"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*11/02/19 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 11/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *11. फेब्रुवारी:: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
            माघ शु. ६
     तिथी : शुक्ल पक्ष षष्ठी,
            नक्षत्र : अश्विनी,
     योग : शुभ,  करण : तैतिल,
सूर्योदय : 07:09, सूर्यास्त : 18:37,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

11. *दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *आयत्या बिळावर नागोबा*
      *★ अर्थ ::~* दुसऱ्याच्या श्रमाचा आयता फायदा घेणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

11.   *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
  ⭐अर्थ :: ~ योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *11. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४२ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°H पडले.
●१९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
●१९९० : २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
●१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
●१८३० : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
●१८१८ : इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री
◆१९३७ : बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
◆१८४७ : थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
◆१८०० : हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी
●१९७७ : फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.
●१९४२ : जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
●१६५० : रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]     ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

11.  *✸ भारत देश महान ✸*
     ●●●●●००००००●●●●●
भारत देश महान अमुचा
भारत देश महान
स्फूर्ती देतील हेच आमुचे
राम कृष्ण हनुमान ll धृ ll

व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुख समृद्धी निधान ll १ ll

चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान ll २ ll

धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सिमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान ll ३ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. *❂ हे करुणाकरा ईश्वरा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11.     *❃  एकाग्रता  ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. माणसांची नाती हि गोंडस रोपांसारखी असतात,
त्यांना प्रेमाचे पाणी घातले
जिव्हाळ्याचे जिवामृत दिले
सन्मानाचा सूर्यप्रकाश दिला
तर रोप बहरू लागते,
यात काटकसर केली की
ते कोमजू लागते...;
     *चला नाती रोपांप्रमाणे फुलवू या अन येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवू या...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. *भारतातील महत्वाची सरोवरे*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1) *लोणार सरोवर =*
                    महाराष्ट्र =
      उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

2) *हुसेनसागर सरोवर =*
      आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

3) *सांबर सरोवर =*
          राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11.  *❒ दत्तात्रेय राईलकर ❒*
     ┄─┅•●●★◆★●●•┅─┄

    दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर (इ.स. १९२१ - १७ मे, इ.स. २०१६) हे एक मराठी कीर्तनकार होते.

    राईलकरबुवा यांनी कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून कीर्तन करणे सुरू केले. गायनाची उत्तम तयारी, वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असल्याची राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुणे आकाशवाणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्रांवरील पहिले कीर्तन राईलकर बुवांनी केले.

   महाराष्ट्र तसेच देशभर फिरून त्यांनी कीर्तन केले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राईलकर यांना कमलाकरबुवा औरंगाबादकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तन सार्वभौम, कीर्तन केसरी, अशा विविध पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारतर्फे २८ फेब्रुवारी २०१३ रोजी एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ सोमवार ~ 11/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment