"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*13/04/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *13.एप्रिल:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.5, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~मृगशीर्ष,
योग ~शोभन, करण ~बालव,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

13. *दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

13. *कर नाही त्याला डर कशाला ?*
   *★ अर्थ ::~* - ज्याने अपराधच केला नाही त्याला शिक्षेची भीती नसते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

13. *बालादपि सुभाषितम् ।*
             ⭐अर्थ ::~
लहान मुलाकडूनही शिकावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★13. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०३ वा (लीप वर्षातील १०४ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९१९ : जालियनवाला बाग हत्याकांड – रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसर येथे झालेल्या सभेवर ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल हॅरी डायर याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केलेल्या गोळीबारात ३७९ लोक ठार व सुमारे १२०० लोक जखमी झाले.
●१७३१ : छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
◆१८९५ : वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
◆१७४३ : थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : विश्वास नरहर तथा ’बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
●१९९९ : डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
●१९८८ : हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी
●१९७३ : अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक.
●१९५१ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

13. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

13.  *❂ जाग बा विठ्ठला ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला !

दारी तव नामाचा चालला गजरू
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला !

दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

13. *❃ लहान झाड व मोठे झाड ❃*
             ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    *नदीच्या काठी मोठे झाड होते* ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्‍याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्‍याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्‍यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे, तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते बर्‍याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
13. *🎭 प्रत्येक "फुल"देवघरात वाहिलं जात नाही.*
*तसं प्रत्येक "नात"ही मनात जपलं जात नाही.*
*मोजकीच "फुलं"असतात,* *देवाचरणी शोभणारी.*
*तशी मोजकीच माणसं असतात...,*
*"क्षणोक्षणी आठवणारी" 🎭*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

13. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
➜दापोली.

✪  वानखेड़े स्टेडियम कोठे आहे ?
➜मुंबई.( महाराष्ट्र )

✪ भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?
➜तारापूर.

✪  आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतात ?
➜डेसिबल.

✪  महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशागळा कोठे आहे ?
➜पुणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

13.     *❒ संत गाडगेबाबा ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄ 
    *●समाज शिक्षक गाडगेबाबा●*

        महाराष्ट्राच्या पावन भूमीत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, गोरा कुंभार, सावता माळी, तुकडोजी महाराज असे अनेक महान संत होऊन गेलेत. ह्या मांदियाळीत विदर्भातील कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला या महात्म्याने प्रकाशाची वाट दाखवली. आपल्या कीर्तनातून भोळ्या-भाबड्या जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

      डेबूजी झिंगराजी जाणोरकर हा तसा अगदी सामान्य माणूस. धोबी समाजातील काबाडकष्टाचे जीणे त्याने अनुभवले. माय सखूबाई, बाप झिंगराजी आणि अवतीभवतीच्या लोकांच्या जगण्यातील भयाण वास्तव त्याच्या मनात सलू लागले. प्रपंचात त्याचे मन रमले नाही. लेकराबाळात त्याचा जीव अडकला नाही. 'लोकांची सेवा, गोरगरीबांची, दीनदलितांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा' हा साधासरळ सिद्धांत त्याला उमगला आणि डेबूजीचा गाडगेबाबा झाला. माय, बायको, लेकरं, सगेसोयरे, गावकरी ह्या सर्वांना सोडून गाडगेबाबा लोकांची सेवा करण्यासाठी निघाले.अंगावर फाटके-तुटके रंगीबेरंगी कपडे, डोक्यावर खापर, हातात खराटा असा वेष करून गाडगेबाबांनी आपली भटकंती सुरू केली. तुकोबाचे अभंग, कबीराचे दोहे आणि आपल्या जगण्यातून हाती आलेले सत्य हेच  आपले धन मानून ह्या फकिरासारखे जीणे जगलेल्या माणसाने आपले अख्खे आयुष्य जनता जनार्दनासाठी समर्पित केले. खराटा हातात घेऊन गावे स्वच्छ केलीत. देणग्या गोळा करून धर्मशाळा बांधल्या.कीर्तनातून माणसातला माणूस जागा केला. तहानलेल्याला घोटभर पाणी आणि भुकेल्याला चतकोर भाकर देता येण्याइतकी मनाची श्रीमंती मराठी माणसाला गाडगेबाबांनी दिली.

      लौकिक अर्थाने शाळा  शिकलेले नसले तरी गाडगेबाबा हे एक चालते बोलते विद्यापीठच होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी मांडलेले विचार थक्क करून सोडणारे आहेत.  त्यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान पिढ्यान् पिढ्या उपेक्षित जीवन जगलेल्या समाजाला उत्थानाचा मार्ग दाखवणारे आहे. देवाधर्माच्या नावावर चाललेल्या फसवणुकीवर त्यांनी प्रहार केले. सत्यनारायण करणे म्हणजे देवाची भक्ती नाही, हे विविध दाखल्यांसह  सिद्ध करताना खरा देव हा दगड धोंड्यात नसून माणसातच आहे, हे ठणकावून सांगितले.

      बहुजनांच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा अशिक्षितपणा, हे त्यांनी जाणले होते. आपल्या कीर्तनातून ते शिक्षणाचे महत्त्व ठासून सांगायचे.अशिक्षित माणसाला ' खटाऱ्याचा बैल' म्हणायचे. दिल्लीच्या तख्तावर भाषण देणारी माणसं आणि बोरीबंदरच्या स्टेशनवर पोती उचलणारी माणसं दोन्ही माणसंच, पण अशिक्षितपणामुळे त्यांची अशी फारकत झाली, हे ते मोठ्या कळवळ्याने सांगायचे. त्यासाठी बाबासाहेबांचे उदाहरण द्यायचे. देवाला नवस बोलून बोकड कापणाऱ्यांवर ते तुटून पडायचे. मोठा होईपर्यंत बोकडाला लेकरासारखे वागवून त्याला देवाच्या नावाने कापून खाणारे लोक त्यांना 'रानडुकरं' वाटायचे. गाडगेबाबांचे शब्द  ऐकणाऱ्याच्या थेट हृदयात घुसायचे, काळजाला झोंबायचे. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शनिवार~13/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment