"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*12/11/24 मंगळवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *12. नोव्हेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक शु.११, पक्ष :शुक्ल पक्ष,
        तिथि ~एकादशी,
     नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा,
योग ~हर्षण, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:44, सूर्यास्त-18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

12. काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12. कोल्हा काकडीला राजी –
   *★ अर्थ ::~* लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*
   ⭐अर्थ ::~ सर्व सत्यावर
         आधारलेले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

🛡 *12. नोव्हेंबर :: शनिवार* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन
★ हा या वर्षातील ३१६ वा (लीप वर्षातील ३१७ वा) दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : १२ नोव्हेंबर हा दिवस *’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’* म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.
●२००० : भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
●१९३० : पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
◆१९०४ : श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
◆१८९६ : *डॉ. सलीम अली– जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ*
◆१८८० : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (जन्म: २१ जानेवारी १९२४)
●१९५९ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक.
●१९४६ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)
=====================
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12.  *$ हे राष्ट्र देवतांचे $*
     ════════════
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
12.    *सुंदर ते ध्यान*
       ━━━━━━━━━━
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया

तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12.   🌹  *गुलाब पुष्प*  🌹
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    *एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला.* त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, "दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील."हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, "जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल." या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली.  "हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला," महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं." राजा त्याच्या हुशारीवर खुश झाला.
       *_🌀तात्पर्य_ ::~*
  सारासार विचार करून निर्णय घेतल्याने तो योग्य ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. " प्रत्येकावर ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ..."
                    -- अब्राहम लिंकन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
12. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  स्ट्रेप्टोमायसीन हे औषध  कोणत्या विकारावर गुणकारी ठरले आहे ?
  ➜ क्षयरोग.

✪  कुत्रे चावल्यामुळे होणारया रोगास काय म्हणतात ?
  ➜ हायड्रोफोबिया.

✪  हायपरटेन्शन म्हणजे काय ?
  ➜ रक्तदाब वाढणे.

✪  पियुषिका ग्रंथी कशाचे नियंत्रण करते ?
  ➜ उंची.

✪  वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी कोणती ?
➜ कंठस्थ ग्रंथी.

✪  मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात ?
  ➜ ९.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12.   *💎डॉ. सलीम अली💎*
      ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
●पूर्ण नाव :~ सलीम मोइनुद्दीन
                         अब्दुल अली
●जन्म : १२ नोव्हेंबर १८९६, मुंबई

   🔶आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ. भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध, तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ यांकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

    ♦वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळावयास विकत घेतली. त्यांना तो पक्षी कोणता हे ओळखता येत नव्हते, म्हणून ते मामांचे शिफारस-पत्र घेऊन मुंबईतील बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना या पक्ष्याची सर्व माहिती मिळाली. यानंतर त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागला. पुढिल शिक्षण घेतल्या नंतर त्यांची बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीत मार्गदर्शक व्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. दोन वर्षांनी ते पुढील प्रगत अभ्यासासाठी जर्मनीला बर्लिन विदयापीठात गेले (१९२९). तेथे त्यांना प्रसिद्घ पक्षितज्ञ एर्व्हिन श्ट्रेझमान यांचे मार्गदर्शन मिळाले. तेथे सलीम अली यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण, शरीररचना शास्त्र, पक्ष्यांची कातडी काढणे, त्यात पेंढा भरून पुन्हा शिवणे, पक्ष्यांची मोजमापे घेणे यांचा अभ्यास केला.

     🔷१९३१ साली ते भारतात परत आले. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते उपकार्यवाह व नंतर अध्यक्षही होते.
बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या मदतीने सलीम अली यांनी हैदराबाद राज्य पक्षिनिरीक्षण, त्रावणकोर-कोचीन पक्षिसर्वेक्षण, अफगणिस्तान पक्षिसर्वेक्षण, कैलास मानसरोवर पक्षियात्रा अशा पक्षिअभ्यासाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. या मोहिमेत त्यांना लोक वॉन थो या छायाचित्रकार मित्राची मदत झाली. या पक्षिनिरीक्षण मोहिमेचे सलीम अली यांनी लिहिलेले अहवाल मार्गदर्शक समजले जातात.

     🔶सलीम अली यांनी सुगरण (बाया) पक्षी घरटी कशी बांधतात, त्यांच्या विणीच्या हंगामातील सवयी यासंबंधी विशेष अभ्यास केला. त्यांनी नोंदी, रेखाटने, छायाचित्रे यांचा वापर करून बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नियतकालिकात सुगरण पक्ष्यावर लेख प्रसिद्ध केला.

    ♦सलीम अली यांनी ‘ इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ ’ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडे आग्रह धरला होता. या मंडळाची स्थापना झाल्यावर ते त्याचे सदस्य होते. त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, पॉईंट कॅलीमर, हरिके लेक ही पक्षीद अभयारण्ये निर्माण झाली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार ~12/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment