*14/01/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14.जानेवारी:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.3,4, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~व्यतीपात, करण ~गर,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
14. *लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
14. *आंधळा मागतो एक डोळा
देव देतो दोन डोळे –*
★ अर्थ ::~
अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
━┅━▣◆★✪★◆▣━┅━
14. *यतो धर्मस्ततो जयः ।*
⭐अर्थ ::~
जिथे धर्म तिथेच विजय असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *14. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★भूगोल दिन
★हा या वर्षातील १४ वा दिवस आहे.
★मकर संक्रमण
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.
●१९९४ : मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
●१९४८ : ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
●१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७७ : नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर
◆१९३१ : सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर
◆१९०५ : दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.
◆१८९२ : शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१)
◆१८८२ : रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत,
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१७६१ : सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
●१७६१ : विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
●१७४२ : एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
14. *स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला*
══════════
स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष
या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष
श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश
हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
━┅━▣◆★✪★◆▣═┅━
14. *✹ऐ मालिक तेरे बन्दे हम✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऐ मालिक तेरे बन्दे हम
ऐसे हों हमारे करम
नेकी पर चलें और बदी से टलें
ताकि हंसते हुए निकले दम
ये अंधेरा घना छा रहा
तेरा इंसान घबरा रहा
हो रहा बेखबर, कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रोशनी में जो दम
तो अमावस को कर दे पूनम
नेकी पर...
जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें, हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम
नेकी पर...
बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमें जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म
नेकी पर..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
14. *■ सर्वस्व ■*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
मागच्याच महिन्यातील गोष्ट आहे. रविवार होता, नेहमीची धावपळ गडबड नव्हती. निवांत टि. व्ही वर बातम्या बघत बसलो होतो. बातम्या पण त्याच त्या एकाच पठडितल्या राजकारण, खुन, हाणामारी अश्याच प्रकारच्या चालु होत्या. अचानक टि. व्हि वर एक बातमी आली आणि मन पुरत हेलावुन गेल.
बातमी आैरंगाबादची होती. गेले ७ ते ८ दिवस एक मोकट(फिरती) गाय महानगर परीवहणच्या बसच्या पुढे येत होती. त्या बसला हलु पण देत नव्हती, सतत त्या बसच्या टायर खाली काहितरी शोधत असे. सुरवातीला बसवाल्यांनी तिला बाजुला करण्याचा खुप प्रयत्न केला पण सहजासहजी काहि ती बाजुला व्हायची नाहि. ४ ते ५ जनांनी तीला आेढुन बाजुला नेल व बसला जाऊ दिल. पण बस गेल्यावर गायीला सोडुन दिल कि ती परत पळत जाऊन त्या बसला आडवी जाई.
बर ती गाई फक्त त्याच बसबद्दल असे करीत असे. महानगर परीवहणवाले ह्या सर्व प्रकाराने हैरान झाले. त्यांनी बसचा रंग पण बदलुन बघीतला तरीही गाई त्याच बसला आडवी जाई व त्या बसच्या पुढ्यात शोधक नजरेने काहितरी शोधत असे.
मग महानगर परीवहणच्या एका अधिकार्याने चौकशी सुरू केली कि आसा प्रकार का होतोय? त्यावेळी त्याला अत्यंत ह्रुदयद्रावक गोष्ट कळाली. त्या गाईला एक महिन्यापुर्वीच एक वासरू झाल होत आणि ती ज्या बसला आडवी जात होती त्याच बसच्या पुढच्या टायरखाली येऊन ते चिरडल गेल. आणि म्हणुनच त्या गाईतली आई बेफामपने जीवाची पर्वा न करता त्या बसचा पाढलाग करून त्या बसच्या पुढच्या टायरपाशी आपल्या वासराला शोधत असे. तिला वेडी आशा होती कि बसच्या खालुन तीच वासरू कुठुनतरी बाहेर येईल. तीच्यासाठी ते वासरू सर्वस्व होत आणि तेच तिच्यापासुन हिराऊन घेतल होत.
*_🌀तात्पर्य_ ::~*
माणुस असो वा जनावर, कोणतही आईला तिची मुल ही तिच्यासाठी प्रणाहुनही प्रिय असतात. त्याना काही ईजा जरी झाली की ती वेडीपिशी होऊन जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
━┅━▣◆★✪★◆▣═┅━
14. *शिवलेल्या कापडाचा एक टाका उसवला व त्याच वेळी तो टाका मारला नाही तर सर्व शिलाई उसवते...*
*त्याचप्रमाणे नात्यामधिल पहिला गैरसमज दूर झाला नाही तर तो एक गैरसमज सर्व नातेसंबंध खराब करतो.*
*म्हणूनच आयुष्यातील एकमेकातील गैरसमज दुर केला तर आयुष्यभर संबंध खराब होणारच नाहीत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
━┅━▣◆★✪★◆▣═┅━
14. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?
➜ बावीस.
✪ गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे ?
➜ मुंबई.
✪ उष्मांक मोजण्याचे एकक कोणते आहे ?
➜ कॅलरी.
✪ राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे ?
➜ सावधान स्थितीत.
✪ चहाचे सर्वांत जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
➜ आसाम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
14. *💥रघुनाथ धोंडो कर्वे💥*
─┅━━▣▣▣━━┅─
*"यांच्या जयंती निमित्त*
*_विनम्र अभिवादन"_*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
🔹टोपणनाव:~ र. धों. कर्वे
*●जन्म: ~ १४ जानेवारी १८८२,*
●मृत्यू:~ १४ ऑक्टोबर १९५३
*🔹चळवळ: ~ संततिनियमन*
🔸वडील :~ धोंडो केशव कर्वे
🔹आई : ~ राधाबाई धोंडो कर्वे
🔸पत्नी :~ मालती रघुनाथ कर्वे
*💠रघुनाथ धोंडो कर्वे*
हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत.
*💠व्यावसायिक कारकीर्द*
र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्याल- यात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
🔶त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.
*💠 संततिनियमन*
🔷 संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले.
🔶एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या - महर्षी कर्वे यांच्या - पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ परकीयांशी लढणे सोपे असते;पण स्वकीयांबरोबर झुंज घेणे अवघड असते. रघुनाथरावाणी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शनिवार~14/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment