"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*11/03/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *11.मार्च:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.1, पक्ष : शुक्ल पक्ष,
        तिथि ~प्रतिपदा,
   नक्षत्र ~उत्तराभाद्रपदा,
योग ~शुभ, करण ~बव,
सूर्योदय-07:09, सूर्यास्त-18:36,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

11. *हिरा हि-यालाच कापू शकतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *चिंती परा ते येई घरा*
      *★ अर्थ ::~*
- दुसऱ्याचे वाईट व्हावे असे चिंतणाऱ्याचेच वाईट होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

11.    दुर्जनः परिहर्तव्यः
     विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।
★अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

         🛡 *11. मार्च* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ७० वा (लीप वर्षातील ७१ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
●२००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.
●२००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
●१८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८६३ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली
◆१९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज
◆१९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष
●१९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते,
●१९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ
*●१६८९ : छत्रपती संभाजी महाराज*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

11. *✸ अंतरी अपुल्या✸*
   ●●●●००००००●●●●
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥

🎹 सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥

🎹 परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥

🎹 शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥

🎹 घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥

🎹 सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

11.  *❂ तेजोमय नादब्रह्म हे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तेजोमय नादब्रह्म हे
रुणझुणले काळजात, लखलखले लोचनांत
अंबरात, अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे

कुसुमांच्या हृदयातून स्‍नेहमयी अमृतघन
चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *❃ कोल्हा आणि म्हातारी ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    *एके दिवशी एक कोल्हा* संध्याकाळी पक्ष्यांची शिकार करीत शेतातून चालला असता, जवळच कोंबडी मारून वनभोजन करीत बसलेल्या काही मुली त्याला दिसल्या.
        त्यांना तो म्हणाला, 'मुलींनो ह्या कोंबड्या तुम्हीच मारून खात आहात म्हणून ठीक, नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर ह्या कोंबड्या अशा मारून खाल्ल्या असत्या तर तुम्ही त्याच्यामागे शिकारी कुत्रे लावून त्याला पकडून त्याचा जीव घेतला असता.
         हे ऐकून जवळच एक म्हातारी बसली होती ती त्याला म्हणाली, 'अरे मूर्खा, आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो नि तू लोकांच्या कोंबड्या मारून खातोस, हा फरक जर तुझ्या लक्षात आला असता, तर तू हे बोलला नसतास !'

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *स्वतःच्या वस्तूची वाटेल तशी विल्हेवाट करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे, पण दुसर्‍याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणासही नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

11. *प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच*
    *तसेच मन व विचार सैरभैर असताना  मार्ग कधीच मिळत नाही,*
     *शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

11. *■■ प्रश्नमंजुषा ■■*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
★ *भारतातील पहिला अंतराळवीर कोण?*
➡.  राकेश शर्मा

★ *अवकाशयात्री पहिली महिला कोण?*
➡.   कल्पना चावला

★पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡.   सुश्मिता सेन

★ *भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?*
➡.   सौ.प्रतिभाताई पाटील

★ *महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?*
➡.    ९.७ %
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *❒ ♦छत्रपती शंभुराजे♦ ❒* 
     ━═•●◆●◆●◆●•═━
   *11 मार्च क्षाञवीर संभाजीराजे बलिदान दिन छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 
    *रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा...!!*

●जन्म :~ १४ मे १६५७
*●मृत्यु :~ ११ मार्च १६८९*

       मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले.शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते.वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा,श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले.या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते.शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता,थोरले महाराज निधन पावले.महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले.त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला.या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले.रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला;परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले.शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले.या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता.बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता.आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते.म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले.पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात.शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते.छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते.आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती.

     शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती.या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी,पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते.हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही  विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच.या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते.अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजी राजांचेच हवे.एेर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.

     वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजी राजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली.पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले.देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली.

   *क्षाञवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र शिव अभिवादन..*
        जय शंभुराजे...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~11/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment