"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*14/04/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14.एप्रिल:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.6, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~अतिगण्ड, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

14. *चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

14. *ऊस गोड लागला म्हणून मुळासकटखाऊ नये*    
       *★ अर्थ ::~*
- मदत करणाऱ्याचा अति फायदा घेतल्यास आपला तोटा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *न मातु: परं दैवतम् ।*
   ⭐अर्थ ::~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★14. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
★ हा या वर्षातील १०४ वा (लीप वर्षातील १०५ वा) दिवस आहे.
★ राष्ट्रीय अग्निशामक दल दिन

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४४ : मुंबई गोदीत उभ्या असलेल्या ’फोर्ट स्टिकिन’ या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटि पौंडा इतके आर्थिक नुकसान झाले.
●१९१२ : आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
●१७३६ : चिमाजीअप्पाने अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९४२ : मार्गारेट अल्वा – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल
●१९२२ : उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण
●१८९१ : *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,

   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : चंदू पारखी – चित्रपट आणि नाट्य अभिनेते
●१९६२ : भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा "भारतीय अभियंता दिन" म्हणून पाळण्यात येतो.
●१९५० : भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

14. *✸ राष्ट्रीय एकात्मता ✸*
       ●●●●●००००००●●●●●
धगधगता   एकात्मते चा  वारा  वाहतो  आहॆ.
या  आपुल्या  भारत  भूमीच्या  मातीवरती,
विविधतेने  नटलेला  ,हा  भारतदेश  असे  आपुला.
   
हिंदू , शीख , बुद्ध,  इसाई, 
अन राहतात कोणी बेगडे,
भाषा असती अनेक बहुती,
असती अनेक त्यांची चाली- रीती.
   
कोणी  लढती भारत भू च्या  रक्षणासाठी  आणि  कोणी पर भूमीच्या  बुजऱ्या  लोकांसाठी,
कुठे  सांडते  रक्त  देश सेवेसाठी  अन  कोणी काढी तो रक्त कोणी पर भूमीच्या  स्वार्थी लोकांसाठी ,
   
कुठे  गुलाब, पुष्प  बरसते  अन  कुठे  दगडांचे  घाव  लागती,
कोणी  ठोकिती  गोळी  कुणा  देश  रक्षणा  साठी  अन  कोणी  ठोकिती गोळी  आपुल्याच लोकांवरती, 
   
राष्ट्रासाठी  कोणी  झेलतो  दगडांची  हि  मार,
अन स्वार्थासाठी कोणी  घालतो  पैशाची  हि  माळ,
   
हवा आता बदल असा , राष्ट्रीय एकात्मते मध्ये ,
आपुल्या पुन्हा सूर वाहवा आपुल्या  राष्ट्रीय गीतेचा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा

हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

14.  *❃ जातीवंत इंजिनियर..!! ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले, "कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली"?  त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले, *"मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे"* गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली, *"माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत."*
गार्डने विचारले, *"हे तुला कसे कळले"*  ती व्‍यक्ति म्‍हणाली,
*"माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काहीसा फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तसा न येता तो वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता."* 
    गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एके ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले, *"सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय"* त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले, *"माझे नाव डॉ. एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे."* त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता.

     *सहाजीकच टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *संघटनेची ताकद हि केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबुन नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर , संघटनेशी एकानिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते.*
        *-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

14. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?
➜पारा.

✪ कन्याकुमारी भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
➜दक्षिण.

✪  सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
➜नर्मदा.

✪  पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?
➜तामिळनाडू.

✪  भारतीय अवकाशयान उड्डान केंद्र कोठे आहे ?
➜श्रीहरीकोटा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

14. *❒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
*‘‘शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!’’*

💧टोपणनाव :~ बाबासाहेब,
💧जन्म :~ एप्रिल १४, इ.स. १८९१
     महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश
💧मृत्यू :~ डिसेंबर ६, इ.स. १९५६
             दिल्ली, भारत
💧पुरस्कार : ~ भारतरत्न (१९९०)

💧वडील:~सुभेदार रामजी सकपाळ
💧आई:~ भीमाबाई रामजी सकपाळ
💧पत्नी नाव:~ रमाबाई आंबेडकर,
        डॉ. सविता आंबेडकर

●डॉ. भीमराव रामजी आंबेडकर●
      🔹 हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

    🔸ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबा’ म्हणजेच ‘पिता’ किंवा 'वडील' आणि ‘साहेब’ हा आदर व्यक्त करण्यासाठीचा शब्द आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.

     🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.

          ◆💎शैक्षणिक विचार◆
   🔸शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते.
      🔹पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

               ◆स्वातंत्र्य लढा◆
   🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देश हिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

   🔸१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते.

   ६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे १२.१५ वाजता दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

   🔸बोधिसत्व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार~14/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment