"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*11/03/19 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 11/03/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *11. मार्च:: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
            फाल्गुन शु. ५
      तिथी : शुक्ल पक्ष पंचमी,
            नक्षत्र : भरणी,
       योग : एन्द्र, करण : बव,
सूर्योदय : 06:50, सूर्यास्त : 18:47,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

11. *जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *चिंती परा ते येई घरा*
      *★ अर्थ ::~*
- दुसऱ्याचे वाईट व्हावे असे चिंतणाऱ्याचेच वाईट होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

11.    दुर्जनः परिहर्तव्यः
     विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।
★अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

         🛡 *11. मार्च* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ७० वा (लीप वर्षातील ७१ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
●२००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.
●२००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
●१८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८६३ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली
◆१९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज
◆१९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू
◆१९१२ : शं. गो. साठे – नाटककार

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष
●१९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते,
●१९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ
●१६८९ : छत्रपती संभाजी महाराज (जन्म: १४ मे १६५७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✸ अंतरी अपुल्या✸*
      ●●●●००००००●●●●
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥

🎹 सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥

🎹 परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥

🎹 शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥

🎹 घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥

🎹 सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

11.  *❂ तेजोमय नादब्रह्म हे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तेजोमय नादब्रह्म हे
रुणझुणले काळजात, लखलखले लोचनांत
अंबरात, अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे

कुसुमांच्या हृदयातून स्‍नेहमयी अमृतघन
चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *❃ कोल्हा आणि म्हातारी ❃*
           ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    *एके दिवशी एक कोल्हा* संध्याकाळी पक्ष्यांची शिकार करीत शेतातून चालला असता, जवळच कोंबडी मारून वनभोजन करीत बसलेल्या काही मुली त्याला दिसल्या.
        त्यांना तो म्हणाला, 'मुलींनो ह्या कोंबड्या तुम्हीच मारून खात आहात म्हणून ठीक, नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर ह्या कोंबड्या अशा मारून खाल्ल्या असत्या तर तुम्ही त्याच्यामागे शिकारी कुत्रे लावून त्याला पकडून त्याचा जीव घेतला असता.
         हे ऐकून जवळच एक म्हातारी बसली होती ती त्याला म्हणाली, 'अरे मूर्खा, आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो नि तू लोकांच्या कोंबड्या मारून खातोस, हा फरक जर तुझ्या लक्षात आला असता, तर तू हे बोलला नसतास !'

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *स्वतःच्या वस्तूची वाटेल तशी विल्हेवाट करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे, पण दुसर्‍याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणासही नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. *प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच*
    *तसेच मन व विचार सैरभैर असताना  मार्ग कधीच मिळत नाही,*
     *शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. *■■ प्रश्नमंजुषा ■■*
    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ *भारतातील पहिला अंतराळवीर कोण?*
➡.  राकेश शर्मा

★ *अवकाशयात्री पहिली महिला कोण?*
➡.   कल्पना चावला

★पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡.   सुश्मिता सेन

★ *भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?*
➡.   सौ.प्रतिभाताई पाटील

★ *महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?*
➡.    ९.७ %
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *❒ सयाजीराव गायकवाड ❒*
         ┄─┅•●●★◆★●●•┅─
   तिसरे सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थानचे अधिपती.

🔸पूर्ण नाव :~ गोपाळराव ऊर्फ
      सयाजीराव गायकवाड
*🔹जन्म :~ ११ मार्च १८६३*
कवळाणे (नाशिक जिल्हा)
🔸मृत्यू :~ ६ फेब्रुवारी १९३९, मुंबई

   ♦ महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१- १९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
 
   🔶दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली.

     🔷सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना *‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’* च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

    ♦बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.

    🔶त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ सोमवार ~ 11/03/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment