"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*12/03/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *12. मार्च:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.2/3, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~रेवती,
योग ~शुक्ल, करण ~कौलव,
सूर्योदय-07:08, सूर्यास्त-18:37,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

12. *लग्न हा करार नसून संस्कार आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12. *आधी पोटोबा मग विठोबा*
   ★ अर्थ ::~  अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
               ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★12. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ७१ वा (लीप वर्षातील ७२ वा) दिवस आहे.
★यशवंतराव चव्हाण जयंती

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला.
●१९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
●१९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
●१९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१३ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
◆१९११ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
◆१८९१ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
◆१८२४ : गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक
●१९९९ : यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
●१९४२ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✸ उभवू उंच निशाण ✸*
     ●●●●●००००००●●●●●
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.  *✹ ऊठ पंढरीनाथा ✹*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा
उठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा

अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या
फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा

पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा
दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा
भक्‍तराज चोखामेळा दुरून देई सादा

देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा
निघून धूर गेला अवघ्या आस-वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12.  *❃❝ गाढव व कुत्रा ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एक माणूस खाण्याचे पदार्थ एका गाढवावर लादून नेत होता. त्याच्याबरोबर त्याचा कुत्राही होता. काही वेळाने तो थकून जाऊन एका झाडाखाली झोपला व गाढव इकडेतिकडे चरत राहिले. कुत्र्याला खूप भूक लागली म्हणून तो गाढवाला म्हणाला, 'तुझ्या पाठीवरच्या खाण्याच्या पदार्थांपैकी मला थोडे देशील तर माझी भूक भागेल.' तेव्हा गाढव म्हणाले, 'थोडा वेळ थांब. आपला धनी जागा झाला म्हणजे तुला खायला देईलच.' ते ऐकून कुत्रा गप्प बसला.

  थोड्या वेळाने एक भला मोठा लांडगा तेथे आला व त्याने गाढवावर झेप घेतली तेव्हा गाढवाने कुत्र्याला आपल्याला वाचविण्याची याचना केली. तेव्हा कुत्रा उपहासाने हसून म्हणाला, 'जरा वेळ थांब. आपला मालक जागा झाला म्हणजे तुझं रक्षण करेलच.' एवढे तो म्हणेपर्यंत लांडग्याने गाढवाचे नरडे फोडून त्याला ठार केले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    दुसर्‍यांनी आपल्याला मदत करावी असे जर वाटत असेल तर आपणही दुसर्‍याला मदत केली पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *"प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चीत नाही...*
*पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे*
*हे मात्र  निश्चीत आपल्या हातात आहे"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✿ भारतातील पहिले ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  *पहिली रेल्वे लाइन-
    ➜ *ठाणे ते मुंबई (१८५३)*

■  *पहिले तारायंत्र-
    ➜ *कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

■  *पहिले पोस्टाचे तिकीट*
    ➜ *१ ऑक्टोबर १८५४*

■  *पहिली सूत गिरणी-
    ➜ *मुंबई (१८५४)*

■  *पहिले स्वातंत्र्य युद्ध-
    ➜ *इ.स. १८५७*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12. *❒ यशवंतराव चव्हाण ❒* 
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.
  अशा या महान नेत्यास त्यांच्या *जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!*
      🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

*●जन्म:~ १२ मार्च १९१३*
        कराड, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू : ~ २५ नोव्हेंबर १९८४

     *यशवंतराव बळवंतराव चव्हाण*
   हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
               कार्यकाळ
(१ मे १९६० ते १९  नोव्हें. १९६२)

     🔗त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुध्दा होते.

    🔗चव्हाण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सक्रिय सहभागी होते . 1930 साली त्यांनी महात्मा त्यांनी स्वामी रामानंद भारती , भाऊराव , ( आप्पासाहेब ) आणि गोविंद वाणी संपर्कात आले या कालावधीत नेतृत्व नसलेल्या सहकार चळवळ त्याने सहभाग होते . मैत्री कायमचे तेथे खेळलेला . 1932 मध्ये सातारा मध्ये भारतीय ध्वज तुरुंगात 18 महिने शिक्षा ठोठावली होती.

   🔗चव्हाण त्याच्या B.A. मिळवता 1938 मध्ये मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र मध्ये . या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये गुंतलेली होती आणि लक्षपूर्वक काँग्रेस पक्ष आणि जसे जवाहरलाल नेहरू , सरदार पटेल आणि केशवराव म्हणून त्याच्या नेते, संबद्ध होती . 1940 मध्ये सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बनले . 1941 मध्ये ते एल्.एल्.बि. पास झाले. 1942 साली त्यांनी जि सातारा मध्ये फलटण येथे वेनुताईशी लग्न केले.

   🔗त्यांनी मुंबई सत्र येथे एक 1942 मध्ये त्या बाहेर येण्याची भारत साठी कॉल दिला आणि त्यानंतर चळवळ त्याने सहभाग अटक करण्यात आली होती. चव्हाण शेवटी 1944 मध्ये तुरुंगात मधून प्रसिद्ध झाले.

    🔗इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंत रावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्री पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

    *💥महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या.*
         
🔹- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

🔸- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

🔹- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

🔸- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

🔹- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

🔸- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

🔹- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार~12/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment