Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14. डिसेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.१४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~सिद्ध, करण ~वणिज,
सूर्योदय-07:04, सूर्यास्त-18:03,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
14. *दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
14. *आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे*
*★ अर्थ ::~*
- माणसाला आपल्या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात , पण दुसऱ्याच्या गोष्टीत त्याला दोष दिसतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
14. *संघे शक्तिः कलौ युगे ।*
⭐अर्थ ::~
कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 14. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
★ हा या वर्षातील ३४८ वा (लीप वर्षातील ३४९ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६१ : टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
●१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
●१९०३ : किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४६ : संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र
◆१९३९ : सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते
◆१९३४ : श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
◆१९२४ : राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)
◆१९१८ : योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७७ : गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते.
●१९६६ : शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार
●१७९९ : जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
14. *✸ बहु असोत सुंदर ✸*
●●●●००००००●●●●
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा
गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
14. *❂ मुखी तुझे नाम राहो ❂*
━━═●✶✹★✹✶●═━
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
14. *❃❝ लाख मोलाचा देह ❞❃*
━━•●◆●★●◆●•═━
एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.
वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे'
'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.
'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.
अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.
व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
लाख मोलाचा.देह आपल्याजवळ असताना आपण भिख मागु नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
14. आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही,
असं वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छानस😀 "SMILE"दया. 🌹 हे छोटस हास्य
इतर कोणत्याही
वस्तू पेक्षा खुपच
"मौल्यवान" आहे..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
14. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
■ चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला ?
➜ महाड.
■ महाराष्ट्र राज्यातील सर्वांत कमी जंगले आढळणारा विभाग कोणता ?
➜ मराठवाडा.
■ हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
➜ आसाम.
■ भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?
➜ डाॅ. होमी भाभा.
■ 'सत्यमेव जयते' हे कशातून घेतले आहे ?
➜ मुंडक उपनिषदातून
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
14. *❒ ग.दि. माडगूळकर ❒*
━━═•●◆●★●◆●•═━
आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक अशा या महान साहित्यिकास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
🔸नाव:~ गजानन दिगंबर माडगूळकर
🔹टोपणनाव :~ गदिमा
●जन्म :~ १ ऑक्टोबर १९१९
शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र
*●मृत्यू :~ १४ डिसेंबर १९७७*
पुणे, महाराष्ट्र, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ साहित्य, चित्रपट
🔹भाषा : ~ मराठी
🔸साहित्य प्रकार :~गीतरचना, कथा, कादंबरी
🔹प्रसिद्ध साहित्यकृती:~ गीतरामायण
💠 ग.दि. माडगूळकर*
हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.
ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शनिवार ~14/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment