"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

11/12/24 बुधवारचा परिपाठ

Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *11. डिसेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.११, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~रेवती,
योग ~वरीयान् , करण ~वणिज,
सूर्योदय-07:01, सूर्यास्त-18:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

11. *मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11. *आत फिरे तिथे लक्ष्मी फिरे*-
            *★ अर्थ ::~*
  ज्या घरी स्वच्छता असते त्या घरी धनधान्य,संपत्ती भरपूर असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

11. *गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।*
   ⭐अर्थ ::~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 11. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३४५ वा (लीप वर्षातील ३४६ वा) दिवस आहे.

  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆•••°°~°°•••🔹
●२००१ : चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
●१९७२ : अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
●१९४६ : युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
●१९३० : सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९ : विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
◆१९४२ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
◆१९२५ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
◆१९२२ : मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), 
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते 
●१८९९ : पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक

  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०१२ : *पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’*
●२००४ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका
●२००२ : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
●२००१ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
●१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे आधुनिक राष्ट्रकवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

11. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*
    ●●●●००००००●●●●
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

11.    *❂ दीप दर्शन ❂*
   ━━═●✶✹★★✹✶●═━━
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते॥

दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

11.  *❃❝ स्वार्थ/ मोह ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
     एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या
पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.

     कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.

     पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता
तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.

     पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,

    "भाऊ !! ....... तुम्ही मघाशी मला  तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."

    कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?"
       पुजारीबाबा हो म्हणाले.

    त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे.

    महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.

     पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *स्वार्थ,मोह हा वाईट असतो*, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो.त्यामुळे नेहमी प्रामाणिक रहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

11.  *जगातील सर्वात सुंदर व अप्रतिम संगीत म्हणजे आपल्या ह्रदयातील हार्ट्बीट्स होय.!!*
     कारण...  ह्याला साक्षात परमेश्वराने कंपोझ केले आहे. म्हणुन नेहमी हृदयाचे ऐका.!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?
  ➜ पाटलीपुत्र.

✪  जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?
  ➜ १ मे.

✪  जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता ?
  ➜ पॅसिफिक महासागर.

✪  खान अब्दुल गफारखान यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
  ➜ खुदा-ई-खिदमदगार.

✪  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?
➜ रायगड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

11.   *❒  पंडित रविशंकर  ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
    *भारतीय संगीतज्ञ,  सतार श्रेष्ठतम वादक, ’भारतरत्‍न’*
   अशा या महान संगीतज्ञास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
      🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

◆जन्मनाव :~ रवीन्द्र श्याम शंकर चौधरी
◆टोपणनाव :~ रबू
●जन्म :~ ७ एप्रिल १९२०
     वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
*●मृत्यू :~ ११ डिसेंबर  २०१२*
सॅन डियेगो अमेरिकेची संयुक्त संस्थाने
◆राष्ट्रीयत्व :~ भारतीय
◆कार्यक्षेत्र :~ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
◆संगीत प्रकार :~ सतारवादन
◆कार्यकाळ :~ १९३९ ते  २०१२

  🔘पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार, पद्मभूषण(१९८१), भारतरत्न(१९९९)

         *♦पंडित रविशंकर♦*
   🔹हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे गिनेस रेकॉर्ड (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) त्यांच्या नावावर आहे.

            ◆ संगीत जीवन ◆
    🔸१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.

    🔹रविशंकर यांनी १९३९ साली अहमदाबाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच त्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,धरती के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहाँसे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.

    🔸इ.स. १९४९ साली रविशंकर दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. इ.स. १९५० ते इ.स. १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपूर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.

  🔹 पंडित रविशंकर यांनी मुंबईत इ.स. १९६२ साली व लॉस ॲन्जेलिस येथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापन केली.

      ◆पुरस्कार व सन्मान ◆
●१९६२ साली भारतीय कलेचे सर्वोच्च सन्मान पदक राष्ट्रपती पदक;
●१९८१ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण;
●१९८६ साली भारताच्या राज्यसभेचे सदस्यत्व ;
●१९९८ साली स्वीडनचा पोलर म्युझिक प्राइज (रे चार्ल्‌स सोबत)
भारत सरकारकडून पद्मविभूषण
भारत सरकारकडून देशिकोत्तम
●१९९९ साली भारत सरकारकडून भारतरत्न;
●२००० साली फ्रेन्च सर्वोच्च नागरी सन्मान लिजियन ऑफ अनार;
●२००१ साली राणी दुसरी एलिजाबेथ यांच्याकडून ऑनररी नाईटहूड;
●२००२ साली भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सचे लाइफ टाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड;
●२००२ चे २ ग्रॅमी पुरस्कार;
●२००३ साली आय.ई.एस.पी.ए. डिस्टिंगविश्ड आर्टिस्ट ॲवार्ड, लंडन;

★ *मॅगसेसे पुरस्कार, मनिला, फिलिपाइन्स; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल ॲम्बॅसेडर ही उपाधी व इतर अनेक पुरस्कार मिळालेत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार ~11/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment