Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10. डिसेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.१०, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~उत्तराभाद्रपदा, 
योग ~व्यतीपात, करण ~तैतिल, 
सूर्योदय-07:01, सूर्यास्त-18:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
10. *वाचनासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10. *भरंवशाच्या म्हशीला टोणगा –* 
  *★ अर्थ ::~* पूर्ण निराशा करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
10. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
          ⭐अर्थ ::~
 उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
       🛡 *10. डिसेंबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक मानवी हक्क दिवस
★ हा या वर्षातील ३४४ वा (लीप वर्षातील ३४५ वा) दिवस आहे.
★ अल्फ्रेड नोबेल दिवस
   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१४	:	भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
●२००८	:	प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
●१९०६	:	अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
●१९०१	:	नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९२	:	व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक 
◆१८८०	:	डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. 
◆१८७८	:	चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, 
◆१८७०	:	सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१	:	अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार 
●१९६३	:	सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित 
*●१८९६	:	अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते* (जन्म: २१ आक्टॊबर १८३३)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━
10.   *✹ ऐ मेरे प्यारे वतन ✹*
     ●●●●००००००●●●●
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए 
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को 
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी 
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी 
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को 
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
                   ~प्रेम धवन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====
10. *✹ सत्यम् शिवम् सुंदरा ✹*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम् शिवम् सुंदरा
शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा
विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा
होऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10.  *💠 लांडगा व कुत्रा  💠*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला.
     त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, 'तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचं कारण तरी काय ? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.' कुत्रा म्हणाला, 'अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.' त्यावर लांडग्याने विचारले, 'तू काय करतोस ?' 
       कुत्रा म्हणाला, 'दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.' लांडगा म्हणाला, 'एवढंच ना ? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरं काय पाहिजे ?'
       याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असतां कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, 'मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?' कुत्रा म्हणाला, 'अं हं. ते काही नाही.' लांडगा म्हणाला, 'तरी पण काय ते मला कळू देत.' कुत्रा म्हणाला, 'अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो, पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेनं वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तूही सुखी होशील.'
       ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, 'अरे, असा पळतोस काय?' लांडगा दुरूनच म्हणाला, 'नको रे बाबा मला ते सुख, ते तुझं तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसं वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखं बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केलं तर ते राजेपणदेखील मला नको !'
          *_🌀तात्पर्य_ ::~*
   *स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
10.  *ज्या गोष्टीचा उदय आहे*
 *त्याचा अंत ही निश्चित आहे* ,
    *मग ती निराशा असो, दुःख असो वा पराभव... फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडू नये..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
 ✪ 'इन्कलाब जिंदाबाद' या घोषणेचे जनक कोण आहेत ?
  ➜ महंमद इकबाल.
 ✪  भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती कोणत्या गव्हर्नरने सुरू केली ?
  ➜ लाॅर्ड बेटिंक.
 ✪  खिलाफत चळवळ कोणी सुरू केली ?
  ➜ अलीबंधू व मौलाना आझाद.
 ✪  पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला ?
 ➜ १८१८.
 ✪  सुभाषचंद्र बोसांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
  ➜ फाॅरवर्ड ब्लाॅक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
10.   *✴ आल्फ्रेड नोबेल ✴*
     ◥◤◥◤◥◤◥◤◥◤◥◤
             *स्वीडिश शास्त्रज्ञ*
   *आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन*
          🌺💐🙏💐🌺
🔹जन्म :~ २१ ऑक्टोबर १८३३
🔸मृत्यू :~ १० डिसेंबर१८९६
आल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश शास्त्रज्ञ होता. नोबेलचा जन्म ऑक्टोबर २१, १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.
    डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.
इ.स. १९५८ साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले.
१० डिसेंबर १८९६ रोजी नोबेलचा मृत्यू झाला.
 *◆अल्फ्रेड नोबेल यांचे मृत्यूपत्र*
      मी डॉ.अल्फ्रेड बर्नाड नोबेल 27 नोव्हेंबर 1985 पर्यंत अस्तित्वात असलेल्या माझ्या सर्व चल अचल संपत्तीचे असे मृत्यूपत्र करतो की, त्याचे धनात रूपांतर करण्यात यावे , तयार झालेल्या धन संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी ज्या व्यक्तीने मानवी कल्याणासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे अशांना पुरस्कार दिला जावा.
  दरवर्षी 10 डिसेंम्बर आल्फ्रेड नोबेल याच्या पुण्यतिथी निमित्त या पूरस्काराचे वितरण केले जाते.
नोबेल पुरस्काराची रक्कम 10 ते 12 कोटी च्या घरात आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁मंगळवार~10/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment