"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*12/04/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *12. एप्रिल:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.4, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~सौभाग्य, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:23, सूर्यास्त-18:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

12. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12.*करावे तसे भरावे*
         *★ अर्थ ::~* 
   आपण जशी कृती करतो तसे त्याचे आपल्याला फळ मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
           ⭐अर्थ ::~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★12. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०२ वा (लीप वर्षातील १०३ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान
●१९९७ : पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
●१९६१ : रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
◆१९४३ : सुमित्रा महाजन – केंद्रीय मंत्री
◆१९१० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
◆१८७१ : वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
●२००१ : देवांग मेहता– भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष ऑस्ट्रेलियात निधन
●१९४५ : फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
●१९०६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✸ उषःकाल होता होता ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *❂ असो तुला देवा माझा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12.  *❃❝ अतिमोह ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा एका उंदराला काहीही खायला न मिळाल्यामुळे एका बंद खोलीत एका झरोक्यातून गेला. त्याला तिथेसुध्दा खायला काहीही दिसले नाही. शेवटी एका कोपर्यात एक टोपली दिसली. उंदराला वाटले की,या टोपलीत काही तरी खायला असेल. पण ती टोपली उघडेनाच. इतक्यात तिथे एक ब्रेडचा तुकडा घेऊन दुसरा उंदीर तिथे आला. पहिला उंदीर त्याला म्हणाला, बरं झालं बुवा तू ब्रेड आणलास ते. मला खूप भूक लागलीय. आपण दोघे मिळून खाऊया. दुसरा उंदीर म्हणाला ठीक आहे. दोघांनी तो ब्रेड वाटून घेतला. पण थोड्या वेळाने पहिल्या उंदराला काही शांत बसवेना. तो म्हणाला, ही टोपली उघडत नाही. आपण दोघे मिळून कुरतडू. दुसरा उंदीर म्हणाला,मी आहे त्यात समाधानी आहे. सकाळ होताच आपण दुसरे अन्न शोधू. राहू दे त्या टोपलीला कुरतडायचे. पण पहिल्या उंदराला ते काही पटले नाही. तो टोपली कुरतडू लागला. ते पाहून दुसरा उंदीर निघून गेला. सकाळ होईपर्यंत त्या टोपलीला बरेच कुरतडले. उंदराला वाटले की,आतमध्ये भरपूर अन्न असेल. आपल्याला बरेच दिवस मिळेल. इतक्यात त्यातून एक मोठा भुकेलेला साप आला आणि त्याने उंदरालाच खाऊन टाकले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  काही काही वेळा अतिमोहापायी स्वत:चा प्राणही गमवावा लागतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..*
      *जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
12. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून काय बनते ?
➜पितळ.

✪  भारताच्या पूर्व दिशेला कोणता देश आहे ?
➜बांग्लादेश.

✪  'द थर्ड पीलर' या पुस्तकाचे लेखक कोण ?
➜रघुराम राजन.

✪  सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
➜कोपर्निकस.

✪ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?
➜दुबई.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12. ❒गायक मा.कुंदनलाल सैगल❒ 
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ११ एप्रिल १९०४
●मृत्यू :~ १८ जानेवारी १९४७

      मा.कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायिल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जलंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. १९३१ साली कोलकात्यात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना 'न्यू थिएटर्स' साठी करारबद्ध केले. १९३२ मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर्. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील 'बालम आवो बसो मोरे मन मे' व 'दुख के अब दिन बीतत नही' यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व 'न्यू थिएटर्स' निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. 'एक बंगला बने न्यारा' (प्रेसिडेंट), 'करू क्या आस निरास भई' (दुष्मन), 'सो जा राजकुमारी सो जा' (जिंदगी, १९४०), 'बाबूल मोरा' (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृध्द करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल 'न्यू थिएटर्स'मध्ये होते. या काळात बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली. सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व 'रणजित मुव्हिटोन ' या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील 'दिया जलाओ' हे शुध्द कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. 'न्यू थिएटर्स'च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील 'दो नैना मतवारे' व 'ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे' ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहाँ हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील 'गम दिए मुत्त किल', 'जब दिल ही टूट गया' यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भीडत. सैगल यांच्या गायकीवर शास्त्रशुध्द गायकीचेही संस्कार झाले होते. उस्ताद फैयाज खाँ यांची तालीमही काही दिवस त्यांना मिळाली होती. सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, 'चाह बरबाद करेगी '(शाहजहाँ), 'ऐ कातिब-ऐ तकदीर' (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच 'राधेरानी देय डालो ना' (पूरन भगत), 'जीवन का सुख आज प्रभु मोहे' (धूप छाँव) व 'मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले 'सो जा राजकुमारी' हे अंगाईगीत तसेच 'बाबूल मोरा' ही भैरवीतल्या करूण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. मा. सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती. मा. सैगल यांचे यशस्वी चित्रपट दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर); जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन). त्याचबरोबर बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये केला होता. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
तसेच लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।

     सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर  चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. मा. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शुक्रवार~12/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment