"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*14/10/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14.ऑक्टोबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.११/१२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~शतभिषज,
योग ~गण्ड, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:32, सूर्यास्त-18:16,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

14. *कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

14. *उंटावरून शेळ्या हाकणे –*
  ★ अर्थ ::~ आळस, हलगर्जीपणा करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

14. *उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि ।*
              ⭐अर्थ ::~
    उद्योगानेच कामे सिद्ध होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 ★ 14. ऑक्टोबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ आंतरराष्ट्रीय मानक दिवस
★हा या वर्षातील २८७ वा (लीप वर्षातील २८८ वा) दिवस आहे.
★ जागतिक दृष्टी दिन

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर
●१९८२ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
●१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३१ : निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक
◆१९२४ : वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक
◆१८९० : ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष
◆१८८४ : लाला हरदयाळ –
कुशाग्र बुद्धिमत्तेचा क्रांतिकारक,
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारकांपैकी एक होते,

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते
●१९९८ : डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक
●१९९४ : सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक,
●१९५३ : *रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे* – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व  महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14. *✸ बलसागर भारत होवो ✸*
   ●●●●००००००●●●●
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14.  *✹ 'गंतव्य दूर तेरा' ✹*
   ✶✶✹✹★●★✹✹✶✶
उठ जाग रे मुसाफ़िर, अब हो गया सवेरा।
पल पलक खोल प्यारे, अब मिट गया अंधेरा॥ उठ जाग……

प्राची में पो फ़टी है, पर फडफडाए पंछी।
चह चहचहा रहे है, निशि भर यहाँ बसेरा॥ उठ जाग……

लाली लिए खडी है, उषा तुझे जगाने।
सृष्टी सज़ी क्षणिक सी, अब उठने को है डेरा॥ उठ जाग……

वे उड चले विहंग गण, निज लक्ष साधना से।
आंखों में क्यूं ये तेरी, देती है नींद घेरा॥ उठ जाग……

साथी चले गये है, तूं सो रहा अभी भी।
झट चेत चेत चेतन, प्रमाद बना लूटेरा॥ उठ जाग……

सूरज चढा है साधक, प्रतिबोध दे रहा है।
पाथेय बांध संबल, गंतव्य दूर तेरा॥ उठ जाग……
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

14.  *❃❝ बंध विश्वासाचे ❞❃*
     ━•●◆●★★●◆●•═━
      एकदा एक छोटी मुलगी आणि तिचे वडील एक पूल पार करत असतात. मुलगी पडेल, याची वडिलांना थोडी भीती वाटते आणि ते तिला म्हणतात...

         *"बाळा, माझा हात धर"*

    मुलगी पटकन म्हणते, “नको बाबा, तुम्हीच माझा हात धरा...

     वडील कौतुकाने विचारतात,

   “अगं बाळा, काय फरक पडतो?’

       मुलगी म्हणते, “खूप फरक पडतो बाबा. मी तुमचा हात धरला आणि मला काही झाले, तर मी पटकन हात सोडून देईन.

       पण मला माहितीय, तुम्ही माझा हात धरला असताना काहीही झालं तरी तो सोडणार नाही.’

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    कोणत्याही नात्यामधील विश्‍वास बंधनकारक नसतो, तर तो एक न तुटणारा बंध असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14.  *जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,*
    *थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...!*
     *उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!*

        *तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

14. *✿ सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
🔹 *महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत (शिखर)कोणते*?
      ➡   *कळसुबाई* (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

🔹 *महाराष्ट्राला किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?*  
   ➡   720 कि.मी.

🔹 *महाराष्ट्राने भारताचा कितीटक्के भाग व्यापलेला आहे?*
      ➡    9.7 टक्के.

🔹 *महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या सीमारेषा आहेत?*
      ➡  गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

🔹 *महाराष्ट्रास लागून कोणत्या  राज्याची सीमा सर्वात लांब आहे?*
       ➡    मध्यप्रदेश.

🔹 *विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहेत?*
       ➡    गोंदिया
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

14.  *❒ ♦लाला हरदयाळ♦❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━
*● जन्म :~ १४ ऑक्टोबर १८८४,* मोहल्ला चिराखाना, चांदणी चौक, दिल्ली
● मृत्यु :~ ४ मार्च १९३९,विजनवासात -फिलाडेल्फिया अमेरिका
◆शिक्षण :~ एम. ए. पीएचडी
  
       आयसीएस पदवी त्यागुन आपली सारी विद्वत्ता देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा क्रांतिकारक म्हणजेच लाला हरदयाळ.  इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सान्निध्यात आल्यावर लाला हरदयाळ यांनी उच्च शिक्षण सोडून दिले आणि ते क्रांतिकार्याकडे वळले. गदर नावाची संघटना त्यातूनच जन्मास आली. लाला हरदयाळ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारकांपैकी एक होते, ज्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी योगदान देणाऱ्या भारतीयांना प्रेरणा दिली आणि प्रोत्साहन दिले. त्यासाठी गदर पार्टी स्थापन करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी प्रवासी भारतीय लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. त्यांच्या साध्या आयुष्यामुळे आणि बौद्धिक कौशल्यांनी भारावून पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश साम्राज्याविरोधात  लढा देण्यासाठी कॕनडा आणि अमेरिकेत राहणा-या अनेक परदेशी भारतीयांनी नेतृत्व केले.
      लाला हरदयाळ यांच्या जन्म दिल्लीतील गुरूद्वार शिशगंज च्या चिराखाना मोहल्ला येथील कायस्थ कुटुंबात झाला. त्यांची आई भोली रानी यांनी तुलसी रामचरीत मानसआणि विरांच्या पूजेची  शिकवण दिली.
      लाला हरदयाळ यांचे प्रारंभिक शिक्षण केंब्रिज मिशन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली येथे संस्कृत मधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर पंजाब विद्यापीठ लाहोर येथे संस्कृतमध्ये एम.ए.  केले.  या परीक्षेत त्यांना इतके गुण मिळाले की सरकारने त्यांना २००  पौंडाची शिष्यवृत्ती दिली. आणि त्यांचे वैशिष्ट्यं असं की ते एकाच वेळी पाच गोष्टी करत असत.
      पूर्वी ते मास्टर अमचंदच्या गुप्त संकटकालीन संस्थेचे सदस्य झाले होते. त्या दिवसांमध्ये शामजी कृष्णवर्मा देखील लंडन मध्ये राहत होते. देशभक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 'इंडिया हाउसची' स्थापना झाली. इतिहासाच्या अभ्यासाच्या परिणाम स्वरूप इंग्रजी शिक्षणास पाप म्हणून विचारात घेतल्यानंतर त्यांनी १९०७ मध्ये आॕक्सफोर्ड विद्यापीठ सोडले आणि लंडनमध्ये एक 'देशभक्त' सोसायटी स्थापन केली व असहकार चळवळीचा प्रचार सुरू केला.
       काही दिवस परदेशात राहिल्यानंतर १९०८  मध्ये ते भारतात परतले. एक घटना अशी घडली लाहोरमधील तरुणांना मनोरंजन करण्यासाठी एक मात्र क्लब 'यंग मॕन ख्रिश्चन असोसिएशन' किंवा वायएमसीए होते. त्याच्या सचिवांसोबत झालेल्या भाषणाबद्दल एक गंभीर वादविवाद झाला आणि लालाजींनी वायएमसीएच्या समांतर 'यंग मॕन इंडिया असोसिएशन'ची स्थापना केली.
      सन १९०८ मध्ये पुन्हा एकदा सरकारी दडप सत्र सुरू झाले. लाला लजपतराय यांच्याशी सल्लामसलत करून हरदयाळ पॅरिसला गेले. तिथे जिनेव्हा येथे मासिक 'वंदे मातरम्'चे  संपादन सुरू केले. शहीद मदनलाल धिंग्रा यांच्या संबंधात त्यांनी एका लेखात लिहिले, 'अमर वीराचे शब्द आणि कार्य शतकांपर्यंत मानली जातील, ज्यांना नववधूसारखा मृत्यू आवडतो.'  मदनलाल धिंग्रा यांनी म्हटले होते "माझ्या देशाचा अपमान करणे हा देवाचा अपमान आहे आणि मी कधीही हा अपमान सहन करू शकत नाही, म्हणून मी जे काही केले त्या कृत्याबद्दल मला पश्चाताप नाही."
         सन १९१२ मध्ये स्टॕनफोर्ड विद्यापीठात हिंदू तत्वज्ञान व संस्कृतचे मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. तिकडे इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात भयंकर युध्द  सुरू झाले.  त्यातच लाला हरदयाळ यांनी परदेशात राहणार्‍या शीखांना घरी परतण्यासाठी आव्हान  केले. १ नोव्हेंबर १९१३ पासून लालाजींनी गदर या संघटनेचे 'गदर' नावाचे मुखपत्र सुरू केले. त्यांच्याच प्रेरणेने हजारो तरुण ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी मायदेशी परतले होते. पण गदरच्या अपयशानंतर लालाजी तत्त्वचिंतनाकडे ओढले गेले.   
      काकोरी कंदच्या एतिहासिक निर्णयानंतर मे १९२७ मध्ये लाला हरदयाळ यांना भारतात आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु ब्रिटिश सरकारने त्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर १९३८  मध्ये पुन्हा प्रयत्न करण्यात आला परंतु ४ मार्च १९३९ रोजी अमेरिकेच्या मेट्रोपाॕलिटन फिलाडेल्फिया मध्ये त्यांचा गुढ मृत्यू झाला.
          लाला हरदयाळ हे एक आदर्शवादी,  भारतीय स्वातंत्र्याचे निडर समर्थक,  एक मजबूत वक्ता आणि प्रभावी लेखक होते.  उदाहरण देताना त्यांनी कधीही मजकूर बदलला नाही. आपल्या अद्वितीय स्मृतींच्या आधारावर ते थेट लिहीत असत हा भाग या पुस्तकाच्या या पृष्ठावरून घेतला गेला आहे. त्यांच्यासारखे आश्चर्यकारक स्मृती असलेले व्यक्तिमत्त्व जगाच्या इतिहासात दुर्लक्षित राहीले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार~14/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment