"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*13/03/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *13.मार्च:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.4, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~अश्विनी,
योग ~इन्द्र, करण ~वणिज,
सूर्योदय-07:08, सूर्यास्त-18:37,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

13. *मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••

13. *पडेल तो चढेल*
      *★ अर्थ ::~*
- ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते , त्यालाच यश मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

13.  *भावे हि विद्यते देव: ।*
  ⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵=●••

     🛡 *★13. मार्च★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ७२ वा (लीप वर्षातील ७३ वा) दिवस आहे.
      
   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्‍या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन
●१९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
●१९१० : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
●१७८१ : विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२६ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक
◆१८९३ : डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
◆१७३३ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : उस्ताद विलायत खाँ – सतारवादक
●१९९४ : श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते
●१९५५ : वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
●१८०० : *बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस'* – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13. *✸ शतकांच्या यज्ञातुन ✸*
    ●●●●००००००●●●●
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी
ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

13. *❂ तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना

ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा

वत्‍सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभूचा तेथे
‍होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा

वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायीठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵=●••

13. *❃ बकरी व वाघीण ❃*
    ••◆•◆•◆★◆•◆•◆••

   *एकदा एक वाघ आणि वाघीण* आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात.
खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली.
      एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.
तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात  पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही.आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस.
तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली.
     एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली.उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
      एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो.
उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो.

   उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
          बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली
       "उपकार पण वाघासारख्यावर करावेत उंदरासारख्यावर नाही कारण असे *लोक नेहमी ते विसरण्यात धन्यता मानतात* आणि बहादूर लोक ते लक्षात ठेवतात"

          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *उपकार हे योग्य त्यावर करावे नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

13.        चांगली माणसं व
   जिवाभावाची मित्र
  शंभर वेळा जरी नाराज झाली
       तरी त्याची नाराजी दूर करा..!!
कारण किमती मोत्याची माळ जितक्या वेळा तुटते,
तेवढया वेळा आपण ती परत ओवतो.
     *माळ तुटली म्हणून आपण मोती*
               *फेकून देत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

13. *जगातिक स्थळांची टोपननावे*
  ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
★  *हजार तळ्यांचा देश*
●~  फिनलँड

★ *निर्जनतम बेट*
●~  ट्रिस्टन डी क्यूबा

★  *भारताचे व्हेनीस*
●~   अलेप्पी

★  *पाचूंचे बेट*
●~  श्रीलंका

★  *दक्षिणेतील ब्रिटन*
●~  न्यूझीलंड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

13. *❒ "नाना फडणवीस" ❒*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
    *यांच्या स्म्रुतीदिनानिमीत्त*
       *विन्नम्र अभिवादन..!!*
   🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ १२ फेब्रुवारी १७४२
*●मृत्यू :~  १३ मार्च १८००*

         *'★नाना फडणवीस'★*
   पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. यातील आजारपणातच त्यांचा अंत झाला. वाई जवळील मेणवली येथे नाना फडणीसांचा वाडा आजही पहायला मिळतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~13/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment