"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*15/04/19 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 15/04/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *15. एप्रिल:: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             चैत्र शु. १०/११
     तिथी : शुक्ल पक्ष दशमी,
           नक्षत्र : अश्लेषा,
     योग : गंड,  करण : गर,
सूर्योदय : 06:22, सूर्यास्त : 18:56,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

15. *स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगुन लहान राहीलेले  कधीही चांगले.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
15. *एकाच माळेचे मणी*
      *★ अर्थ ::~*
   - सगळेच सारखे असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
15. *न खलु वयस्तेजसो हेतुः ।*
              ⭐अर्थ ::~
 वय हे काही तेजाचे कारण असू शकत नाही. (ते स्वभावतःच असते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★15. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०५ वा (लीप वर्षातील १०६ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
●१९४० : दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
●१६७३ : मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९३२ : सुरेश भट – कवी
●१८९३ : नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
●१४६९ : गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू
●१४५२ : लिओनार्डो डा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०१३ : वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक
◆१९८० : जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१९१२ : एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान
◆१८६५ : अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

15. *✸ स्वातंत्र्य प्राण  ✸*
       ●●●●●००००००●●●●●
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी

आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी

उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
15. *❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
15.  *❃ प्रामाणिकपणा ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली... गुरू द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात ?
कृष्णाने उत्तर दिले...
     "ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले..."
रुक्मिणीने विचारले...
कोणते पाप ? कृष्ण म्हणाला...
     "जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते...
दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते...
पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे."
रुक्मिणीने विचारले...
मग कर्णाचे काय?? कृष्ण म्हणाला,
    "कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही... त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
    तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते...
पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही...
    नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला."...

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिक पणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.....!!!*

   *आयुष्यभराची प्रतिष्ठा.....!!*
 *एका क्षणात शुन्य होते......!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
15.   "मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते...."
             कारण,
  न सांगता जुळणा-या नात्यांची
परिभाषाच काही वेगळी असते"...
            विश्वास ठेवा....
    आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो,
     तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
15.   *✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▶  इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
▶  मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
▶  *ओ*’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
▶ मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
▶ कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

15. *❒ "नारो बापूजी मुगदल" ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
"नारो बापूजी मुगदल" यांचे बलिदान.

     ६ जानेवारी ते ९ जानेवारी १६६४ पर्यंत मराठ्यांनी "सुरत" मनसोक्त लुटली होती. सुरत लुटीची लक्ष्मी घेऊन मराठे थेट लोहगडावर पोचले.
पण शहाजीराजेंच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
लुटीचा मार्ग काढत मुघल हेर लोहगडच्या आवारात पोचले आणि मुघल सरदार मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने चालून आला.
      त्याला अडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा बालसवंगडी "नारो बापूजी मुगदल" पुढे गेले. नारो बापूजी हे "श्रीपाद बापूजी मुगदल" यांचे पुत्र.
"वडगाव मावळ" जवळ नारो बापूजी व मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला.
मुघलांकडे अनेक घोडेस्वार व तिरंदाज आणि बंदूकधारी सैन्य होते तरीसुद्धा मराठ्यांच्या गनिमी काव्यासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नंगी तलवार अशी काही चालवत होते की मुघलांची धांदल उडाली.
    शेवटी एका तिरंदाजाचा बाण नारो बापूजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ सोमवार ~ 15/04/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment