"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*11/08/24 रविवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *11. ऑगस्ट:: रविवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.७, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~चित्रा,
योग ~शुभ, करण ~गर,
सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

11. *जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11.   *मऊ सापडले म्हणून*
     *कोपराने खणू नये –*
   ★ अर्थ ::~   एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *श्व:कार्यमद्य कुर्वीत ।*
         ⭐अर्थ ::~
     उद्याचे काम आज करावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 ★ 11. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २२३ वा (लीप वर्षातील २२४ वा) दिवस आहे.

         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१३ : डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
●१९९९ : बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.
●१९९९ : शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
●१९७९ : गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
●१९६१ : दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
●१९४३ : सी. डी. देशमुख हे ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४३ : जनरल परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष
◆१९२८ : विनायक सदाशिव तथा वि. स.वाळिंबे – लेखक व पत्रकार
◆१९२८ : रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान
◆१९११ : प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते
●१९७० : इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ
●१९०८ : खुदिराम बोस – क्रांतिकारक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✸ उधळीत शतकिरणां ✸*
        ●●●●●००००००●●●●●
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया

थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी

चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *❂ अनंता तुला कोण पाहु ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.

तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"

फुले सृष्टीची मानसा रंजिती,
घरी सोयरी गुंगविती मती,
सुखे भिन्‍न ही, येथ प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ?

तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषू शके ?

नवी भावपुष्पे तुला वाहिली,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू ! कल्पना जल्पना त्या हरो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11.  *❃❝ कासव हंसाची मैत्री❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       "एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.
खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.
एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.
‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.
मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.
‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.
कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’
ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.
शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’
हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’
‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.
हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’
कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.
शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.

           *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11.     ज्याच्या घरची तुळस
      फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
*जिथे माणुसकीची शिकवण असते,*
      *तिथे माणसांची कमी नसते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
➜ साधना आमटे.

✪ भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहा-
लय कोठे आहे ?
➜ कोलकाता.

✪ जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
➜ २९ जुलै.

✪ मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ नेमबाजी.

✪ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
➜ रझिया सुलताना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11. *❒ ♦खुदीराम बोस♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ३ डिसेंबर १८८९
*●स्मृतिदिन :~ ११ ऑगष्ट १९०५*

   *भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक* यांचा आज स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!!
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

            ◆ खुदीराम बोस ◆
      भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

     बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली. यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.
     घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला ११ ऑगस्ट १९०५
या दिवशी फासावर जावे लागले.

     *सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ रविवार~11/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment