*13/10/24 रविवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *13.ऑक्टोबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.१०, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~शूल, करण ~गर,
सूर्योदय-06:32, सूर्यास्त-18:16,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
13. *भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
13. *कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही –*
★ अर्थ ::~ क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
⭐अर्थ ::~
उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 13. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २८६ वा (लीप वर्षातील २८७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७० : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
●१९२९ : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.
●१८८४ : लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९२५ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान
◆१९११ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार
◆१८७७ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते,
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री
●१९८७ : *आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार* – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता
●१९४५ : मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक
●१९११ : मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या,
●१२४० : रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *ने मजसी ने परत मातृभूमीला*
●●●●●००००००●●●●●
ने मजसी ने परत मातृभूमीला,
सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता,
मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन,
त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी,
येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *❂आकाशी झेप घे रे पाखरा❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२) ||धृ.||
तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा ||१||
घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा ||२||
तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा ||३||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
13. *❃❝ योग्य निर्णय ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात. त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं जोडप बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो, "बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत." त्याचे बाबा त्याच्याकडे पाहून कौतुकाने हसतात.
त्यांच्या समोर बसलेल्या जोडप्याला ला ते पाहून नवल वाटत. हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ओरडतो. "बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत." तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो. ”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का दाखवत नाही.?"
वडील हसतात आणि म्हणतात, "आम्ही आत्ताच डॉक्टरांकडूनच आलो आहोत, माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
कुठलाही निर्णय घाईत घेवू नका. सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ ' तैनाती फौज ' पद्धत भारतात कोणी सुरू केली ?
➜ लाॅर्ड वेलस्ली.
✪ आधुनिक भारताचे निर्माते असे कोणास म्हटले आहे ?
➜ राजा राममोहन राॅय.
✪ पाटलीपुञ म्हणजे आजचे पाटणा हे शहर कोणी वसविले ?
➜ अजातशञू ( मगधचा राजा )
✪ विष्णू ऊर्फ चाणक्य हा चंद्रगुप्ताचा कोण होता ?
➜ मंत्री.
✪ महाराष्ट्रातील पैठण ही कोणाची राजधानी होती ?
➜ सातवाहनांची.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
13. *❒ किशोर कुमार गांगुली ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ४ ऑगस्ट १९२९
खांडवा, मध्य प्रदेश
●मृत्यू :~ १३ ऑक्टोबर १९८७
मुंबई, महाराष्ट्र
🔸कार्यक्षेत्र :~ गायक, अभिनेता,
दिग्दर्शक, संगीतकार
🔹कारकीर्द :~ १९४६ - १९८७
*किशोर कुमार* यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते.
🔶अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँ क्यों मांगूँ". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्याच संधी मिळाल्या.
♦किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
🔷अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्याच नामांकित दिग्दर्शकां बरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमारच्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
🔶प्रमुख चित्रपट चलतीका नाम गाडी, पडोसन, दिल्लीका ठग, नई दिल्ली, झुमरू, आशा, हाफ़ टिकट, श्रीमान फ़न्टूश. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.
🔷किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांनी जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहेत.
🔶किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.
◆आणीबाणी आणि किशोरकुमार◆
♦इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरी किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.
*१३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांडव्याला नेण्यात आला.*
◆ पुरस्कार ◆
🔷किशोर कुमार यांनी ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁रविवार ~13/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment