"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*12/09/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *12. सप्टेंबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद शु.९, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~मूळ,
योग ~आयुष्मान्, करण ~बालव,
सूर्योदय-06:25 सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

12. *जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

12.  *नाचता येईना अंगण वाकडे –*
  ★ अर्थ ::~  स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

12.    *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
               ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 12. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २५५ वा (लीप वर्षातील २५६ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●२००५ : हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
●१९९८ : डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
●१९५९ : ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.
●१९४८ : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले.
●१६६६ : आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔸
◆१९४८ : मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू
◆१९१२ : फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी
◆१८९७ : आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
◆१८९४ : विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.

  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती
●१९९२ : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक,
पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
●१९५२ : रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू,
●१९२६ : विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

12. *✸ ते अमर हुतात्मे झाले ✸*
    ●●●●००००००●●●●
*ते देशासाठी लढले*
*ते अमर हुतात्मे झाले ! Ilधृll*
सोडिले सर्व घरदार
त्यागीला सुखी संसार
ज्योतिसम जीवन जगले
ते देशासाठी लढले ! ||१||
जे देशासाठी••••••

तो तुरुंग तो उपवास
सोसला किती वनवास
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले ! ||२||
जे देशासाठी लढले••••••

झगडली,झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली 'माता'
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले ! ||३||
जे देशासाठी लढले••••••

🇮🇳हा राष्ट्रध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला🙏
जयगीत गाउया अपुले
ते देशासाठी लढले ! ||४||
जे देशासाठी लढले••••
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

12.    *❂ सूर्यनारायणा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सूर्यनारायणा नित्‌ नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा

ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची

आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

12.  *❃ समुद्रावरील प्रवासी ❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━
     काही लोक समुद्र किनार्‍या जवळून प्रवास करीत असता, दूरवर समुद्रात एक मोठी काळ्या रंगाची वस्तू वाहात येताना त्यांना दिसली.
      ते पाहून त्या लोकांना एखादे गलबत असावे असे वाटले. काही वेळाने तोपदार्थ जास्त जवळ आल्यावर ते गलबत नसून ती एक लहानशी होडी असावी असे त्यांना वाटले.
    परंतु किनार्‍यावर आल्यावर पाहातात तो ते साधे काळया रंगाचे गवत आहे असे त्यांना आढळले.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    लांबून एखादी गोष्ट मौल्यवान आहे असे वाटते पण जवळून बघितल्यावर प्रत्यक्षात ती अगदी क्षुल्लक असल्याचे आढळून येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

12.  *पाण्यापेक्षा तहान किती आहे यालाजास्त किंमत असते..*
     *मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त*
              *किंमत असते..*
       *या जगात नाते तर सर्वच*
             *जोडतात... पण...*
   *नात्यापेक्षा विश्वासाला  जास्त*
           *किंमत असते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

12. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे ?
➜ जयपूर.

✪  रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
➜ स्फिग्मोमॅनोमीटर.

✪  बावन्न दरवाजाचे शहर कोणते ?
➜ औरंगाबाद.

✪ शिवसमुद्रपुरम धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
➜ कर्नाटक.

✪ ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती आहे ?
➜ ग्रामपंचायत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

12. *❒ रामचंद्र कुंदगोळकर ❒* 
   ━━•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ इ.स. १८८६
कुंदगोळ, धारवाड, कर्नाटक, भारत
●मृत्यू :~ १२ सप्टेंबर  १९५२

◆संगीत साधनागुरू :~
             उस्ताद अब्दुल करीम खाँ
◆गायन प्रकार :~ हिंदुस्तानी शास्त्रीय
           संगीत, भजन, अभंग

  *◆ रामचंद्र गणेश कुंदगोळकर ◆*
     हिदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायकसवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत.

    रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला  उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊंनी एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरचमराठी रंगभूमीवर  त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण श्रीपाद राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांनादेखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्य संगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत.

*◆ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक◆*
        व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत.  किराणा घराण्याची  परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गायक/गायिका तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांच्या ऋणी आहेत. यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हानगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव  पुणे सुरु केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~12/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment