"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*12/10/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *12.ऑक्टोबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.९, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~श्रवण,
योग ~धृति, करण ~कौलव,
सूर्योदय-06:31, सूर्यास्त-18:16,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

12. *तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

12. *कोल्हा काकडीला राजी –*
  ★ अर्थ ::~ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

12. *विनयात् याति पात्रताम् ।*
  ⭐अर्थ ::~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

🛡 ★ *12. ऑक्टोबर* ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★जागतिक संधिवात निवारण दिन
★हा या वर्षातील २८५ वा (लीप वर्षातील २८६ वा) दिवस आहे.
★जागतिक स्पॅनिश भाषा दिवस

  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर
●१८७१ : भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
●१८५० : अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२२ : *शांता शेळके* –  कवयित्री आणि गीतलेखिका.
◆१९२१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक
◆१९१८ : मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
◆१९११ : विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक

  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक
●१९६७ : डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व लेखक.
●१६०५ : बादशाह अकबर –  हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

12. *✸ उत्तुंग आमुची उत्तर सीमा*
   ●●●●००००००●●●●
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटिकोटि भुजदंड
होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत
करि हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू

देशाचा दृढ निर्धार
करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

12.    *❂ देवी वीणावादिनी  ❂*
━═●✶✹★★✹✶●═━
हे ज्ञान की देवी वीणावादिनी
सुन ले मेरी पुकार,
हाथ जोड़कर विनती करता
है यह बालक बारंबार।

हमारी पीड़ा दूर करने
कृपा करो माँ सरस्वती,
तेरा आशीष पाने की
है यह कैसी नीति!

शिक्षा देने का यह जिम्मा
जिन लोगों पर डाला तूने,
उन नीति नियंताओं की
देखो कैसी फिर गई है मति।

दया कर हम बच्चों पर माँ
दे इन बड़ों को तू सन्मति,
स्वार्थ की खातिर इन लोगों ने
ज्ञान मंदिरों की कर दी दुर्गति।

बेहाल हैं हम सब बच्चे
मन से सच्चे तन से कच्चे,
देख हमारे अरमानों के
कैसे उड़ रहे परखच्चे!

जानती तू बच्चों की है
कितनी निर्बल-कोमल काया,
शिक्षा देने का यह तरीका
हमको कभी न भाया।
नन्हे कंधों पर हम बच्चे
कितना बोझ उठाएँ,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

12. *❝ शेतकरी आणि घोडा ❞*
━═•●◆●★★●◆●•═━
     एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.

    त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...

   त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल....

     मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली...

मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले. विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला वरुन माती पडतचं होती... काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला..... सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले, तर तो पहातचं राहीला... अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.

   लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले... परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....

   असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....

आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???
  आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.
म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा... आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो.... शांत मनाने ती हाताळा....  खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा...

   झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     मस्त रहा आनंदी जगा हेच जीवनाचे सार आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

12.     *एक कोटी रुपयाचा हिरा 💎 अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती 🕯 उपयोगी आली....*
          *एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

12. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते ?
  ➜ १९३९.

✪  'सत्सार' या नावाने नियतकालिक कोणी सुरू केले होते ?
  ➜ महात्मा फुले.

✪  अमरावतीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली ?
  ➜ डाॅ.पंजाबराव देशमुख.

✪  पिनलकोडच्या निर्मितीशी कोणती व्यक्ती संबंधित आहे ?
  ➜ लाॅर्ड मेकाले.

✪ 'गदर पार्टीची' स्थापना कोणी केली ?
  ➜ लाला हरदयाल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

12.   *❒ शांता शेळके  ❒* 
  ━═•●◆●★●◆●•═━
ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री
_यांच्या जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*●जन्म :~ १२ ऑक्टोबर १९२२*
●मृत्यू :~ ६ जून २००२

     ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविदयालयात पुढील  शिक्षण घेतले. तेथे श्री. म. माटे, के. ना. वाटवे हे प्राध्यापक म्हणून त्यांना लाभले. याच सुमाराला प्रा. रा. श्री. जोग फर्ग्युसन महाविदयालयात आले. काव्यलेखना बाबत त्यांचे त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले (१९४४). त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुगसाप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविदयालयांतून मराठीचे अध्यापन केले. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले; तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत.

     वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्या नंतर  काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, १९६१; टिप् टिप् चांदणी, १९६६; झोपेचा गाव, १९९०).
गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गाजलेल्या विदेशी चित्रपटांच्या त्यांनी मराठीत निवेदिलेल्या कथांचेही संग्रह लोकप्रिय झाले.

    १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन; मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘वाक्‌विलास’; यशवंतराव चव्हाण; गदिमा; सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या चिमणचारा, कविता करणारा कावळा, गोंदण इ. गंथांसही महाराष्ट्र शासनाचे वाङ्‌मयीन पुरस्कार मिळाले. 

   ६ जून २००२ रोजी ७९व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  ••●◎◑✹★★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~ 12/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment