"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*13/08/24 मंगळवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *13. ऑगस्ट:: मंगळवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.८, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~ब्रह्म, करण ~बव,
सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

13. *माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

13. *कुत्र्याचे शेपूट वाकडे*
      *★ अर्थ ::~*
  मुळच्या स्वभावात बदल होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13.  *गुरुशुश्रूषया विद्या ।*
         ⭐अर्थ ::~
विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

   🛡 ★ 13. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
★ हा या वर्षातील २२५ वा (लीप वर्षातील २२६ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔹
●२००४ : ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.
●१८९८ : कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३: अभिनेत्री श्रीदेवी –
बॉलिवूड मधील अभिनेत्री अनेक चित्रपटातून खूप सुंदर अभिनय. २०१३ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मान
◆१९३६ : वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री
◆१८९८ : *प्रल्हाद केशव तथा आचार्य* अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ,
◆१८९० : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ –

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८८ : गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक
●१९८० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
●१९३६ : मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या.
●१७९५ : महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.(जन्म: ३१ मे १७२५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

13. *✸ देशारक्षणा चला ✸*
     ●●●●००००००●●●●
चला चला चला,पुढे पुढे चला
देशारक्षणा चला,न मागुती वळा||धृ||

बालवीर हे ,सिंह छातीचे
ताठ मान ही,हात बाजीचे ||१||

हिमालयावरी चढून जाऊ या
ध्वज तिरंगी हा,सदैव रक्षू या ||२||

हाक मारीता कोणी,त्या क्षणी
रणात ठाकू या,शस्त्र घेऊनी ||३||

भीती ही मनी,आमुच्या नसे
विजय शेवटी,आपुला असे ||४||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

13. *❂ सत्यम शिवम् सुन्दरम...*
    ━━●✶✹★●★✹✶●═━
इश्वर सत्य है
सत्य ही शिव है
शिव ही सुन्दर है
जागो, उठ कर देखो

जीवन ज्योत उजागर है

सत्यम शिवम् सुन्दरम

राम अवध में,
काशी में शिव,
कान्हा वृन्दावन में,
दया करो प्रभु, देखूं इनको
हर घर के आंगन में
राधा मोहन शरणम
सत्यम शिवम् सुन्दरम...

एक सूर्य है,
एक गगन है,
एक ही धरती माता,
दया करो प्रभु, एक बने सब
सब का एक से नाता
राधा मोहन शरणम
सत्यम शिवम् सुन्दरम...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

13.  *❃❝ खोटे सोंग ❞❃*
   ━━•●◆●★★●◆●•━━      
     "एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकत, सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.
         एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील.

        सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.
      थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते. कोल्हीन त्याला म्हणाली, जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

13 .*यशस्वी आयुष्यापेक्षा*
*समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं*.
            कारण....
*यशाची व्याख्या लोकं ठरवितात*
  *आणि समाधानाची व्याख्या*
      *आपण स्वतः सिद्ध करतो..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
➜ लक्ष्मण माने.

✪ भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
➜ प्रतिभा पाटील.

✪ जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
➜ १७ मे.

✪  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ क्रिकेट.

✪  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
➜ विजयालक्ष्मी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

13. *❒ अहिल्यामाता होळकर ❒* 
   ━═•●◆●★★●◆●•═━         
   कर्तृत्ववान महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.
_यांचा स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
      🙏🌷🌹🌺🌹🌷🙏
●जन्म :~ ३१ मे १७२५
*●मृत्यू :~ १३ ऑगस्ट १७९५*

♦संपुर्ण भारतभर जन          कल्यानकारी कार्य.
♦हजारो मंदीरांच्या जिरनोध्धार
♦३३वर्ष राज्यकारभार
                 (महेश्वर इंदोर. )
♦जलयुक्त शिवार,
♦तंटामुक्त गाव यासारख्या योजना, ♦पुणे ते महेश्वर पहिली टपाल सेवा
              सुरु करणाऱ्या,
♦महिलांची सशस्त्र फोज निर्माण
              करणाऱ्या.
♦महात्मा जोतिबा फुले यांनी पहिल्या शाळेचे नाव हे अहिल्याआश्रम ठेवले तर
♦राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्यासाठी उघडलेल्या दवाखान्याला
*"अहिल्यामाई स्मरणार्थ दवाखाना "* असे नाव दिले.
    एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान,धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे.

   अहिल्याबाई होळकरांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”

    आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.

    मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

   अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.

   अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार~13/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment