*11/01/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *11.जानेवारी:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~अमावस्या,
नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~व्याघात, करण ~नाग,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:17,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
11. *परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
11. *टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही*
*★अर्थ ::~*
- कष्टाशिवाय मोठेपणा येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
11. *शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।*
⭐अर्थ ::~ शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
🛡 *★11. जानेवारी ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील अकरावा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
●१९९९ : ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
●१९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
●१९६६ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
●१७८७ : विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
◆१९४४ : शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
◆१८५९ : लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
◆१८५८ : श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक
●१९९७ : भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
१९८३ : घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी
●१९६६ : स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.
●१९५४ : सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
11. *✸ भारत माझा ✸*
●●●●००००००●●●●
भारत सुंदर माझा,
स्वप्नातल्या स्वर्गापरी,
अभिमान मज त्याचा,
जन्मलो मी या भूवरी।
भेदभाव ना कोणता,
धर्म,पंथ विविधता,
एकोप्याचा वाहे झरा,
सर्वधर्म सहिष्णूता।
भारत माझा हा देश,
पाईक मी हो त्याचा,
राष्ट्रभक्ती हृदयी माझ्या,
राखे मान तिरंग्याचा।
जगात सुंदर देश,
हा माझा आहे भारत,
संस्कृतीने भारताच्या,
जग सारे प्रभावित ।
*~ अर्चना वासेकर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
11. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥
उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥
शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥
स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥
धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥
सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
11. *❃❝ शिंपले ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
एकदा आतले मांस काढून घेतलेला एक मोठा शिंपला समुद्रकिनाच्यावर पडला होता. तो सूर्यप्रकाशात चकाकत होता. तो शिंपला पाहून एक लहान शिंपला तेजस्वी नि सुंदर आहे, पाहिलास का ? सौंदर्यात व चकचकीतपणात याची बरोबरी समुद्रात दुसरा कोणीही करू शकणार नाही. आई, मी याच्याइतका मोठा होऊन याच्यासारखं दिसायला अजून किती वर्ष लागतील कोण जाणे !' इतकी वर्ष वाट पाहता पाहता मी अगदी कंटाळून जाईन. त्यावर त्याची आई म्हणाली, 'अरे वेडया पोरा ! ह्या शिंपल्याची अशी स्थिती होण्यास त्याचं सौंदर्यच कारण झालं आहे, हे लक्षात आहे ना ? तू जर ह्याच्यासारखा लठ्ठ होऊन चकाकू लागशील तर तुझं मांस खाण्यासाठी लोक तुला मारून टाकतील. तेव्हा जो मोठेपणा तुझ्या नाशाला कारण होईल त्याची अपेक्षा तू कशाला करतोस ?'
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
लहानपण दे गा देवा ।
न चले कोणाचाही हेवा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
11. *"आई" शिक्षित असो किंवा अशिक्षित..,*
*जेव्हा तुम्ही जीवनात "अपयशी" होता तेव्हा*
*तिच्या सारखा "मार्गदर्शक" या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ दुध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते ?
➜ लॅक्टोज.
✪ अनुवांशिकता व गुण सातत्याची माहिती कशात सामावलेली असते ?
➜ डी.एन.ए
✪ 'ब' जीवनसत्व एकूण बारा प्रकारची आहेत.त्यांना काय म्हणतात ?
➜ बी-काॅम्लेक्स.
✪ 'मधुमेह' झालेल्या रोगास कोणते औषध दिले जाते ?
➜ इन्स्युलिन
✪ हवेच्या प्रदुषणामुळे अलीकडे कोणत्या रोगाचे प्रमाण वाढले आहे ?
➜ फुफ्फुसांचा कर्करोग.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
11. *❒ लाल बहादूर शास्त्री ❒*
━━═•●◆●◆●◆●•═━━
स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान,
*”जय जवान जय किसान”* हा मंत्र देणारे, मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आलेले.
अशा या महान नेत्यास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ २ आक्टोबर १९०४
*●मृत्यू :~ ११ जानेवारी १९६६*
भारत देशाला
*”जय जवान जय किसान”* हा मंत्र देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला. त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.
महात्मा गांधी यांचा जन्म व शास्त्री जीचा चा जन्म एकाच तारखेला येतो. त्यांचे विचारहि एकच होते. महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, ‘
भारतातील जनता दालीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनीअगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा.’ महाराजांच्या श्रीमंतीची घानाघात करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. व ते देश प्रेमाने प्रेरित झाले. त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. त्यांना ज्ञान सम्पाद्नाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. १९२७ साली ललितादेवी यांचेशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा संसार त्यांनी उत्तम रितीने केला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीनचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिकठीकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे दुसर्या देशापासून काय घेण्या सारखे हे त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूजिंचा अंत झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले. शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असलातरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली.
”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.”
लाल बहाद्दूर शास्त्री कॉंग्रेस चे सरचिटणीस असताना त्यांना दरमहा ६० रुपये पगार होता , जो ते आपल्या पत्नी कडे देत आणि त्या मध्ये त्यांचा सगळा खर्च चालत असे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्या कडे आला , त्याच्या मुलाच्या शस्त्रक्रिये साठी त्याला ६० रुपये उसने पहिले होते, त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले..., शास्त्रीजी म्हणाले कि माझा पगाराच तेव्हडाच आहे, ज्या मध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जमतेम भागतो मी तुला कुठून पैसे देऊ ? शास्त्रीजींची पत्नी हे ऐकत होती , त्या म्हणाल्या त्याची आजची गरज महत्वाची आहे , माझ्या कडे ६० रुपये आहेत आपण ते त्यांना द्या. शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले. तो मित्र गेल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला विचारले कि हे पैसे तू कुठून आणलेस ? त्या म्हणाल्या तुमच्या दर महिन्यातील पगारातून मी ५ रुपये साठवत होते त्याचे १ वर्षाचे असे साठलेले , ६० रुपये माझ्या कडे होते. ...त्या नंतर लाल बह्हादूर शास्त्री यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि स्वतःचा पगार ५५ रुपये करण्याची विनंती केली....त्यांनी असे लिहिले कि माझा महिन्याचा खर्च ५५ रुपयात भागतो ...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁गुरूवार~11/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment