"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*14/02/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14.फेब्रुवारी:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.5, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~रेवती,
योग ~शुभ, करण ~बालव
सूर्योदय-07:07, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

14. *देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

14. उथळ पाण्याला खळखळाट फार
      *★ अर्थ ::~*  सामर्थ्य कमी असताना अधिक प्रदर्शन करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *न मातु: परं दैवतम् ।*
   ⭐अर्थ ::~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *14. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻

★व्हॅलेंटाईन डे
★हा या वर्षातील ४५ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१९ : कश्मीर पुलवामा येथे दहशतवादी हल्ला या आत्मघाती हल्ल्यात CRPF ४० विरजवान शहीद झाले.
●२००० : अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
●१९८९ : भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.
●१८८१ : भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना
●१९६३ : अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
●१९४६ : पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९५० : कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री
●१९३३ : मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री
●१९२५ : मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते
●१९१६ : संजीवनी मराठे – कवयित्री
●१४८३ : बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७५ : पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक
●१९७५ : ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
●१९७४ : श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

14. *✸ उत्तुंग आमुची उत्तर सीमा*
         ●●●●●००००००●●●●●
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटिकोटि भुजदंड
होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत
करि हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू

देशाचा दृढ निर्धार
करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *❂ असे मी अनादी ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
असे मी अनादी मला अंत नाही
मला मृत्युची या मुळी खंत नाही
पडू दे इथे ही तनू मृण्मयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥१॥

आम्ही प्राशिले मत्त त्या सागराला
आम्ही प्राशिले कालकूटा गराला
असे वीर्य ते माझिया संचयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥२॥

जिथे न्याय -निती सवे सत्य आहे
जयाची पताका तिथे नित्य आहे
उभा देव तेथे सदा निश्चयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥३॥

पुन्हा यज्ञि या द्यावया आहुती मी
पुन्हा जन्म घेइन रे भारती मी
असे येथली वीरता अक्षयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥४॥

इथे वाहता धार ही शोणिताची
पहा जागली अस्मिता भारताची
उभी सिध्द सेना पहा ती जयी रे
चिरंजीव मी वीर मृत्युजयी रे॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

14. *❃ सिंह लाडंगा आणि कोल्हा*
            ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?

   *तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'*

   *सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले*.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

14.   *"राग व व्देष" व्यक्त करणे*
          कमकुवत व्यक्तीच्या शक्तींचे
          *शक्तीहीन प्रदर्शन असते...!!*

    *शांत स्वभाव* आणि
             *चांगले विचार*
      हे *प्रगल्भ व्यक्तीचे लक्षण व मोठेपण;*
     तेच त्याची शक्ति प्रतिबिम्बित करतात...
        आणि यातच त्याचा *जय*
  लपलेला असतो..!!

   म्हणून माणसाने कधीही रागवू नये;
          *आपला राग हा नेहमीच*
              *शत्रुचा मित्र असतो;*
                     आणि
      *कधीही दुसऱ्याचा द्वेष करू नये*          
         कारण तो आपल्या जीवनातील
                 *"दोष"* ठरतो..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ राजघाट.( दिल्ली )

✪ नवीन १०० रु. चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
➜ राणी की वाव.( गुजरात )

✪  कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?
➜ ऑस्ट्रेलिया.

✪  भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
➜ थर वाळवंट.( राजस्थान )

✪  स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
➜ २ ऑक्टोबर २०१४
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

14.  *❒ नाना फडणवीस ❒*
     ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
      *💥नाना फडणवीस* ऊर्फ
               *बाळाजी जनार्दन भानू*
    🔷पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.

   🔶नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.

  ♦आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

   🔷थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात मार्च १३, इ.स. १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही  आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार~14/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment