"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*15/02/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15.फेब्रुवारी:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.6, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~अश्विनी,
योग ~शुक्ल, करण ~तैतिल
सूर्योदय-07:07, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

15. *शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

15. *सुक्याबरोबर ओलेही जळते*
      *★ अर्थ ::~*
- चांगल्यामध्ये वाईटही खपून जाते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

15.  *विनयात् याति पात्रताम् ।*
⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *15. फेब्रुवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★जागतिक बालकर्करोग दिन
★हा या वर्षातील ४६ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४२ : दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
●१९३९ : काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४९ : नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक 
◆१७३९ : *संत सेवालाल महाराज* – बंजारा समाजाचे अराध्य दैवत,
मानवतावादी कल्याणाची गुढी उंच नेणारे महान संत
◆१५६४ : गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८० : मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय
●१९८० : कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष
●१८६९ : मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

15. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
   ●●●●००००००●●●●
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

15. *❂ इतनी शक्ति हमें दे न दाता*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
इतनी शक्ति हमें दे न दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...

हर तरफ़ ज़ुल्म है बेबसी है
सहमा-सहमा-सा हर आदमी है
पाप का बोझ बढ़ता ही जाये
जाने कैसे ये धरती थमी है
बोझ ममता का तू ये उठा ले
तेरी रचना का ये अन्त हो ना...
हम चले...

दूर अज्ञान के हो अन्धेरे
तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम
जितनी भी दे, भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसीका किसीसे
भावना मन में बदले की हो ना...
हम चले...

हम न सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाटें सभी को
सबका जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करुणा को जब तू बहा दे
करदे पावन हर इक मन का कोना...
हम चले...

हम अन्धेरे में हैं रौशनी दे,
खो ना दे खुद को ही दुश्मनी से,
हम सज़ा पाये अपने किये की,
मौत भी हो तो सह ले खुशी से,
कल जो गुज़रा है फिरसे ना गुज़रे,
आनेवाला वो कल ऐसा हो ना...

हम चले नेक रास्ते पे हमसे,
भुलकर भी कोई भूल हो ना...
इतनी शक्ति हमें दे ना दाता,
मनका विश्वास कमज़ोर हो ना...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

15.  *❃ घोडा व गाढव ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *एका सरदाराचा घोडा* जरतारी जीन पाठीवर घेऊन लगाम चावीत फुरफुरत वाटेने जात असता ओझ्याने खचून गेलेले एक गाढव त्याला दिसले.
       त्याला धमकी देऊन तो म्हणाला, 'अरे, सरक, सरक ! नाहीतर मी तुला आता पायाखाली तुडवून टाकेन.'
       गाढव बापडे दुर्बळ. तेव्हा ते घाईघाईने बाजूला सरकले. पुढे काही दिवसांनी त्या घोड्याला लढाईत गोळी लागली व सरदाराने त्याला एका भाडेकर्‍याला विकले. मग तो ओझी वाहू लागला.

      एकदा पाठीवर मोठे गाठोडे घेऊन तो रस्त्याने जात असता त्या गाढवाने पाहिले व त्याला हाक मारून ते म्हणाले, 'काय राव, रामराम ! त्या दिवशी मला पायाखाली तुडविणारे तुम्हीच नाही का ? मी तेव्हाच भविष्य केलं होतं की एखाद्या दिवशी तरी आपला गर्व उतरेल.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   जो गर्वाने मोठेपणा मिळवू पाहतो, त्याच्याजवळ सामर्थ्य असेपर्यंत लोक त्याला नमून असतात. पण तो निर्बल झाला म्हणजे त्याचा उपहासच केला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

15. जेव्हा मन कमकुवत असते,
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते..

   जेव्हा मन संतुलित असते, 
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते..

    जेव्हा मन खंबीर असते,
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते..

   *जेव्हा मन विश्वासाने आनंदी असते, तेव्हा परिस्थिती निश्चित विजयच निर्माण करते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
15. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ शक्तीस्थळ.( दिल्ली )

✪  नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
➜ हम्पी रथ.( कर्नाटक )

✪  काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?
➜ आफ्रिका.

✪ भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?
➜ गोल घुमट.( विजापूर )

✪  मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
➜ २५ डिसेंबर २०१४
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

15. *❒ संत सेवालाल महाराज  ❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━

*बंजारा समाजाचे अराध्य दैवत...*
    मानवतावादी कल्याणाची गुढी उंचच नेणा-या अशाच एका महान संताची आज जयंती आहे. त्या संताचे नाव आहे संत सेवालाल महाराज.
  *अशा या महान संतास जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!*
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म :~ १५ फेब्रुवारी १७३९,
●मृत्यू :~ २ जानेवारी १७७३

     निसर्गपूजक, कृषी संस्कृती रक्षक, पशूपालक, काटक अशा आदिम बंजारा समाजाचे अराध्य दैवत म्हणजे संत सेवालाल महाराज होय. त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 साली आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गोलालडोडी तांडा येथे झाला. वडील भीमानायक राठोड रामावत व माता धर्मणी या राजवंशीय जोडप्याचे ते जेष्ठ अपत्य.घरात कृषी सुबत्ता खूप होती.सेवाभाया व त्यांचे तीनही बंधू हापानायक ,बदूनायक,पुरानायक हे अतिशय शूर होते.
   बंजारा समाज हा तांडा करुन राहतो.बदलत्या काळासोबत बंजारा समाजातही परिवर्तन झालं आहे.पण तरीही लोकजीवन ,संस्कृती ,बोलीभाषा ,पेहराव ,पारंपारिक नृत्य ,लोकगीते या बाबतीत हा समाज स्वतंञ ओळख कायम ठेऊन आहे.आज तांड्यावरील लोकजीवन स्थिर भासत असले तरी पोटासाठी हंगामी स्थलांतर चुकलेले नाही.पशूपालन व व्यापार हा बंजारा समाजाचा पारंपारिक व्यवसाय होता.त्यासाठी सतत भ्रमंती करावी लागत असे.मोगली आक्रमण व पुढे इंग्रजांच्या काळात पारंपारिक व्यवसाय बुडीत निघाले.त्यामुळे सामाजिक जनजीवनही विस्कळीत झाले.बंजारा समाजाला या बदलत्या परिस्थितीचा खूप मोठा फटका बसला.गुजरात ,कर्नाटक ,महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश ,पंजाब अशा प्रांतात हा समाज मोठ्या संख्येने विखुरला गेला.बडद बंजारा व लमाण बंजारा अशा दोन मुख्य उपशाखा असलेला समाज देशभरात काही उपजातींनीही ओळखला जातो.बडद म्हणजे बैल .बैल या पशूधनाशी संबंधित शाखा म्हणजे बडद बंजारा.मीठाचा व्यापार करणारी शाखा म्हणजे लमाण बंजारा.लवण या मीठाच्या समानार्थी शब्दावरुन लम्बाना ,लम्बानी व पुढे फक्त लमानी असा शब्द रुढ झाला.
   संत सेवालाल महाराजांच्या जन्मावेळी हा समाज भारतभर विखुरलेला होता.शिक्षणाचा अभाव तर होताच शिवाय पोटापाण्यासाठी व्यवसायाचीही समस्या उभी राहिलेली होती.सेवालाल महाराजांनी जनजागृती केली.स्वतः तांड्या तांड्यावर फिरले.समाज व्यसनाधिनता ,गुन्हेगारी यांनी वेढला गेला होता.महाराजांनी बंजारा समाजाला ऐतिहासिक संस्कृतीची जाणीव करुन दिली.लडी भजन ,सत्संग ,भजन यामधून लोकांना साध्या सरळ सोप्या भाषेत शिकवण दिली.थाळी नादावर आधारित भजन हा प्रकार आजही रुढ आहे.सेवालाल महाराजांची शिकवण आजही बंजारा समूहाला तोंडपाठ आहे.
  सेवालाल महाराजांनी सांगितलेली  तत्वे ही सकल मानव जातीच्या कल्याणासाठी आजही उपयोगी  आहेत.

  ◆सत्य...  सत्य जाणणे यातच जीवनाचे सार आहे.सत्य हेच जीवन आहे.महाराज सोप्या भाषेत सत्याचे महत्व सांगत.

   ◆कोणालाही दंडित न करणे-- गोरगरीबांना वेगवेगळ्या कारणाने दंड आकारुन,  त्यांचे शोषण करुन स्वतःचे पोट भरणा-या लोकांना सेवालाल महाराज कडक शब्दात फटकारत असत. ते म्हणायचे
   *गोर गरीबेन डांडन खाये - सात पिढी नरकेमा जाये...*
   *ओरे वंशेपर कोनी रिये  पायरीरो भाटा बनीयेर...*

    क्रांतीकारी संत--- संत सेवालाल महाराज क्रांताकारी संत होते.क्रांताकारी म्हटलं की लोकांना वाटतं ढाल तलवारी बंदुकीच असतील. महाराज शस्ञांच्या पठडीतील क्रांताकारी नव्हते, समाज सुधारणेतील क्रांतीकारक होते. त्या काळातील लोकजीवन व सेवालाल महाराजांचे कार्य यांचा तुलनात्मक अभ्यास केला की सेवालाल महाराजांची क्रांतीकारी विचारसरणी लक्षात येते. अक्षरशञू झालेल्या बंजारा समाजाला त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. स्ञी शिक्षणाचा आग्रह धरला. पशुबळी प्रथा बंद केली. स्वतः श्रीमंत असूनही आपला पुतण्या जेतालालचा विवाह त्यांनी सामका नावाच्या अत्यंत गरीब घरातील मुलीसोबत लावून दिला.राजा बोले अन् दल हले असे एक मराठी म्हण प्रचलित आहे. बंजारा समाजातही नायक बोले तांडा चाले ही पद्धत होते. जात पंचायतीत नायक ,कारभारी यांच्याकडून अन्याय होत असे.नायक पद्धतीला त्यांनी विरोध केला. त्यागी, दूरदर्शिता, बुद्धीप्रामाण्यावर आधारित असे त्यांचे जीवनकार्य आहे.

     *★ तीर्थक्षेञ  पोहरादेवी...*
   यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीला बंजारा समाजाचे तीर्थक्षेञ म्हटले जाते. वर्षातून चार वेळा तेथे याञा भरते. रामनवमीला लाखोंच्या संख्येने बंजारा समाज पोहरादेवीला येतो.

    संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे अराध्य दैवत असले तरी त्यांची शिकवण सर्वच जाती धर्मासाठी "पोरीया तारा" म्हणजे दीपस्तंभी मार्गदर्शकच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार ~15/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment