"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*15/01/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15. जानेवारी:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.5,  पक्ष : शुक्ल पक्ष,
       तिथि ~पञ्चमी,
      नक्षत्र ~शतभिषज,
योग ~वरीयान्, करण ~बव,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:21,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

15. *चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

15. *कर नाही त्याला डर कशाला ?*
   *★ अर्थ ::~* - ज्याने अपराधच केला नाही त्याला शिक्षेची भीती नसते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

15.  *विनयात् याति पात्रताम् ।*
   ⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

  🛡 *★15. जानेवारी ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★भारतीय सशस्त्र सेना दिवस
★हा या वर्षातील १५ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
●१९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
●१९७३ : जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
●१९४९ : जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
●१७६१ : पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२६ : *कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव* – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
◆१९२१ : बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री
◆१७७९ : रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१४ : नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक
●•२००२ : विठाबाई भाऊ  नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत
●१९९८ : गुलजारीलाल नंदा – भारताचे  दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते 
●१९७१ : दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

15.  *✸ जहाँ डाल-डाल पर ✸*
     ●●●●००००००●●●●
जहाँ डाल-डाल पर
सोने की चिड़ियां करती है बसेरा
वो भारत देश है मेरा

जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का
पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा

ये धरती वो जहाँ ऋषि मुनि
जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है
और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर
डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा

अलबेलों की इस धरती के
त्योहार भी है अलबेले
कहीं दीवाली की जगमग है
कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का
चारो और है घेरा
वो भारत देश है मेरा

जहाँ आसमान से बाते करते
मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर मे किसी द्वार पर
कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता
है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा ...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

15. *❂अजाण आम्ही तुझी लेकरे❂*
     ━═●✶✹★✹✶●═━
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

15.    *❃❝ 'मी' पणा ❞❃*
     ━═•●◆●★●◆●•═━
       एका साधूकडे काही उद्देशाने एक गृहस्थ गेला. झोंपडी बाहेरुनच त्यांनी 'महाराज' म्हणून हाक मारली.

    महाराजांनी विचारल, "कोण आहे?" गृहस्थ म्हणाले, "मी". साधू "कोण"?
     पुन्हा उत्तर आल 'मी'
साधू म्हणाले, 'तू कोण तुला तरी माहित आहे का? तू कोण आहेस ते शोध आणि ये.

       त्यावर गृहस्थानी आपले नाव सांगितले'  'विजयराव.'
             
      साधूंनी त्यांना आत बोलवले आणि म्हणाले 'मी' पणा सोडावा. तो फार घात करतो. खरं म्हणजे तुम्ही विजयराव ही नव्हे.स्वतः ला विसरा आणि इतरांशी एकुरूप व्हा तरच तुमची खरी ओळख सर्वांना पटेल.

         🌀❝ तात्पर्य ❞ ::~ 
    माणसाच्या अंगी 'मी' नसावा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

15. मानवी जीवन यशस्वी व्हायचा
   तडजोड हाही एक मार्ग आहे...
माणसाने ती करायला शिकल पाहिजे;
        जिथं जिथं  "तडा'  जाईल,
     तिथं तिथं 'जोड' देता आला की,
       कुठलंच नुकसान होत नाही..!!
    तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
       तर ती परिस्थितीवर केलेली
               मात असते..!!  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

15. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  भारतीय संविधानाच्या मसुदा समितीत किती सदस्य होते ?
➜ सात.

✪  विद्युत ऊर्जा मोजण्याचे एकक कोणते ?
➜ ज्यूल.

✪  फिल्म अभिनेता अक्षयकुमार कोणत्या देशाचा नागरिक आहे ?
➜ कॅनडा.

✪ सूर्य मंदिर कोठे आहे ?
➜ कोणार्क.( ओरिसा )

✪  भारतात दयेचा अधिकार कोणाला आहे ?
➜ राष्ट्रपती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

15. *❒ ♦खाशाबा जाधव ♦ ❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━
      हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
अशा या महान कुस्तीगीरास त्यांच्या
*जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!*
      🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

◆नाव :~ खाशाबा दादासाहेब जाधव
◆राष्ट्रीयत्व :~ भारतीय.
◆निवासस्थान :~ कराड तालुका, 
  सातारा जिल्हा, महाराष्ट्र
●जन्म :~ १५ जानेवारी १९२६
●मृत्यु :~ १४  ऑगस्ट  १९८४
★कुस्तीकामगिरी व किताब :~ ऑलिंपिक स्तरइ.स. १९५२ हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा': ५२ किलो. फ्रीस्टाइल कुस्ती; कांस्यपदके

    जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

     खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यातील एका मराठा कुटूंबात झाला. त्यांची कुस्ती खेळात ख्याति होती. भारत देशातील ते ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते. सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले.

              ★ कुस्ती ★
     त्याचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याचे वयाचे ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. महाविध्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही. भारताचे स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी भाग घेतला होता. त्याने ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचा निश्चय केला होता.

      सन १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिक साठी फ्लायवेट गटासाठी यांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर राहिते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा ६ वा क्रमांक पुढे घेवून जाणारा ठरला नाही. पुढील सन १९५२ सालच्या हेलसिंकी येथे होणार्‍या ऑलिंपिक साठी जरी ते पुढील बंटमवेट गटात (५७ की.) गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनल पर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी त्याना ब्रांझ पदकावर समाधान मानावं लागलं पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.

    गादीवरील कुस्तीत पाय घसरतात. खेळताना दोन चुका झाल्या त्याने गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले, असे त्यांचे बरोबर गेलेले त्यांचे चुलत भाऊ संपतराव जाधव म्हणाले.

    सन १९५५ मध्ये ते सब इंस्पेक्टर या हुद्दयावर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. तेथे अंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलिस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि अशीस्टंट पोलिस कमिशनर या हुद्दयावरून निवृत्त झाले. पेन्शन साठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे जीवन गरिबीत गेले. त्यांचा सन १९८४ मध्ये एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला.

       ◆देशाने केलेला आदर◆
     सन २०१० मध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील कुस्ती विभागाचे स्थळाला त्यांचे नाव दिले. सन २००१ मध्ये त्यांना अतिशय प्रशिद्द असा अर्जुन आवार्ड दिला.

     नॅशनल बुक ट्रस्टचे संजय सुधाने यांनी त्यांचेवर ऑलिंपिक वीर के.डी.जाधव हे पुस्तक लिहिले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार~15/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment