"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*10/09/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10. सप्टेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद शु.७, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~विष्कम्भ, करण ~गर,
सूर्योदय-06:25 सूर्यास्त-18:45,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

10. *प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10. *काखेत कळसा गावाला वळसा*
           ★ अर्थ ::~
वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् ।*
         ⭐अर्थ ::~
श्रद्धावंतालाच ज्ञान मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 *★ 10. सप्टेंबर ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक आत्महत्या प्रतिबंधकदिन
★ हा या वर्षातील २५३ वा (लीप वर्षातील २५४ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती ही स्पर्धा जिंकली.
●१९६७ : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.
●१८४६ : एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४८ : भक्ती बर्वे – अभिनेत्री
◆१९१२ : बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती
◆१८८७ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न
◆१८७२ : के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू , यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६४ : श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक
●१९२३ : सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील
●१९०० : रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10.  *✸ प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ✸*
     ●●●●●००००००●●●●●
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा---
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ----अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ---सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे--रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा--
नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ---
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले

यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती ---जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती---शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा--

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो--
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो---
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
        ~ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा

हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10. *❃विद्वत्तेने अहंकारी बनू नका❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली. 
कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे. 
वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे दिवस रात्र चालतच असतात. 
    कालिदास म्हणाले मी अतिथी आहे. पाणी मिळेल ? 
वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ? 
कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? 
वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत एक धरती आणि दुसर झाडं. धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती मधुर फळच देतात.
कालिदास आता हतबल झाले,      
कालिदास म्हणाले मी हट्टी आहे. 
     वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नखं आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच. 
कालिदास आता कंटाळले  आणि  
कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे. 
      वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर  फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.  
    कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले. 
     वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले. 
   सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका, अहंकारी बनू नका, अन्यथा हाच गर्व आणि अहंकार तुमची विद्वत्ता नष्ट करू शकतो. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.....*

*कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते*

*तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भीमा कोरेगाव हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
➜ महाराष्ट्र.

✪  स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण ?
➜ लॉर्ड रिपन.

✪  जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ?
➜ माउंट एवरेस्ट.

✪  पानिपतचे तिसरे महायुद्ध केव्हा झाले ?
➜ १७६१.

✪  जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो ?
➜ २१ मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10. *❒♦गोविंद वल्लभ पंत♦❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १० सप्टेंबर १८८७, ●मृत्यू :~ ७ मार्च १९६१
● पुरस्कार :~ भारतरत्‍न (१९५७),

    स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड़ा जिल्ह्यात श्यामली या  पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावामध्ये मूळच्या महाराष्ट्रीय कऱ्हाड़े ब्राह्मण कुटुंबात झाला.

   महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच ते काँग्रेस स्वयंसेवक म्हणून काम करीत असत.डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.

       पंत हे उत्तरप्रदेशाचे  प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. भारत सरकारने इ.स. १९५७ साली त्यांना भारतरत्न ने सन्मानीत केले.

   भारतरत्न पुरस्कार वितरणास त्यांच्याच गृहमंत्री पदाच्या करकिर्दीत सुरूवात झाली. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कुळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊ परिषदेची स्थापना केली .

७ मार्च १९६१ रोजी त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार~10/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment