Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *12. डिसेंबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.१२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~अश्विनी, 
योग ~परिघ, करण ~बव, 
सूर्योदय-07:02, सूर्यास्त-18:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
12. तुम्हाला जर मित्र हवे असतील 
 तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
12.       चार दिवस सासूचे 
      चार दिवस सुनेचे – 
         ★ अर्थ ::~ 
प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
12.    *दुर्जनः परिहर्तव्यः*
     *विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
★अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
    🛡 ★ 12. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ स्वदेशी दिन
★ हा या वर्षातील ३४६ वा (लीप वर्षातील ३४७ वा) दिवस आहे.
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१	:	आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
●१९११	:	दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
●१९०१	:	जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१	:	 *युवराजसिंग –* भारतीय क्रिकेटपटू
◆१९५०	:	रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते
◆१९४०	:	शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 
◆१८७२	:	डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक नाशिक येथील ’भोंसला मिलिटरीस्कूल’चे संस्थापक 
    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२	:	पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न’ 
१९९२	:	पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक 
●१९६४	:	मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. 
●१९३०	:	परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
12. *✸ हे राष्ट्र देवतांचे ✸*
    ●●●●००००००●●●●
हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे 
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
12. *❂इतनी शक्ति हमें देना दाता❂*
     ━━═●✶✹★✹✶●═━━
इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना 
हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना 
दूर अज्ञान के हो अंधेरे
तू हमें ज्ञान की रोशनी दे 
हर बुराई से बचते रहें हम
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना
हम ना सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचे किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाँटे सभी को
सब का जीवन ही बन जाए मधुबन
अपनी करुणा का जल तू बहा के
कर दे पावन हर एक मन का कोना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
12.  *❃❝  कावळा चिमणी ❞❃*
     ━═•●◆●★●◆●•═━
    कावळा चिमणीचा शेजारी. कावळ्याचं घरं शेणाचं, चिमणीचू घर मेनाचं. पाऊस झाला, कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त .
       दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी .
 
    पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...!
    
     चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली, तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून.
कावळा म्हणाला चिमणीला, "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार.
         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   मित्र जर असतील पक्के, त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे ..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
12. *स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!*
*कधी कुठला रंग सांडेल,* 
*कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,* 
*फक्त स्व:ताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत* *याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील* *छान खुलतात..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
12. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
 ✪  पोर्तुगिजांचे भारतातील धार्मिक धोरण कोणत्या स्वरूपाचे होते ?
  ➜ असहिष्णू.
 ✪ 
 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?
 ➜ कोलकाता
 ✪  कोणत्या युरोपीय देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले ?
 ➜ पोर्तुगाल.
 ✪  इ. स. १७७२ मध्ये कोणी दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली ?
 ➜ वाॅरन हेस्टिंग्ज.
 ✪  भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला ?
  ➜ १८ जुलै १९४७.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
12. *❒ ♦युवराजसिंह♦ ❒*  
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    १९ सप्टेंबर २००७ रोजी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. यांचा आज जन्म दिवस
           _त्यानिमित्त त्यांना_
   *_हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!_*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
    ◆ भारताचा क्रिकेट खेळाडू ◆
            
*●जन्म :~	१२ डिसेंबर १९८१,*
          चंदीगड,भारत
◆विशेषता :~फलंदाज
◆फलंदाजीची पद्धत :~ 	डावखोरा
◆गोलंदाजीची पद्धत :~ डाव्या हाताने
 ऑर्थोडॉक्स
◆वडील :~  योगराजसिंग 
*★ युवराज सिंह ★*
हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंहचे वडील आहेत. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते.
    २०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला.
    *राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंह ला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला.* न्यूझीलँड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला.
          ◆ वैयक्तिक जीवन ◆
    युवराज हा जट सिख परिवारातून येतो. योगराज सिंग आणि शबनम सिंग हे त्याचे आई-वडिल. त्याचे आई-वडिल घटस्फोटित आहेत. युवराज त्याच्या आई सोबत राहतो. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या.आणि दोन्ही खेळात तो चांगला होता.त्याने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे.
      १९  सप्टेंबर  २००७ रोजी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁गुरूवार~12/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment