"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*10/10/24 गुरूवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10.ऑक्टोबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.७, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~अतिगण्ड, करण ~वणिज,
सूर्योदय-06:31, सूर्यास्त-18:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

10. *बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

10. *घोडामैदानजवळ असणे –*
  ★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

10. *सकलगुणभूषा च विनयः ।*
            ⭐अर्थ ::~
नम्रता ही सर्व गुणांचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

🛡 ★ *10. ऑक्टोबर* ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक मानसिक आरोग्य दिन
★ हा या वर्षातील २८३ वा (लीप वर्षातील २८४ वा) दिवस आहे.
★ जागतिक मृत्यूदंड निषेध दिन
★ राष्ट्रीय टपाल दिवस

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९५४ : आचार्य अत्रे निर्मित श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : रेखा –चित्रपट अभिनेत्री
◆१९१६ : डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक 
◆१९०६ : रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण,पद्मविभूषण, साहित्य अकादमी पारितोषिक
◆१८९९ : *कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे* –संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते,
◆१८४४ : बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०२२ : मुलायम सिंह यादव- उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री, समाजवादी पार्टीचे नेते (जन्म २२/११/१९३९) 
●२०११ : जगजीतसिंग – गझलगायक
●२००० : सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
●१९८३ : रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले,
●१९६४ : वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

10. *✹तिरंगा सबसे ऊँचा रहे✹*
    ●●●●००००००●●●●
इस झंडे के नीचे आ हर भारतवासी कहे-
तिरंगा सबसे ऊँचा रहे।
इस झंडे को पाने के हित
हमने अगणित प्राण दिए।
आह न की बलि-वेदी पर
जब शोणित से स्नान किए।
फाँसी के तख़्ते पर झूले
ज़ुल्म अनेकों सहे। तिरंगा सबसे ऊँचा रहे।।

श्वेत, हरित, केसरिया बाना
पहन तिरंगा लहराया।
शांति, क्रांति, उन्नति का देखो,
संदेशा देने आया।
जन-जन करे प्रणाम इसे
कसकर हाथों में गहे, तिरंगा सबसे ऊँचा रहे।।

तन-मन-धन का पूर्ण समर्पण
आओ, सब करते जाएँ।
इसी राष्ट्र-ध्वज के नीचे हम
आज शपथ मिलकर खाएँ
आँच न आने देंगे इस पर,
चाहे दुनिया दहे, तिरंगा सबसे ऊँचा रहे।।

हिंदू, मुस्लिम, सिक्ख, ईसाई
एक बाग़ के फूल सभी।
भारत के उपवन की शोभा
घटने पाए नहीं कभी।
दया, अहिंसा, प्रेम-भाव की
सदा त्रिवेणी बहे, तिरंगा सबसे ऊँचा रहे।।
                  ~राममूर्ति सिंह अधीर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

10.   *✹ प्रभू तू दयाळू ✹*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता

जागविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्य चित्ता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा
निघे शीण सारा, मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता

ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा
तुझे नाम ओठी, नको वेद गीता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

10.    *❃❝ मानवता ❞❃*
    ━━•●◆●★●◆●•━━
     जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’ संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  ईश्‍वर भक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच खरी सेवा आहे.दुःखी लोकांचे दुःख जरी आपल्याला  कमी करता आले नाही तरी त्यांना दुःख देण्याचा प्रयत्न करु नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★★◆▣═┅━

10.    ठेच लागणार म्हणून
   *चालणं का सोडायचं..*
*दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..*
*दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..*
*आतून रडतानाही दुस-याला* *हसवायचं.*
    *ह्यालाच जगणं म्हणतात…!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
  ✪  ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली ?
  ➜ १६००

✪  'इंडियन सोशॅलिस्ट' वृत्तपत्र कोण चालवित असत ?
  ➜ श्यामजी कृष्ण वर्मा

✪  'बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक' असे कोणाला संबोधले जाते ?
  ➜ सुरेंद्रनाथ बॅनर्जी

✪  'सारे जहाॅंसे अच्छा' या गीताचे कर्ते कोण ?
  ➜ महंमद इकबाल

✪  'वंदे मातरम्' हे इंग्रजी साप्ताहिक कोणी काढले ?
  ➜ महर्षी अरविंद घोष
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

10. *❒♦श्रीपाद अमृत डांगे ❒* 
     ━═•●◆●★★●◆●•═━
◆टोपणनाव :~ कॉम्रेड डांगे
*●जन्म :~ १० ऑक्टोबर १८९९,*  नाशिक
●मृत्यू :~ २२ मे इ.स. १९९१
◆संघटना :~ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
◆प्रभाव :~ बाळ गंगाधर टिळक

          ★ श्रीपाद अमृत डांगे ★
     ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.

    कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात.

    डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे चरित्र डांगे यांच्या जीवनकार्यांचा नेमका वेध घेते. या पुस्तकतील परिशिष्टे अभ्यासकांसाठी महत्वाची आहेत.
   बानी देशपांडे हे कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणार्‍या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई- त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व त्यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते.

    कम्युनिस्ट असले तरी त्यांना इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे हिंदुस्थानी परंपरागत तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय याविषयी इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे घृणा नव्हती. त्यांचा संस्कृतचा आणि वेदान्ताचा गाढा अभ्यास होता. दोन वर्षांच्या अथक अभ्यासाअंती त्यांनी ‘युनिव्हर्स ऑफ वेदान्त’ हे पुस्तक लिहिले.

    कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. डायलेक्टिक्स वेदान्तात आहे, असे बानींनी पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाला कॉ. डांगे यांनी प्रस्तावना दिल्यामुळे डांगे यांच्यावर कम्युनिस्टांनी त्यावेळी सडकून टीका केली होती. मात्र तरीही डांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

     पक्षाध्यक्षपदी कॉ. डांगे या प्रकरणात डांगे यांच्या लोकसभेतील संस्मरणीय कामगिरी आपल्यासमोर येते. डांगे यांच्यासमोर कोणती आव्हाने होती हे देखील लक्षात येते. नव्या पिढीला डांगे याचे कर्तुत्व समजून घेण्यासाठी हे चरित्र महत्वाचे ठरावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~10/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment