"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*12/07/19 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 12/07/2019 ❁*
      *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *12. जुलै:: शुक्रवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आषाढ शु. ११
     तिथी : शुक्ल पक्ष एकादशी,
           नक्षत्र : विशाखा,
    योग : साध्य, करण : वणिज,
सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

12. *आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12.  *लेकी बोले सुने लागे*
           ★ अर्थ ::~
एकाला उद्देशून पण दुसऱ्याला बोलने
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.   *जयतु जयतु भारती ।*
            ⭐अर्थ ::~
    भारतमातेचा विजय असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     *🛡 ★ 12. जुलै ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९३ वा (लीप वर्षातील १९४ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.
●१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
●१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना
●१९६१ : मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.
●१७९९ : रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.
●१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : संजय मांजरेकर – क्रिकेटपटू
◆१९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश
◆१८६४ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य
◆१८६४ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता
●२०१२ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
●१९९९ : राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता
●१९९४ : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे वसंत साठे
●१६६० : *बाजी प्रभू देशपांडे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✸ सारे जहाँ से अच्छा ✸*
     ●●●●●००००००●●●●●
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा।
हम बुलबुलें हैं इसकी वह गुलिस्तां हमारा ॥

ग़ुर्बत में हों अगर हम रहता है दिल वतन में।
समझो वहीं हमें भी दिल हो जहाँ हमारा ॥

परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमां का।
वो संतरी हमारा वो पासवां हमारा ॥

गोदी में खेलती हैं, जिसकी हज़ारों नदियां।
गुलशन है जिसके दम से रश्के जिनां हमारा॥

ऐ आबे रोदे गंगा वह दिन है याद तुझको।
उतरा तेरे किनारे जब कारवां हमारा ॥

मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना।
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्तां हमारा ॥

यूनान, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से।
अब तक मगर है बाकी नामों निशां हमारा ॥

कुछ बात है कि हस्ती मिटती मिटाये।
सदियों रहा है दुश्मन दौरे जमां हमारा ॥

'इक़बाल' कोई महरम अपना नहीं जहां में।
मालूम क्या किसी को दर्दे निहां हमारा ॥

सारे जहाँ से अच्छा  हिन्दोस्तां हमारा।
हम बुलबुलें हैं इसकी यह गुलिसतां हमारा॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.    *❂ दीप दर्शन ❂*
   ━━═●✶✹★★✹✶●═━━
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते॥

दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12. *❝ मनातील मलीनता ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
           गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले.

         शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही.

        तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला," गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले,"

       अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर."

       शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले.

        आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला.

          गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,

        "वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे._*

        "मनाच्या झ-यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील."

            *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*     
      *भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.   *संयम ठेवा संकटाचे*
            *हे ही दिवस जातील...*
      *आज जे तुम्हाला*
                 *पाहून हसतात*
      *ते उद्या तुमच्याकडे*
             *पाहतच राहतील..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✿ महाराष्ट्रातील लघुउद्योग ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
            *गाव व लघुउद्योग*
◆ सोलापूर    ::~ चादरी

◆ नागपूर   ::~ सूती व रेशमी साड्या

◆ वसई(ठाणे)   ::~  सुकेळी

◆ इचलकरंजी  ::~ साड्या व लुगडी

◆ भिवंडी   ::~  हातमाग उद्योग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12. *❒ ♦बाजीप्रभू देशपांडे♦ ❒*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द ...!*
●स्मृतिदिन :~ १२ जुलै १६६०

          *बाजी प्रभू देशपांडे*
  हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी.

    बापजादे नावाजलेले पैलवान ,घरची परंपराच मुळी कुस्तीची .गावात बाजींचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती. पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती.

   शिवरायांनी मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात बाजी सुध्दा सामील झाले होते,पण त्या आधी बाजी बांदल देशमुख सरकारांचे दिवान म्हणून होते,राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोर्यांना ठार केले तेव्हा त्यांना बाजीप्रभू  देशपांडे हे सोन सापडलं, पण बाजी मनोमनी म्हणत असत कि राजे  हे सोन आधी मातीमोल होत..
तुमचा स्पर्श झाला आणि जीवनाचे सोने झाले. राजाना  तर रायरी जिंकल्यापेक्षा  'बाजी'मिळाल्याचा आनंद झाला होता..!!
बाजी स्वत पहाटे  ३ वा. उठत असत. पूर्वीचे लोक भल्या पहाटे आपला दिवस सुरु करत असे म्हणजे दिवसभराच्या कामाला जास्त तास मिळत असे.

    पशुपक्षी बघा आपला दिवस कसा भल्या पहाटे सुरु करतात अगदी तसेच. बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती. सर्वजन कसलेले पैलवान होते.
सर्वच लढतीला उठत असत पहाटे...!
बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी.

   ३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!! तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!!
बाजी स्वत लढत करत असत ,नंतर ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत ,तद्नंतर २ तास हात्यारांचा सराव.मग अंघोळ पाणी ..
तद्नंतर शंभू-भवानीची यथासांग पूजा झाली कि मग २ शेर तुपातील शिरा न्याहारीला यायचा.

    त्यानंतर  ५ शेर दुध पिउन मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत...! एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक ..?
    मग काय ..
बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो,त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता ...
माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..!सकाळचा व्यायाम, खुराक, पूजा झाली आणि दिवसभराचे राजकारण संपवून सायंकाळी सुध्दा कुस्ती खेळल्याशिवाय अन्नाचा कण मुखात जात नसे..!

    आणि एके दिवशी ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या राजांनी तांबड्या मातीत रंगलेली बाजींची फौज घेवून सिद्दीच्या वेढ्याबाहेर उडी मारली ..! आणि रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले..  ८ तास चिखल वाटेने , भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून .

   बाजी-फुलाजी या सख्या भावांनी राजांसाठी, मायभूसाठी स्वत:च्या  चाळण होऊन सुध्दा ती खिंड सोडली नव्हती... ती तारीख १२ जुलै १६६०  होती.

*तोफेंचे बार ऐकूनच तो देह ठेवला..*
*हि रग, हि जिद्द, हि तळमळ, हि रक्ताची उसळी..*
 
     हि मातृभूमीवर मरायची आग फक्त तांबडी मातीच देवू शकते..
हे जे बाजी-फुलाजी किंवा अन्य मराठेशाहीचे असे मरायला तयार होत होते हि खरी शिवरायांच्या कार्याची पावती आहे. शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे.

    कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो.
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो. तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान हि शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ शुक्रवार ~ 12/07/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment