"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*13/09/25 शनिवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*

*💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *13. सप्टेंबर:: शनिवार* 🍥
⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
भाद्रपद कृ.६/७, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~कृत्तिका,
योग ~हर्षण, करण ~बालव,
सूर्योदय-06:25, सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

13. *क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

13. *वासरात लंगडी गाय शहाणी–*
  ★ अर्थ ::~ अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13.  *न मातु: परं दैवतम् ।*
           ⭐अर्थ :: ~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 13. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक चॉकलेट दिवस
★ हा या वर्षातील २५६ वा (लीप वर्षातील २५७ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.
●१९४८ : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
●१९२२ : लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔸
◆१९६९ : शेन वॉर्न – ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर
◆१९६७ : मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू
◆१८८६ : सर रॉबर्ट रॉबिनसन –वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
◆१८५२ : गणेश जनार्दन आगाशे – नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार, उत्तम वक्ते व इंदूर येथे भरलेल्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
●१९९५ : डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष 
●१९२९ : लाहोर कटातील क्रांतिकारक *जतिन दास* यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला. 
●१८९३ : मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13. *✸ "सारे जहाँ से अच्छा" ✸*
   ●●●●००००००●●●●
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसिताँ हमारा।
परबत वो सबसे ऊँचा
हमसाया आसमाँ का
वो संतरी हमारा
वो पासबाँ हमारा।

गोदी में खेलती हैं
जिसकी हज़ारों नदियाँ
गुलशन है जिनके दम से
रश्क-ए-जिनाँ हमारा।

मज़हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम वतन है
हिंदुस्तान हमारा।
                 - मुहम्मद इक़बाल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

13.*❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

13. *❃❝ कर्माचे फळ ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━ 
   एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा.
एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला.
    दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता. शेतकरी एक दोन दिवसाआड एकेक किलो ब्रेड, दाळ, शेंगदाणे घेऊन जाई. काही दिवस असेच चालू राहिले..
    एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले, तर ते ९०० ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो. आणि लोणी ९०० ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही.
शेतकरी फसवणूक करत आहे, असा विचार त्याच्या मनात आला...
दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला तू मला धोका देत आहेस.! शेतकरी म्हणाला,
    अहो, भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही, तुमच्याकडून जी एक किलो साखर, दाळ, शेंगदाणे खरेदी करतो त्याचेच माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो..
शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली.
*कारण, तो स्वतःच चुकीचे काम करत होता. त्याच्या लक्षात आले की,
"आपण जसे कर्म करतो, तसेच फळ आपल्याला मिळते."

*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   आपण चुकीचे काम केल्यास, आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.
कारण शेवटी "जैसी करनी, वैसी भरनी".
  मी जगाला देईन, तसे जग मला देईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13. *एक पेन चुक करू शकतो...,*
*पण..,   एक पेन्सील कधीच चुक करत नाही.    कारण..*

    *तीचा पार्टनर (खोडरबर) तीच्या सोबत असतो...*
    *तो तिच्या सर्व चुका सुधारतो...*

    *म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा...*
    *जो आपल्या चुका सुधारेल..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
13. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ झारखंड.

✪  राजश्री शाहू छत्रपती या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜जयसिंगराव पवार.

✪  स्वतंत्र भारताचे पहिले खणन कार्य व ऊर्जामंत्री कोण होते ?
  ➜ वी.एन.गाडगीळ.

✪  भंडारा जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜गोंदिया.

✪  पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते ?
  ➜ सूर्यप्रकाश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

13. *❒ ♦जतीन्द्रनाथ दास ❒* 
   ━━•●◆●★★●◆●•═━
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २७ ऑक्टोबर १९०४ , कलकत्ता, ब्रिटिश भारत;
●मृत्यु :~ १३ सप्टेंबर १९२९, लाहौर

◆जतीन्द्रनाथ दास उर्फ जतीन दास◆

    भारतीय प्रसिद्ध क्रांतिकारक मधील एक क्रांतिकारक होते. ज्यांनी भारत देशाच्या आझादी साठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. यांना जतीन दास या नावाने ओळखले जाते. सर्व
क्रांतिकारक यांना "जतीन दा" या नावानेच बोलत असत.
जतीन्द्रनाथ दास 'कांग्रेस सेवादल' मध्ये सुभाषचन्द्र बोस यांचे सहकारी होते. भगत सिंह यांची भेंट झाल्यानंतर
बॉम्ब बनविण्यासाठी आग्रा आले होते.
भगत सिंह व  बटुकेश्वर दत्त यांनी जो बॉम्ब असेंम्बलीवर फेकला होतो तो बॉम्ब जतींद्रनाथ दास यांनीच बनविला होता.

     लाहोर कटाच्या संदर्भात यांना इंग्रजांनी कैद केले.लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी १३ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~ 13/09/2025❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment