"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*12/08/24 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *12. ऑगस्ट:: सोमवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.७, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~स्वाती,
योग ~शुक्ल, करण ~वणिज,
सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

12. *सत्याने मिळतं तेच टिकतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12. *गर्वाचे घर खाली*
           *★ अर्थ ::~*
    गर्वामुळे शेवटी फजिती होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *क्षमा रूपं तपस्विनाम् ।*
   ⭐अर्थ ::~ तपस्वी लोकांची क्षमा हीच ओळख असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 12. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ भारतीय ग्रंथपाल दिवस
★ हा या वर्षातील २२४ वा (लीप वर्षातील २२५ वा) दिवस आहे.

         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९८ : सचिन तेंडुलकर याला ‘राजीव गांधी खेल रत्‍न‘ पुरस्कार जाहीर
●१९६४ : वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
●१९४८ : लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
●१९४२ : चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५९ : प्रवीण ठिपसे – बुद्धीबळपटू
◆१९२६ : बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार,
◆१९२४ : मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
●१९१९ : *डॉ. विक्रम साराभाई*– भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
◆१८९२ : एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
◆१८८७ : आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ 

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते
●१९८४ : आनंदीबाई जयवंत – कवी, समीक्षक व अनुवादक
●१९७३ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
●१९६८ : बाळशास्त्री व्यंकटेश हरदास – नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✹अजिंक्य भारतमाता ✹*
        ●●●●●००००००●●●●●
दिशादिशांतुन कोटि मुखांतुन निनाद एकच आता
अजिंक्य आमुची भारतमाता जय जय भारतमाता॥धृ॥

इथे जान्हवी नित्य वहाते घेउन अमृतधारा
इथे झुळझुळे मलयगिरीचा शीतल गंधित वारा
धवल हिमालय या भूमीचा जगात उन्नत माथा॥१॥

इथे जन्मले राम दाविण्या कर्तव्याचा पंथ
कृष्ण सांगती धनंजयाला अमोल गीताग्रंथ
वेदामधुनी इथे वाहती ज्ञानसुधेच्या सरिता॥२॥

बालशिवाही इथे न झुकवी अधमापुढती मान
प्रतापराणा रणराणीचा असे अम्हा अभिमान
इतिहासातुन इथे रंगते पुरुषार्थाची गाथा॥३॥

मानवतेची चाड अम्हांपरि दानवतेची चीड
सत्यासाठी मनी न कधिही धरु भीति वा भीड
प्राणदीप हा विझवू हासत आम्ही देशाकरिता॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *❂ दीनबंधु तू गोपाला रे ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12.  *❃❝ विचारांचा लाभ ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले.
      परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली.
    जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त
वीस लोक असतांना का दिली?
      तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला."

          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   जो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही. किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.   *समजदार व्यक्तीसोबत*
*काही मिनीट केलेली चर्चा*
*ही हजारो पुस्तके वाचन्यापेक्षा*
        *श्रेष्ठ आहे...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
➜ अच्च्युत गोडबोले.

✪  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
➜ मका.

✪  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
➜ १४ जून.

✪ अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ गोल्फ.

✪  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
➜ कल्पना चावला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

12. *❒ ♦विक्रम साराभाई♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  भारताच्या अंतराळ संशोधनाचे 
    पितामह आणि भारताच्या
    अंतराळ युगाचे शिल्पकार
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
    🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
*●जन्म :~ १२ ऑगस्ट १९१९*
●मृत्यू :~ ३० डिसेंबर १९७१
  
  ◆ विक्रम अंबालाल साराभाई ◆
    हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

     विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात  झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
      बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

            *◆ कारकीर्द ◆*
   १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
    विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.
               *◆ मृत्यू ◆*
    ३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ सोमवार~12/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment