"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*11/04/19 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
    *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
      🌀  तर्फे आयोजित 🌀
*"शिक्षक सेवासन्मान पुरस्कार"*
  ★ दिनांक :~ ३१ मे २०१९ ला
*तापडिया नाट्यमंदिर औरंगाबाद*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 11/04/2019 ❁*
      *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

   https://goo.gl/xCSUZ5
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *11. एप्रिल:: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
                चैत्र शु. ६
     तिथी : शुक्ल पक्ष षष्ठी,
          नक्षत्र : मृगशीर्ष,
   योग : शोभन, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:25, सूर्यास्त : 18:54,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

11. *तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *ओळखीचा चोर जीवे न सोडी*
      *★ अर्थ ::~* 
- ज्याला आपले वर्म माहित आहे तोच आपले नुकसान करतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
          ⭐अर्थ ::~
 उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★11. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक पार्किन्सन दिवस
★ हा या वर्षातील १०१ वा (लीप वर्षातील १०२ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : अण्वस्त्रमारा करू शकणार्‍या ’अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
●१९९२ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
●१९८६ : हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला.
●१९७० : अपोलो-१३ चे प्रक्षेपण झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७ : रामनाथन कृष्णन – लॉनटेनिस खेळाडू, पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते
◆१९०६ : डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक. भारतात आधुनिक भाषाशास्त्राची प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य 
◆१८६९ : कस्तुरबा गांधी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)
◆१८२७ : जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत 

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित 
●१९२६ : ल्यूथर बरबँक – अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व कृषीतज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✸ जय भारता जय भारता ✸*
       ●●●●●००००००●●●●●
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित्‌ तारता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

11.       *❂ देह मंदिर ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11.  *❃❝ माणसाची पारख ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     हिवाळा चालू असल्यामुळे थंडीच्या दिवसांत एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, 
    "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये."
    जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सारख्याच  असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. रंग , ठेवण, सारख्याच  प्रकाशमान !! 
   राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत."
तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे."
आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय"
    राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे"
     सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?
    यावर हसून अंध म्हणतो, "सोपे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही"
     टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो. 

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड अर्थात शांत  राहतो तो "हिरा" समजावा. परिणामी अशांमुळेच आयुष्याचे सोने होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

11. *दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते*
*आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते*

*जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!*

*शेवटी काय.. हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

11.   *✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑   
■ अक्षय ऊर्जा दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 20 ऑगस्ट
■ जागतिक जलदीन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर : 22 मार्च
■ पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे?
उत्तर : 71 %
■ तांब्याचा द्रावनांक किती?
उत्तर : 1082 ℃
■ पऱ्याचा उत्कलनांक किती?
उत्तर : 357 ℃
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

11. *❒ महात्मा ज्योतिबा फुले ❒*
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। 
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। 
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। 

या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
   🌹🌷🌺🏵🌺🌷🌹
      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
      *तेथे कर माझे जुळती ..!!*
  🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

*●जन्म :~ ११ एप्रिल १८२७*
    कटगुण, सातारा,महाराष्ट्र
●मृत्यू :~ २८ नोव्हेंबर १८९०
            पुणे, महाराष्ट्र

●वडील : गोविंदराव फुले
●आई : चिमणाबाई गोविंदराव फुले
●पत्नी : सावित्रीबाई फुले

     *★महात्मा जोतीबा फुले◆*
   हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.

         ◆ सामाजिक कार्य ◆
   सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितां कडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 

     जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

     वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ गुरुवार ~ 11/04/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment