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी ते आयर्लंडमधून भारतात परतले. भारतात रेल्वे कामगारांची पहिली देशव्यापी युनियन बांधण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केलेच, शिवाय `आयटक' या कामगार संघटनेचे ते दोन वेळा अध्यक्षही झाले. १९३७ मध्ये ते मद्रास विधानसभेचे सदस्य व कागारमंत्रीही झाले. १९४६ पर्यंत ते मंत्रिपदी राहिले.

      भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच त्यांची सिलोनमधील (आताची श्रीलंका) भारतीय उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली. १९५१ मध्ये ते संसदेवर गेले व पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री झाले. १९५७ नंतरची दहा वर्षे ते उत्तर प्रदेश, केरळ व म्हैसूर राज्यांचे राज्यपाल झाले. १९६७ मध्ये त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे दोनच वर्षांत तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांचे निधन झाले व गिरी हंगामी राष्ट्रपती बनले.

       या काळात काँग्रेसमध्ये दुहीचे वारे वाहू लागले होते. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना न जुुमानणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेसजनांचा वेगळा गट तयार झाला होता. १९६९ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्याला शह म्हणून इंदिराजींनी गिरींना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले व ते विजयीही केले. अशा तऱ्हेने केवळ राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून गिरींच्या गळ्यात देशाच्या सर्वोच्च पदाची माळ पडली.

    २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४अशी पाच वर्षे ते राष्ट्रपती होते. या काळात त्यांनी केवळ इंदिरा गांधींचे 'हुकुम' पाळले. १९७२ मध्ये गिरींनी एकतर्फी निर्णय घेऊन इंदिरा गांधींना
'भारतरत्न' बहाल केले. त्याची परतफेड इंदिरा गांधींनी गिरींना १९७५ मध्ये 'भारतरत्न' देऊन केली.

     गिरींचे २४ जून १९८० रोजी मद्रासमध्ये ह्रदयविकाराने निधन झाले. त्याच्या आदल्याच दिवशी दिल्लीत संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाल्याने गिरींच्या मृत्यूला वर्तमानपत्रांतही फारशी जागा मिळाली नाही.

    स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात गिरींनी वकिली सोडून उडी घेतली व तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासही भोगला. १९२७ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ)च्या परिषदेसाठी ते भारतीय कामगारांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले व लंडनला दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी भारतीय श्रमजीवींची भूमिका ठामपणे मांडली. १९४२च्या `छोडो भारत' चळवळीच्या काळातही यांना ब्रिटिशांनी अटक करून वेल्लोर व नंतर अमरावतीच्या तुरुंगांत डांबले. स्वतंत्र भारतात कामगारमंत्री म्हणून औद्योगिक तंटे सोडवण्यासाठी त्यांनी एक सूत्र तयार केले. ते 'गिरी अॅप्रोच' म्हणून प्रसिद्ध झाले व आजही ते वापरले जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁ शनिवार~10/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment