"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*10/11/24 रविवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10. नोव्हेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक शु.९, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~ध्रुव, करण ~बालव,
सूर्योदय-06:42, सूर्यास्त-18:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

10. *सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10. *अंथरूण पाहून पाय पसरावे –*
  ★ अर्थ ::~ ऎपत पाहून खर्च करवा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *सर्वेऽपि सुखिन: सन्तु ।*
          ⭐अर्थ ::~
जगात सगळे सुखी असोत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   🛡 ★ 10. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ शिवप्रताप दिन
★जागतिक विज्ञान दिन
★ हा या वर्षातील ३१४ वा (लीप वर्षातील ३१५ वा) दिवस आहे.    

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड
●१९९९ : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर
●१९९० : भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
●१६५९ : शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५२ : सुनंदा बलरामन ऊर्फ सानिया – लेखिका
◆१९०४ : कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, 
◆१८४८ : सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
●१९९६ : माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’
●१९४१ : लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार
●१९२० : दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10.  *✹जहाँ डाल-डाल पर✹*
       ●●●●●००००००●●●●●
जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा

अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा

जब आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा
                         ~ राजेंद्र किशन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10.    *❂ मन विजय करें  ❂*
     ━━═●✶✹★★✹✶●═━━
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना..

भेदभाव, भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके,
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सकें, 
झूठ से बचे रहें, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना …

मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर 
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10.     *❃❝ गर्वहरण ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूड तोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10.  *"पोटात गेलेले विष हे फक्त"*
         "एका माणसाला मारते"
      *"पण... कानात गेलेले"*
         "विष हे हजारो"
      *"नाते संपवून टाकते"*
"म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर"
      *"विश्वास ठेवण्यापेषा"*
      "स्वत: च्या पाहण्यावर"
            *"विश्वास ठेवा.".*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  डिझेल इंजिनचा शोध १८९३ मध्ये कोणी लावला ?
  ➜ रूडाॅल्फ डिझेल.

✪  ईव्हीएम मशीन कशावर चालते ?
  ➜ सिंगल अल्काईन बॅटरी.

✪  निवडणुकीत बोटाला लावण्यात येणारया शाईमध्ये कोणता घटक असतो ?
  ➜ सिल्व्हर नायट्रेट.

✪  कोणताही दाता एकाच वेळी किती रक्तदान करू शकतो ?
➜ ४५० मिली.

✪  मानवी डोळा कोणत्या भिंगासारखे कार्य करतो ?
  ➜ बहिर्वक्र भिंग.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ आजचे विशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

10. *❒जागतिक विज्ञान दिन ❒*      ━━═•●◆★◆★◆●•═━━
     १० नोव्हेंबर या दिवशी 'जगातील शांतता आणि विकास' या विषयावर 'जागतिक विज्ञान दिन' साजरा केला जातो. हा दिवस समाजात विज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि उदयोन्मुख वैज्ञानिक समस्यांवर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज यावर भर देतो. या दिवसाचा हेतू नागरिकांना विज्ञान मध्ये विकासा विषयी माहिती दिली असल्याचे सुनिश्चित करण्याचा आहे. हा दृष्टिकोन वाढवण्यासाठी वैज्ञानिक भूमिका बजावतात ती भूमिका लोकांसमोर आणायला हा दिवस साजरा केला जातो.

     ★शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन उद्देश :~

• शांततापूर्ण आणि टिकाऊ समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेवर जन जागरूकता बळकट करणे.
• देशांमधील सामायिक विज्ञानांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकता वाढवणे.
• समाजाच्या फायद्यासाठी विज्ञान वापरण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे नूतनीकरण करणे.
• विज्ञानासमोर आलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे आणि वैज्ञानिक प्रयत्नांना आधार देणे.

     या दिनाची सुरुवात १९९९ साली यूनेस्को आणि बुडापेस्ट मधील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विज्ञान संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान परिषदेच्या पाठोपाठ शांती व विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस तयार करण्यात आला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार ~ 10/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment