*14/03/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14.मार्च:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.5, पक्ष : शुक्ल पक्ष, 
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~भरणी, 
योग ~वैधृति, करण ~बव, 
सूर्योदय-07:08, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
14. *आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
14. *चालत्या गाडीला खीळ घालणे*
      *★ अर्थ ::~*  सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा आणणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••===
14. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~  सत्य बोलणे हे
   गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
      🛡 *★14. मार्च★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ७३ वा (लीप वर्षातील ७४ वा) दिवस आहे.
    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१	:	चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत.
●२००१	:	व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
●१९५४	:	दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
●१९३१	:	’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४	:	साधना घाणेकर ऊर्फ ’साधना सरगम’ – पार्श्वगायिका
◆१९३१	:	प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते
◆१८७९	:	अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१०	:	गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा  ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला.
●२००३	:	कवी सुरेश भट –
●१९९८	:	दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक 
●१८८३	:	कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
14. *✸ पाऊल पुढेच टाका ✸*
    ●●●●००००००●●●●
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
तोंड लागले आज लढ्याला
चहूबाजूंनी येईल घाला
छातीवरती शस्त्रे झेला
फिरू नका रे डरू नका, डरू नका
शपथ तुम्हाला शिवरायाची
मराठमोळ्या मर्दुमकीची
समर्थ गुरु केसरी टिळकांची
विजयाच्या या ऐका हाका, ऐका हाका
निशाण अपुले उंच धरा
शूरपणाची शर्थ करा
कराच किंवा रणी मरा
बहाद्दरांनो मरणा जिंका, मरणा जिंका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====
14. *❂ हे आदिमा हे अंतिमा ❂*
    ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे आदिमा, हे अंतिमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा
या मातिचे आकाश तू
शिशिरांत या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरुषोत्तमा
देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरीं
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
14. *❃ कुत्रा आणि गाढव ❃*
    ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , 
कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .
कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो...!
   पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .शर्यत सुरु झाली 
कुत्रा जोरात धाऊ लागला. पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. 
   असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला 
तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते 
तिकडे गाढव शर्यत जिंकून ते राजा झाले होते अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.
        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
  आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य  करा, त्याना प्रोत्साहन  द्या... नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
14. जीवनाचा आनंद हा सत्य,न्याय व समान हक्कासाठी लढण्यातच आहे. जो सत्य, न्याय, शांती व प्रेमासाठीच जगतो आणि याकरिता प्रसंगी संघर्ष करत मरतो ; अशा नर रत्नाचे जीवन धन्य होय.
    जो आपल्या महान कर्तव्याची जाणीव ठेवून आपले जीवन अर्थात तन,मन चंदना समान सतत झिजवितो आणि समान न्याय हक्काकरिता प्रसंगी झगडतो तोच खरा कर्तव्यदक्ष व बुद्धीमान माणूस होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
14. *■■ प्रश्नमंजुषा ■■*
 ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑ 
★ *आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?*
➡  राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा.
★ *आपले राष्ट्रीय सण कोणते?*
➡   स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन.
★ *राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?*
➡  सामर्थ्याचे
★ *भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?*
➡  सत्यमेव जयते.
★ *भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?*
➡   सारनाथ-अशोकस्तंभ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
14. *❒  'विंदा' करंदीकर ❒*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
●जन्म :~ २३ ऑगस्ट १९१८
*●मृत्यू :~ १४ मार्च २०१०*
      गोविंद विनायक तथा
           'विंदा' करंदीकर 
     लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. 
विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणा बद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते.
केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत. विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्य लेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली.
     विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यां पर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषिकांस परिचय झाला. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁गुरूवार ~14/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment